अजूनकाही
फिडेल कॅस्ट्रो (१३ ऑगस्ट १९२६ ते २५ नोव्हेंबर २०१६). आजच्या जगातला सर्वाधिक मान्यवर क्रांतिकारिक नेता. विलक्षण धाडसी, कल्पनातीत निर्भय आणि अमाप लोकप्रिय असलेल्या कॅस्ट्रोने सशस्त्र संघर्षाने क्युबाला लष्करी हुकूमशाहीतून मुक्त केले. एवढेच नव्हे तर पुढची ३०-४० वर्षं त्या देशाचे नेतृत्व करून मानवजातीच्या इतिहासात आपले ठसठशीत स्थान कोरून ठेवले. फिडेलने कधीच पराभवापुढे मान तुकवली नाही. सुरुवातीचे संघर्षाचे सर्व प्रयत्न फसून, अनेक साथीदार पकडले जाऊनही फिडेलचा आत्मविश्वास कधी कमी झाला नाही. त्याला साथ देणारे तसे सहकारीही मिळाले. ९० वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य उपभोगून तो आता हे जग सोडून गेला आहे. पण तरीही तो जगभरच्या बंडखोर, क्रांतिकारी आणि अस्वस्थ तरुणांना प्रेेरणा देत राहील..
फिडेल कॅस्ट्रो वय वर्षं ३ ते २९
कॅस्ट्रो सिएरा मेस्त्राच्या पहाडी जंगलामध्ये वर्तमानपत्र वाचताना
फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा - जिवाभावाचे मित्र
कॅस्ट्रो सिएरा मेस्त्राच्या पहाडी जंगलामध्ये सहकाऱ्यासमवेत
फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा संचलन करताना
फिडेलच्या कल्पनेने झपाटलेला कॅस्ट्रो आणि त्याच्यावर स्वत:पेक्षाही जास्त विश्वास असलेले त्याचे सहकारी
फिडेल कॅस्ट्रो नोबेल विजेते अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वेसोबत, १९६०
फिडेल कॅस्ट्रो बेसबॉल खेळताना, १९६५
फिडेल कॅस्ट्रो शाळकरी मुलांसोबत...तीही त्याच्यासारखीच (खोटी) दाढी लावून त्याला भेटायला आलेली
फिडेल कॅस्ट्रो आणि सोव्हिएत रशियाचे निकिता गोर्बाचेव्ह जॉर्जियामध्ये वाईन पिताना, १९६३
दोन भेदक नजरेचे योद्धे...समोरासमोर
फिडेल कॅस्ट्रो आणि नेल्सन मंडेला
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment