भारतातल्या टीव्ही शोंपेक्षा अमेरिकेतले टीव्ही शो असे भन्नाट असतात!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
अनंत देशमुख
  • अमेरिकेतील काही टीव्ही कार्यक्रमांची पोस्टर्स
  • Sat , 21 July 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत्-चित्र The Voice American Idol Storage Wars America's Got Talent Food Network Restaurant Impossible Property Brothers Flip or Flop Shark Tank

अमेरिकेत मुलं, मुली, सूना आणि जावई असल्यानं पालक वारंवार येत असतात. कौटुंबिक बाबी सोडल्यावर पालक वेळ कसा घालवतात या विषयी कुतूहल असणं स्वाभाविक आहे. त्याचं पहिलं उत्तर इथं पाच दिवसांचा आठवडा असल्यानं मुलांना शनिवार-रविवार सुट्टयांचे असतात. तेव्हा आजूबाजूच्याच नव्हे तर क्वचित दूरवरच्या पर्यटनस्थळांना भेटी देणं याला अग्रक्रम मिळतो. मुलं ऑफिसला गेल्यावर पालकांनी वेळ कसा घालवायचा हा प्रश्न असतो. पत्ते, कॅरम खेळणं, बुद्धीबळ शिवाय टेबल टेनिस अशीही सोय ते करतात.

त्यातही सोपा प्रकार म्हणजे टीव्ही. वयपरत्वे काही पालकांचा जीव आपल्याकडील मालिकांमध्ये अडकलेला असतो. त्यांच्यासाठी इथं काही पैसे भरून भारतीय चॅनेल्स घेता येतात. नाहीतर बातम्या, करमणुकीचे असंख्य चॅनेल्स उपलब्ध असतात. त्यातील वैविध्यता, कल्पकता आणि सफाई थक्क करणारी असते. मग अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याकडे का तयार केले जात नाहीत, याविषयी कुतूहल वाटतं.

आपल्याकडे कोणी लक्ष्मीपती एकत्र येऊन छोट्याछोट्या उद्योजकांना कर्जाऊ रकमा देतात आणि त्या तरुणांना मोठा व्यवसाय करायला हातभार लावतात, असा एखादा कार्यक्रम टीव्हीवरल्या एखाद्या चॅनेलवर दाखवला जातो का? तसं होत नाही. आपल्याकडे वास्तुशास्त्राशी संबंधित कार्यक्रम असतात. पण प्रत्यक्ष एखाद्या बुद्धिमान, कल्पक तरुणाला स्वतंत्रपणे कसं उभं राहायचं यासाठी सक्रिय कार्य करणाऱ्या कार्यक्रमांची वानवा दिसते.

या दृष्टीनं इथला ‘Shark Tank’ हा कार्यक्रम खरोखरच महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. यात Mark Cuban, Kevin Oleary, Barbara Corcaran, Lori Grenier, Daymond John आणि Robert Herjavec हे करोडपती भाग घेतात. ते इथं येतात ते त्यांचा पैसा कसा वाढेल हे पाहण्याकरता. त्यांच्यासमोर विविध क्षेत्रांतील लहान उद्योजक येतात, आपल्या उत्पादनासंबंधी माहिती देतात. त्यांना हे धनिक वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि योग्य वाटल्यास आपली ऑफर देतात. यातून नवीन उद्योजकांना वाढण्याची संधी मिळते. यात सहभागी होणाऱ्या साऱ्याच लाभार्थींना फायदा होतो असं नाही. काहींचे प्रस्ताव नाकारलेही जातात. या कार्यक्रमात ज्यांना पूर्वी लाभ झालेला आहे अशा लाभार्थीच्या नंतरच्या काळात झालेल्या प्रगतीसंबंधीची डॉक्युमेंटरी दाखवली जाते. त्यामुळे या कार्यक्रमाची विश्वासार्हता वाढते.

हे कार्यक्रम prerecorded असतात आणि ते साधारण ४०-४५ मिनिटांचे असतात. इथं जे लघुउद्योजक येतात त्यांना कोणत्याही product साठी कर्ज मिळू शकतं, अट फक्त एकच असते ती म्हणजे संबंधित गुंतवणूकदाराला आपण गुंतवत असलेला पैसा सव्याज परत मिळेल याची खात्री वाटणं. हा कार्यक्रम पाहात असताना कोणत्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील गरजांनुसार संशोधन सुरू होतं, त्यात ती व्यक्ती कशी धडपड करते आणि मोठ्या प्रमाणावर निर्मिती करून यशस्वी व्यावसायिक होण्याचा कसा प्रयत्न करते, ते आपल्याला कळतं.

अमेरिकेत घरांची खरेदी-विक्री हा एक मोठा उद्योग आहे. मागे काही वर्षांपूर्वी घरांच्या खरेदी-विक्रीत घट झाल्यानं फार मोठ्या प्रमाणावर अमेरिकेची आर्थिक घसरण झाल्याचं आपण पाहिलं. या विषयावरही टीव्हीवर HGTV या कॅटेगरीखाली असे काही कार्यक्रम होत असतात. Flip or Flop (Tarek and Christina El Moussa), Love It or List It (David Visentin, Hilary Farr), Property Brothers (Drew and Johnathan Scott) हे त्यापैकी महत्त्वाचे. यातील Tarek and Christina El Moussa हे  तरुण दाम्पत्य. दुर्दैवानं Tarek ला अलीकडेच कॅन्सरचं निदान झालं. त्यांनी विभक्त राहाण्याचा निर्णय घेतला. मात्र पूर्वीसारखेच ते व्यावसायिक भागीदार राहिले आहेत. Tarek हा शहरातील जुन्या घरांच्या  लिलावात भाग घेतो आणि विकत घेतलेल्या घराचं संपूर्ण नूतनीकरण करतो. या कामात आणि विशेषत:  इंटिरिअरसंदर्भात Christina  त्याला मदत करते. लिलावात विकत घेतल्यापासून तो ते घर पूर्ण तयार होईपर्यंत काही महिने जातात आणि शेवटी ते नव्या घरासारखं दिसतं. त्याला गिऱ्हाईकं येतात. त्यावेळच्या मार्केट किमतीनुसार ते विकण्यात येतं. त्यात त्या दोघांना फायदा होत असतो.

David Visentin व Hilary Farr हे परस्परांचे मित्र आहेत. ते एकत्र काम करत असले तरी प्रत्येकाचं स्वरूप वेगळे आहे. ज्याला घर विकत घ्यायचं असतं, ते या जोडीशी संपर्क साधतात. मग David Visentin त्यांना बाजारात उपलब्ध असलेल्या घरांपैकी योग्य किमतीची घरं दाखवतो. तर Hilary Farr त्यांच्या जुन्या घराचं नूतनीकरण करते. मग मालकानं जुनंच घर ठेवायचं की, नवं घ्यायचं, याचा निर्णय घ्यायचा असतो. अर्थात त्या दोघांना त्यांचा मोबदला मिळतोच.

Property Brothers चे Drew and Johnathan Scott हे जुळे भाऊ असून एखाद्याचं जुनं घर अत्याधुनिक डिझाइन्स, उपकरणं, रंगसंगतीनं पूर्ण नव्यासारखं करून देण्याचं काम करतात. त्यांचा हा प्रवास आणि त्यातील स्थित्यंतरं पाहण्यासारखी असतात.

Restaurant Impossible या कार्यक्रमात Robert Irvine हा कल्पक तरुण फार चालत नसलेली रेस्टॉरंट्स एक तर स्वत: विकत घेतो किंवा मूळ मालकाला त्यात किचनपासून तो सजावटीपर्यंत कोणते बदल करायचे ते सुचवतो, स्वत: त्यानुसार दुरुस्त्या करतो आणि डबघाईला आलेला व्यवसाय पुन्हा नव्या जोमानं फायद्यात आणून देतो.

Food Network मध्ये अन्नपदार्थ, विविध डिशिश तयार करण्याच्या स्पर्धा असतात, त्या कार्यक्रमात संयोजकांनी सुचवलेले वेगवेगळे पदार्थ तयार करून दाखवावे लागतात. त्यात मोठमोठे शेफ सहभागी झालेले असतात आणि त्यात जिंकणं मानाचं मानलं जातं.

Americas Got Talent हा कार्यक्रम आपल्याकडील ‘एकापेक्षा एक’ या कार्यक्रमासारखा असतो. पण इथला दर्जा वाखाणण्याजोगा असतो. त्यात गायक, जादूगार, कसरतीचे प्रयोग करणारे सहभागी होतात. Simon Cowell, Mel B, Heidi Klum, Howie Mendel हे तज्ज्ञ म्हणून काम करतात. American Idol आणि The Voice  हे उत्तमोत्तम गायकांचा शोध घेणारे स्पर्धात्मक कार्यक्रम असतात.

ESPN, Sportcenter हे चॅनेल्स विविध खेळांचे प्रक्षेपण करतात. त्यात फूटबॉल, सॉकर, बेसबाँल या खेळांना प्राधान्य असतं.

CNN, Fox News, ABC आणि Local News हे बातम्या देणारे चॅनेल्स, तर HBO, Showtime या चॅनेल्सवर अनेक सिनेमा दाखवले जातात.

Disney, Nickolodeon व Cartoon Network हे कार्टून्ससाठी प्रसिद्ध असलेलं चॅनेल्स.

Discovery, NatGeo या चॅनेल्सवर निसर्ग, शहरं, स्थानं यांची माहिती दिली जाते.

Netflix, Amazon Prime या चॅनेल्सवर असंख्य सिनेमा, सिरियल्स आणि डॉक्युमेंटरीज उपलब्ध असतात.

TNT वर सिनेमा आणि खेळ दाखवले जातात.

Storage Wars हा एक वेगळा कार्यक्रम असतो. अमेरिकेत ठिकठिकाणी स्टोअर्स असतात. जे अन्य शहरात किंवा देशात जातात आणि त्यांना काही काळाकरिता आपलं सामान अन्यत्र हलवावं लागते अशांसाठी ही सोय असते. तिथं तुम्ही एक बंदिस्त कॅबिन भाड्याने घेऊ शकता. मात्र ठरावीक वेळेत तुम्ही येऊन आपलं सामान ताब्यात घेतलं नाही तर ते लिलावात काढलं जातं. या लिलावात सहभागी होणारे, त्या कॅबिन्समधील सामान विकत घेणारे काही दलाल असतात. असे लिलाव होताना आणि ते झाल्यानंतर संबंधित दलालाला काय मिळालं, याचं चित्रण असलेला हा कार्यक्रम असतो. तो पाहाणं आनंददायक असतं.

याशिवाय आपल्याकडे जसा चोरबाजार आहे, तसे इकडेही असतात. तिथं असंख्य वस्तू मिळतात. त्यावर आधारितही कार्यक्रम असतात. यापैकी काहींसाठी अधिक पैसे मोजावे लागतात.

ही फक्त झलक आहे. सर्वांसंबंधी लिहिणं कठीण आहे.

.............................................................................................................................................

लेखक अनंत देशमुख समीक्षक, संपादक आहेत.

dranantdeshmukh@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......