टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नारायण राणे, मनोहर पर्रीकर, ट्रम्प समर्थक आणि अरविंद केजरीवाल
  • Tue , 29 November 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नारायण राणे Narayan Rane मनोहर पर्रीकर Manohar Parrikar अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal

१. संरक्षण मंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा संरक्षण खात्याच्या कार्यालयात गेलो, तेव्हा मी थरथरत होतो. पण, मी तेव्हा शूर असल्याचा आव आणत होतो : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर.

फेणीच्या प्रदेशातून जाणाऱ्या माणसाने हातपाय थरथरत असताना शौर्याचा आव आणण्याचा प्रयत्न करण्याचे अर्थ किती वेगळे लागू शकले असते पर्रीकर. आता तुम्ही चांगलेच रुळलेले दिसता. आता तुम्ही कधी काय बोलून बसाल आणि कशाकशाचे खुलासे करत बसायला लागाल, या कल्पनेने लष्करी उच्चाधिकारी आणि प्रवक्ते थरथरत असतात म्हणे!

………………

२. काँग्रेसमध्ये वशिल्यावर पदं दिली जातात. सरकारविरुद्ध काँग्रेस आक्रमक नसून ठोस भूमिका घेण्यात कमी पडत आहे. काँग्रेसचे प्रदेश नेतृत्व गंभीर नाही. काँग्रेसमध्ये गुणवत्ता बघून पदं दिली जात नाहीत, असे टीकास्त्र काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी कोकणात स्वबळावर विजय प्राप्त केल्याबरोब्बर सोडले!  

दादानु, काँग्रेस राज्यात 'गुणवत्ते'नुसार पदे देण्याचा धोका का पत्करत नाही, याचा खुलासा तुमच्या याच वक्तव्यातून होतो, हे लक्षात आलं का? नगरपालिका निवडणुका जिंकल्यावर तुम्ही इतकं बोलता, आणखी मोठं यश मिळालं तर आणखी काय काय बोलाल, कराल, याचीच भीती वाटते हो त्यांना.

………………

३. मुंबईतील नागरिकांना मोदी यांचं भाषण ऐकता यावं, म्हणून भाजपतर्फे ‘मन की बात’, ‘चाय के साथ’ कार्यक्रमांचं आयोजन. एक खास बनावटीची छत्री, बसण्यासाठी आसनं, भाषण ऐकण्यासाठी ध्वनिक्षेपक आणि सोबत चहा अशा स्वरूपाचा हा उपक्रम मुंबई व उपनगरात ३२८ ठिकाणी राबवण्यात आला.

खुर्चीवाले, ध्वनीयंत्रणावाले आणि चहावाला यांना चेकने पैसे दिले की पेटीएमने, त्याचा खुलासा नाही बातमीत. की शाखाशाखांवर आधीच कॅशचा बंदोबस्त करून ठेवला होता? बँकांपुढच्या रांगांची स्थिती सुधारली नाही, तर पुढचा कार्यक्रम मन की बात, चाय-नाश्ता-दोपहर के भोजन के साथ असं स्वरूप करायला लागेल कार्यक्रमाचं!

………………

४. अमेरिकेत पेनसिल्वेनियाकडे निघालेल्या विमानात नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकाचा गोंधळ; या तरुणाने आसनांमधल्या जागेत उभे राहून हिलरी क्लिंटन यांच्या समर्थकांचा अवमान करणारा आरडाओरडा केला. त्याच्यावर कारवाई न केल्याबद्दल विमान कंपनीनं माफी मागितली आहे. 

चला, आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही 'भक्त'संप्रदाय मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे तर. यांच्यापुढे आता हळूहळू खुद्द ट्रम्पतात्या मवाळ वाटू लागतील.

………………

५. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे खासदार महेश शर्मा यांच्या मुलीच्या लग्नावरून ट्विटरवर त्यांची टर उडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, केजरीवाल यांनी लग्नाचे बिनचूक तपशील न घेता आरोप केल्यामुळे आणि शर्मा यांनी लग्नाचा खर्च धनादेशाद्वारे केला जात असल्याचं सांगितल्यामुळे केजरीवाल तोंडघशी पडले.

आरोपासाठी आरोप करत बसणं हे एकवेळ राजकारणाचा भाग म्हणून मान्य करता येऊ शकतं; पण, एका महत्त्वाच्या राज्याच्या जबाबदार मुख्यमंत्र्याने साधी माहिती न घेता काहीही आरोप करणं, हे त्या पदाची शोभा घालवणारं आहे. इतरांना सच्छिलतेचे धडे देणाऱ्यांनी तरी या चुका करून जोकर बनून करता कामा नये.

editor@aksharnama.com

Post Comment

Nilesh Pashte

Tue , 29 November 2016

केजरीवालांना आवरारे कुणीतरी !! :-) :-)


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......