‘पुणेरी पगडी’ व जातिव्यवस्था 
पडघम - राज्यकारण
अन्वर राजन
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांचे स्वागत आधी ‘पुणेरी पगडी’ने आणि नंतर ‘फुले पगडी’ने
  • Thu , 14 June 2018
  • पडघम राज्यकारण शरद पवार Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस Nationalist Congress Party NCP छगन भुजबळ Chhagan Bhujbal पुणेरी पगडी Puneri pagdi फुले पगडी Phule pagdi

नुकतेच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात छगन भुजबळ व शरद पवार यांचे स्वागत ‘पुणेरी पगडी’ने करण्यात आले. त्यावरून पवारांनी कानपिचक्या दिल्या. लगेच ‘फुले पगडी’ हजर करण्यात आली. पुन्हा पाहुण्यांचे स्वागत ‘फुले पगडी’ने झाले. थेट ‘फुले पगडी’ने स्वागत झाले असते, तर त्याची कदाचित तेवढी दखल घेतली गेली नसती. जणू काय ठरवून केले असावे असे हे नाट्य पार पडले. वाहिन्यांना चघळायला विषय मिळाला. पवारांनी या घटनेतून आपण कोणाच्या बाजूने असणार आहोत याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. 

आपल्या येथे ‘अठरापगड जाती’ हा शब्द प्रयोग प्रचलित आहे. एकेकाळी सर्व लोक पगडी बांधायचे, पण कोणत्या जातीने कोणत्या पद्धतीची पगडी बांधायची, याचे संकेत सर्वांना माहीत होते. ही मर्यादा कोणीही ओलांडत नसत. प्रत्येक जण आपापल्या पायरीने राहायचा. त्यामुळे सारे कसे सुरळीत चालू होते.

इंग्रज आले. त्यांनी शिक्षण सार्वत्रिक केले. अनेक गट एरवी विद्या प्राप्त करण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते. ते शिक्षणाच्या परिघात आले. परदेशी साहेबांच्या हॅट नावाच्या टोप्याही आल्या. त्या पूर्वी आलेल्या तुर्क, मोगल, अफगाणी व इतर अनेकांनी आपल्या सोबत पगड्या आणल्या. राजाच्या पगड्या रुबाबदार तर उतरत्या क्रमानं प्रधान मंडळ, दरबारी, सेनापती, सैनिक व आम जनता यांच्या पगड्या क्रमाने साधेपणाकडे सरकणाऱ्या असायच्या. शिक्षणाची संधी प्रथमच मिळालेल्या अनेकांनी जातिव्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित केले. काहींनी समर्थन केले, तर अनेकांनी त्याच्या विरोधात आवाज उठवला. अर्थात सनातनी व सुधारक आमनेसामने होते, पण पगड्या सर्वांच्या आपापल्या जातीच्या परंपरेप्रमाणेच होत्या. 

महात्मा गांधींनी इंग्रजांच्या विरोधात आंदोलन केले. अनेक जण तुरुंगात गेले. तुरुंगात कैद्यांना जी टोपी घालावी लागत होती, तिला प्रतिष्ठा प्राप्त झाली. ती ‘गांधी टोपी’ या नावाने लोकप्रिय झाली. जातीनिहाय ‘पगडी’ सोडून अनेकांनी ‘गांधी टोपी’चा स्वीकार केला. स्वातंत्र्य चळवळीत ‘गांधी टोपी’ला केवळ प्रतिष्ठाच नव्हे तर पावित्र्यही प्राप्त झाले.

.............................................................................................................................................

‘मार्टिन लुथर किंग’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4421

.............................................................................................................................................

याच काळात ब्राह्मणेतर चळवळ महाराष्ट्रात जोर धरत होती. महात्मा फुले यांनी जातिव्यवस्थेवर कठोर प्रहार केले. त्यांच्या निधनानंतर पुढे ती चळवळ ब्राह्मणेतर चळवळीत रूपांतरित झाली. छत्रपती शाहू महाराज यांची पगडीसह छायाचित्रं पाहायला मिळतात, पण या चळवळीतील इतर नेत्यांची छायाचित्रं ‘गांधी टोपी’ किंवा कुठल्याही टोपी\पगडीशिवायची दिसतात. 

अलीकडच्या काळात समारंभात पाहुण्यांचे स्वागत करताना पुणेरी पगडी, फुले पगडी, मावळे पगडी डोक्यावर ठेवली जाते. बहुजन समाजाच्या लग्नसमारंभात फेटे बांधले जातात. त्यातही केशरी फेटे जास्त लोकप्रिय. पूर्वी लग्नात टोपी आणि रुमाल दिले जायचे. आता फेटे. फेटे बांधणारे खास कारागीर असा सरंजाम असतो. तर ब्राह्मणांच्या लग्नात (काही अपवाद वगळता) पुणेरी पगडी घातली जाते. ती महाग असल्यानं सर्वांना देता येत नाही, म्हणून परिवारातील ज्येष्ठांनाच ती घालून मिरवत येते. नवरदेव पेशवे घालत तशी पगडी घालतात. पुण्यासारख्या शहरात तर लग्नाची वेळ पण जातीनिहाय वेगळी असते. ब्राह्मणाचे लग्न सकाळी १०/१०:१५ ला लग्न लागले की, भराभर जेवण करून नोकरदार वर्ग कामावर रुजू, तर बहुजन समाजाचे लग्नकार्य संध्याकाळी. तिसरे-चौथे मंगलाष्टक झाले की, भराभर मंडप रिकामा होतो. पुढाऱ्यांना दुसरे, तिसरे लग्नकार्य गाठायचे असते. असो. 

पुण्याच्या महापौरांना अंगरक्षक दिला जातो. तो मावळे पगडी घालतो. काही हॉटेल, मंगल कार्यालयाचे वॉचमन मावळे पगडी घालतात. काही वर्षांपूर्वी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेटरला पुणेरी पगडी असलेला गणवेश दिला. त्यावर मोठे काहूर माजले. हॉटेल व्यवस्थापकांनी माफी मागितली व पुणेरी पगडी वेटरसाठी न वापरण्याचे कबूल केले.

पुणेरी पगडी विद्वानांनी आणि मावळे पगडी सेवकांनी वापरावी, अशी ही विभागणी आहे. पवारांनी ‘पुणेरी पगडी’ नाकारली, त्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. एकाने म्हटले आहे- ‘बरे झाले, पुणेरी पगडीचा अपमान टळला.’ अहिताग्नी राजवाडे यांनी आपल्या आत्मचरित्रात अस्पृश्य जाती-जमातींनी मुसलमान झाल्याबद्दल ‘बरे झाले, घाण गेली’ असे विधान केले आहे. ही कुजकी मानसिकता पुणेरी पगडीवरच्या चर्चेमुळे पुन्हा दिसून आली. 

.............................................................................................................................................

लेखक अन्वर राजन सामाजिक कार्यकर्ते आहेत.

rajanaaa@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 14 June 2018

अन्वर राजन, एक विचारेन म्हणतो. अहिताग्नी राजवाडे कुजकट बोलले हे खरंय. मात्र नेमका हाच युक्तिवाद भारताच्या फाळणीच्या समर्थनार्थ केला जातो. गेले ना मुसलमान तिकडे, बरं झालं एकदाचं. राजवाडे कुजकट बोलले तर फाळणीवादी सुद्धा कुजकट समजावेत का? तुमचे विचार वाचायला आवडतील. विचार करून सांगा. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......