अजूनकाही
परमेश्वराचे अस्तित्व नाही अशी जागाच अस्तित्वात असणे शक्य नाही. त्याचे आणि त्याने निर्माण केलेल्या चराचरसृष्टीचे नाते अभेद्य आहे. ज्याने हे विश्व निर्माण केले आहे, तोच या विश्वाचा कर्ताधर्ता, चालक, मालक आणि प्रेरकही असणारच. परमेश्वरी अस्तित्वाच्या प्रेरणा निसर्गाशी अधिक मिळत्या-जुळत्या असतात. म्हणूनच आपण नंतरच्या औपचारिक चौकटी उभारणारे मर्त्य मानव निसर्गदत्त अधिकारांची भाषा बोलत असतो.
हा विश्वनियंता आपल्याला केवळ या व्यवस्थेत आणून ठेवत नाही, तर काही विहित भूमिका पार पाडण्याचे बंधनही घालतो. तसेच या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे मार्गही शिकवतो. हे मार्ग अनुसरताना पाळावयाची नैतिक संहिता भंग होऊ द्यायची नाही, हा नियम कटाक्षाने पाळला जाणे त्याला सर्वांकडून अभिप्रेत असते. ठराविक कर्तव्ये पार पाडताना सगळे काही संकलित केलेले तिथल्या तिथे एका क्षणभरात सोडण्याची वृत्ती अंगी बाळगणे आणि पुन्हा त्याच्या आदिभौतिकात स्वत्व विलीन करणे ही प्रक्रिया म्हणजेच ‘वारी’ असते.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
आषाढी एकादशीस गत अनेक शतकांपासून आपण हा उपक्रम अव्याहतपणे करतो आहोत. परमेश्वर, जगनियंता आणि आणखी बऱ्याच विशेषणांनी उल्लेखित सर्वसमावेशक निर्मात्याकडे जाताना सर्वस्व-समर्पणाचा हा सोहळा आमच्या नित्य जगण्यातही बा विठ्ठलाने निर्माण करावा. व्यवस्थेच्या चालकाबद्दल आदर, प्रेम आणि विश्वास असणे गैर नाही. तो अभिव्यक्त करण्याचा अजरामर सोहळाही अवर्णनीयच मानावा लागेल. फक्त या सोहळ्याचा मतितार्थ लक्षात न घेता धर्म, अंधश्रद्धा, तुम्ही आणि आम्ही हा अमंगळ भेदाभेद आपल्या दैनंदिनीत का यायला लागला? असा विठुरायाचा तोकडा सवाल आपण अनुत्तरित ठेवता कामा नये.
व्यावहारिक पातळीवर सर्वच क्षेत्रांत अंगिकारण्यात आलेला दुजाभाव हा केवळ पाप आणि पुण्याच्या कल्पनांना तडे देणारी बाब नसून समाजव्यवस्थेतला हा दुटप्पीपणा आपल्या वर्तनपद्धतीबद्दलच शंका उपस्थित करायला लागतो. मुखी हरीनामाचा गजर आणि प्रत्यक्ष वर्तन मात्र दांभिकाचे, असा व्यवहार ना ‘ज्ञानेश्वरी’त आहे ना ‘गाथे’मध्ये. मग पांडुरंग कसा पावणार?
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
विश्वनियंता आणि आपण सगळे यातील अंतर वाढवत दांभिकतेची पुटे चढलेली व्यवस्था निर्माण करण्यात आली. परमेश्वरानेच दिलेल्या बुद्धीचा समाजवास्तवातील वापर थांबला. योग्य-अयोग्यतेचा सारासार विचार खुंटला. पांडुरंग सर्वांचा आहे, हे विश्वच त्याने निर्मिलेले आहे. तो माझ्यात आहे, तसाच तुझ्यातही आहे. अगदी तो त्याला न मानणाऱ्या नास्तिकातसुद्धा आहे. त्याचे तसे असणे मला मान्य करायचे आहे. हा विचार ज्याने निर्माण केले, त्यानेच आपल्याला दिला आहे, याचाही विसर पडला.
या अंध:काराचे इमले तोडत, धर्माच्या, निसर्गाच्या उपजत रचनांवर चढवण्यात आलेले दांभिकतेचे आवरण दूर सारत ध्यान-ज्ञानसाधनेच्या जोरावर संत ज्ञानेश्वरांनी तुकाराम, चोखामेळा, गोरा कुंभार एकनाथ या समविचारी संतांसोबत तो विठ्ठल पुन्हा एकदा भक्तीसंप्रदायात आणला. दावे-प्रतिदावे, वादविवादात अडकलेल्या व तत्कालिन मोहपाशाचे जंजाळ सोडवू पाहणाऱ्या एका विशाल मऱ्हाटी जनसमुदायाला अव्याहतपणे पंढरीस उभ्या असलेल्या सावळ्या विठ्ठलाकडे जाणारी वाट दाखवली. ही वाट अंध:कारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, अहंभावातून त्यागाकडे, अस्मितांच्या दुराभिमानातून अस्मितांची जळमटे गळून पडण्यासाठीच निर्मिली होती.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
म्हणूनच ‘वारी’ हा निव्वळ ईशप्राप्तीचा पोथिनिष्ठ मार्ग नव्हता, तर तो तुमच्या-आमच्यातला विठ्ठल जागवण्यासाठी विचारपूर्वक सुरू केलेला जागर ठरला. रंजल्या-गांजल्याच्या सेवेसाठी समाजव्यवस्थेतील अहंभाव जाळण्याची साद घालणाऱ्या भागवत पंथाचा हुंकार होता. भौतिक जगण्यातले रडगाणे, जात-पंथ, उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठत्वाच्या भिंती तोडून या जगातल्या सर्वोच्च विश्वात्मक देवाशी तादात्म्य पावण्याचा हा यथोचित मार्ग आहे. या विश्वाच्या सर्वांगीण अभ्युदयासाठी एक ध्वज खांद्यावर घेऊन एकाच पथावर चालणाऱ्या सकल जणांच्या मुखीचा 'जय जय राम कृष्ण हरी' हा वेदांचा प्रतिघोष ठरला.
‘स्व’ विसरून, अहंभाव जाळून एकरूप होत जाणारी दिंडी एकाच वेळी स्वत:शी आणि चराचर सृष्टीच्या धारणकर्त्याशी एकरूप होते. विश्वव्यापक केशवाच्या चरणी लीन होणेच वारकऱ्यांच्या ‘ग्यानबा-तुकाराम’ला अपेक्षित आहे. तर आपल्या तना-मनातील विठुबाने क्षणभर तरी दर्शन द्यावे, ही आसही आजतागायत चिरंतन आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
आळंदी, देहू आणि भागवत संप्रदायातील तुळशीची माळ ज्या-ज्या घरात आहे, त्या प्रत्येक ठिकाणाहून निघालेला हा भक्तीप्रवाह अखेरीस आषाढीला त्या पांडुरंग चरणी समर्पित होतो आणि ‘अवघा रंग’ एक जाहल्याचा साक्षात्कार अनुभवण्यास मिळतो.
तुझ्यासमोर माथा टेकवताना जळालेले काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, दंभ आणि अहंकार आमच्या दैनंदिन जगण्यातही जाळण्याची शक्ती दे. पाऊसपाणी तर तूच पाडतोस, तू विश्वनिर्धारक, जगाचा तारणहार आहेस. तुझेच रूप असलेल्या ज्ञानियाचे ‘पसायदान’ जगण्याचे आणि तुकोबाचा अभंग प्रत्यक्षात अंगी बाणण्याचे बळ आम्हाला दे, एवढीच काय ती बा विठ्ठलचरणी आपली करुणा!
.............................................................................................................................................
लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.
shirurkard@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment