डोनाल्ड ट्रम्प हे जवळपास सव्वा वर्षांत ३,००० वेळा खोटं बोलले आहेत!
पडघम - विदेशनामा
टीम अक्षरनामा
  • ‘President Trump lied more than 3,000 times in 466 days’
  • Wed , 18 July 2018
  • पडघम विदेशनामा डोनाल्ड ट्रम्प Donald Trump सीएनएन CNN वॉशिंग्टन पोस्ट The Washington Post Chris Cillizza क्रिस सिलिझ्झा

क्रिस सिलिझ्झा हे सीएनएन या अमेरिकन वृत्तवाहिनीचे एडिटर अॅट लार्ज आहेत. त्यांनी साधारण सव्वा महिन्यांपूर्वी म्हणजे ८ मे २०१८ रोजी त्यांच्या बेवसाईटवर एक छोटासा लेख लिहिला आहे. त्याचं नाव आहे – ‘President Trump lied more than 3,000 times in 466 days’. म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जवळपास सव्वा वर्षांत ३,००० वेळा खोटं बोलले आहेत किंवा त्यांनी चुकीची किंवा असत्य विधानं केली आहेत. त्यासाठी त्यांनी हवाला दिलाय तो ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या Fact-Checker blog चा. या ब्लॉगनं डॉनाल्ड ट्रम्प यांची अनेक असत्य, चुकीची विधानं मोजली आहेत. नुकत्याच झालेल्या मिशिगनमधल्या रॅलीमध्ये ट्रम्प यांनी अशा फेकमफाकीचा विक्रम प्रस्थापित केला. तो म्हणजे - जवळपास सव्वा वर्षांत ३,००० वेळा खोटं बोलण्याचा.

त्यावर क्रिस यांनी म्हटलं आहे की, ट्रम्प दर दिवशी सहाहून अधिक वेळा खोटं बोलतात. पण इतकं करूनही ट्रम्प यांचं पोट, मन भरत नसावं. म्हणून त्यांनी मागच्या दोन महिन्यांत आपला खोटं बोलण्याचा वेग वाढवून स्वत:चाच विक्रम मोडीत काढलाय. मागच्या दोन महिन्यांत ट्रम्प दर दिवशी साधारणपणे नऊ वेळा खोटं बोलले आहेत. ही माहितीही क्रिस यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या Fact-Checker blogचा हवाला देत दिली आहे.

ट्रम्प यांना सत्याचं वावडं असणं हे साहजिक आहे. दुसरं असं की, अमेरिकेच्या आजवरच्या कुठल्याही राष्ट्राध्यक्षाच्या खोटेपणाची अशी बित्तंबातमी कुठल्याही प्रसारमाध्यमानं ठेवलेली नाही. तेही साहजिक आहे. कारण आजवरचा अमेरिकेचा कुठलाही राष्ट्राध्यक्ष हा ‘पोस्ट ट्रुथ’ काळातला नव्हता. अगदी बराक ओबामा हे सोशल मीडियाच्या काळात सलग दोन वेळा राष्ट्राध्यक्ष झाले, पण त्यांनीही असा प्रकार केला नाही. त्यांच्या पूर्णपणे विरुद्ध उदाहरण म्हणून क्रिस यांनी जॉर्ज डब्ल्यू बुश यांचाही दाखला दिला आहे. त्यांनी दर दिवशी अशी खोटी विधानं केली नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे. ट्रम्प मात्र दर रोज नित्यनेमानं ‘खोटं बोल, पण रेटून बोल’ हा उद्योग करत आहेत.

क्रिस यांनी पुढे काही गमतीशीर उदाहरणं दिली आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, शास्त्रज्ञ आणि आरोग्य सल्लागार यांच्या मतानुसार माणूस दिवसात फार तर सहा किंवा सात वेळा लघवीला जातो. म्हणजे अमेरिकन माणूस ज्या ज्या वेळेला सहजपणे लघवीला जातो, त्याप्रमाणे ट्रम्प सत्याची प्रत्येक वेळेला वासलात लावतात किंवा त्याच्यापासून फारकत घेतात.

दुसरं उदाहरण आहे पाणी पिण्याचं. दिवसभरात एक माणूस साधारणपणे आठ ग्लास पाणी पिऊ शकतो. पण आपण साधारणपणे सहाच ग्लास पाणी पितो. ज्या ज्या वेळेला अमेरिकन माणूस ग्लासातला पाण्याचा शेवटचा थेंब पितो, त्याचप्रमाणे युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असत्य बोलतात.

क्रिस म्हणतात, हे उल्लेखनीय आहे. ट्रम्प यांचा खोटं बोलण्याचा वेग जबरदस्त आहे. अभूतपूर्व आहे. आणि हे थांबवणं खूप खूप कठीण आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4446

.............................................................................................................................................

एफबीआय (Federal Bureau of Investigation या अमेरिकन गुप्तचर संस्थेचे प्रमुख जेम्स कॉमे यांनी सीएनएनच्या अँडरसन कूपर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांच्या असत्य पुराणाविषयी म्हटलं आहे की – “(Trump's) style of conversation was a series of assertions about great things he had done. The challenge I found was that they wash over you like a wave and even if you disagree, the waves keep coming. But that is the style, it's 'I'm great, I'm great, I'm great.”

कॉमे यांचं म्हणणं होतं की, तुम्ही ट्रम्प यांचं प्रत्येक असत्य विधान किंवा सत्यापलाप किंवा अतिशयोक्ती शोधून काढून टाकायचा प्रयत्न केला तर तुम्ही त्यांना थांबवू शकता. पण गडबड अशी आहे की, जो राष्ट्राध्यक्ष दिवसात सहा किंवा नऊ वेळा असत्य ठोकून देत असेल तर ते शोधून काढणं तसं कठीणच जाणार, होणार. कारण यासाठी अमेरिकेतल्या प्रत्येक प्रसारमाध्यमाला काही माणसं केवळ ट्रम्प यांच्या असत्य पुराणावर नजर ठेवण्यासाठीच नेमावी लागतील. शिवाय त्यांनी सकाळच्या ट्रम्प यांच्या असत्य विधानांचा पर्दाफाश करेपर्यंत त्यांनी अजून काही विधानं ठोकून दिलेली असतात. त्यांचा पर्दाफाश करेपर्यंत अजून काही.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं हे असत्य पुराण माध्यमातल्या लोकांवर काही परिणाम करत नाही. क्रिस यांच्यासारखे पत्रकार किंवा ‘वॉशिंग्टन पोस्ट’सारखी दैनिकं ट्रम्प यांच्या असत्य पुराणाची रोजच्या रोज चिरफाड करत असतात. ‘वॉशिंग्टन पोस्ट’नं तर Fact Checker Blogच तयार केला आहे. त्याचा नेमका काय परिणाम होतो. क्रिस सांगतात, एकीकडे असत्य विधानं करत ट्रम्प प्रसारमाध्यमांवर आगपाखड करत असतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांना मतदान केलेले अमेरिकन मात्र त्यांच्या असत्य पुराणावर विश्वास ठेवतात. हे विश्वास ठेवण्याचं प्रमाण १०० टक्के असल्याचं क्रिस यांचं म्हणणं आहे.

जेवढी अमेरिकेतील प्रसारमाध्यमं ट्रम्प यांच्या असत्य विधानांना उघडं पाडायचा काम करतात, तेवढीच अमेरिकन जनता किंवा ट्रम्प यांचे भक्त त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतात. क्रिस म्हणतात हे आजघडीला अमेरिकेतलं सर्वांत मोठं आव्हान आहे.

सत्याचं भान, वास्तवाचं भान या गोष्टी इतिहासजमा होत चालल्या आहेत. अमेरिकन माणूस जेव्हा जेव्हा लघवी करण्यासाठी बाथरूममध्ये जातो, तेवढ्या वेळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एखादं असत्य विधान ठोकून देतात.

हे चक्र असं अव्याहत चालूच आहे अमेरिकेत. ते ट्रम्प राष्ट्राध्यक्ष आहेत तोवर चालूच राहणार आहे. ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यापासून त्यांनी केलेली सर्वांत उल्लेखनीय कामगिरीहीसुद्धा हीच आहे. बेमूर्वत हेकेखोरपणा, आगखाऊ विधानं, विनाकारण अगोचरपणा आणि सत्यापलाप हेच ट्रम्प रोजच्या रोज करत असतात. पण तुम्हा पाहाल तर अजूनही सर्वसाधारण माणसाला याचा फारसा तोटा वा त्रास होताना दिसत नाही. त्यामुळे आपलं दैनंदिन जीवन त्रासदायक होतंय असं त्यांना वाटत नाही. अमेरिकन प्रसारमाध्यमं ट्रम्प यांच्या असत्य पुराणाविषयी रोजच्या रोज काही ना काही टीका करत असतात. पण त्याचाही फारसा प्रभाव सर्वसाधारण अमेरिकन माणसावर पडतोय असं दिसत नाही.

कारण तसं मानायला पुष्कळ कारणं आहेत. अमेरिकन माणूस अजूनही ट्रम्पच्या विरोधात फारसा संघटितपणे रस्त्यावर उतरताना दिसत नाही. अधूनमधून काही लोक किंवा काही संस्था ट्रम्प यांचा निषेध करतात. त्यांच्याविषयी निदर्शने करतात. मोर्चे काढतात. पण त्यांचं प्रमाण अल्पस्वल्प म्हणावं असंच आहे.

त्यामुळे ‘खोटं बोल, पण रेटून बोल’ हा उद्योग करायला ट्रम्प यांना मोकळं रानच रान आहे. शिवाय ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लागून गेले आहेत. त्यांना काहीही म्हटलं तरी त्याची बातमी होते. त्याची जगभरात दखल घेतली जाते. तशी त्यातल्या फोलपणाचं घेतली जात नाही. तसं होणं शक्य नाही. त्यामुळे ट्रम्प यांचा असत्य पुराणाचा कारखाना चालूच राहणार आहे, पायउतार होईपर्यंत. तोवर असत्य हेच जगमान्य सत्य म्हणून कदाचित प्रस्थापित झालेलं असेल. किंवा अमेरिकामान्य सत्य म्हणून तरी प्रस्थापित झालेलं असेल.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

vishal pawar

Fri , 27 July 2018


Girish Khare

Sun , 22 July 2018

आणि आपले स्वयंघोषित पुरोगामी लोक किती वेळा खोटे बोलले असतील याची गणती आहे का?


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......