वाचलीच पाहिजेत अशी काही पुस्तकं - भाग ३
ग्रंथनामा - झलक
टीम अक्षरनामा
  • पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 01 June 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक

‘अक्षरनामा’वर दर शुक्रवारी मराठी पुस्तकांची परीक्षणे, त्यातील काही भाग किंवा संबंधित लेखकांच्या मुलाखती प्रकाशित होतात. मार्च २०१८ या महिन्यात ‘अक्षरनामा’वर आलेल्या पुस्तकांविषयी...

.............................................................................................................................................

बाबा ‘अनप्रेडिक्टेबल’ आहे, पण तो फटकून राहणारा नाही, तर बरोबर घेऊन जाणारा आहे - प्रदीपकुमार माने

बाबा (अवचट) हा या दृष्टीनं पाहावयास गेल्यास ‘अनप्रेडिक्टेबल’ आहे, पण हा त्याचा अनप्रेडिक्टेबलपणा, छांदिष्टपणा जगाशी फटकून राहणारा नाही, तर जगाला बरोबर घेऊन जाणारा आहे. आम्ही त्याच्या साहित्यिक, सामाजिक आणि कलात्मक या तिन्ही पैलूंचा परिचय या माहितीपटात करून दिला आहे. विशेष गोष्ट म्हणजे ते तिन्ही पैलू एकमेकात इतके अलगदपणे मिसळले आहेत की, त्यांना वेगळं करणं अवघड आहे.

डॉ. अनिल अवचटांच्या पुस्तकांच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://bit.ly/2FJw7OZ

.............................................................................................................................................

‘सिनेमास्केप’ वाचताना लक्षात घेण्याजोगी आहे, आजच्या बदलत्या काळाची, विचाराची पार्श्वभूमी - गणेश मतकरी

या पुस्तकाला ‘सिनेमास्केप’ हे नाव देण्यामागे दोन कारणं आहेत. पहिलं हे की ‘सिनेमॅटिक’मध्ये ज्या पद्धतीचे लेख आहेत, त्याच प्रकाराला हे पुस्तक पुढे नेतं, त्यामुळे नावातलं साधर्म्य हे त्या दिशेचा निर्देश करणारं. ‘सिनेमास्केप’ हे नाव देण्यामागचं दुसरं कारण आहे, ते त्या शब्दातून ध्वनित होणाऱ्या अर्थाशी संबंधित. चित्रपटाचा प्रांत, परिसर या दृष्टीनं हा शब्दप्रयोग वापरण्यात आला आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4391

.............................................................................................................................................

विशाल अवकाशाचं दर्शन घडवणारी कळवळ्याची ‘धूळपेर’ - अतुल देऊळगावकर

‘धूळपेर’मधील प्रत्येक निबंध हा अत्यल्प शब्दात अतिशय विशाल अवकाशाचं दर्शन घडवणारा आहे. त्यात अनेक चित्रपटांची, शोधनिबंधांची बीजं आहेत. कुठलाही निबंध कधीही वाचला तरी पुस्तक हातातून सुटत नाही. वाचल्यावर आपण होतो तसे रहात नाही. सद्यकाळातील वाढत जाणारे आत्ममग्नता आणि असंवेदनशीलता यांचं पीक पाहून आसाराम वेदनेनं व्याकूळ झाला आहे. आपलीही अवस्था सैरभैर होऊन जाते..

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/2453

.............................................................................................................................................

‘भंगार’मध्ये पानोपानी ऊर्जा भरली आहे; ती कानोकानी गेल्याशिवाय राहणार नाही - डॉ. सुनीलकुमार लवटे

‘भंगार’ वाचताना गोसावी समाजाचा कायाकल्प करणारा एक चित्रपट वाचकांच्या मनापुढे झरझर सरकत राहतो. त्या अर्थानं ‘भंगार’ आत्मचरित्र हे समांतर विकसित होत समाजचित्र जिवंत करतं. मराठी वाचक ‘भंगार’ वाचतील तर त्यांच्या मनात समाज बदलाचे अंगार फुलल्याशिवाय राहणार नाहीत. ती ऊर्जा या पुस्तकात पानोपानी भरली आहे; ती उद्या कानोकानी गेल्याशिवाय राहणार नाही...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4301

.............................................................................................................................................

बाटलीतल्या राक्षशिणीचं मनोगत - इरावती कर्णिक

बाहेरचं जग कसं असेल? तिथं आयुष्याला अर्थ असेल का नसेल? ते आपल्याबद्दल असेल का नसेल? आपल्याला माहीत नसलेलं तिथे किती असेल? कोणास ठाऊक, कदाचित तिथं आपल्याला न सुचणारे प्रश्नही असतील तर? आणि उत्तरं मिळण्यासारखी असतात. बाटलीतून बाहेर पडून फक्त त्याआधी ती आडवी पाडावी लागणार. सगळं सुरळीत चालू असताना गदागदा हलवून बॅलन्स घालवावा लागणार.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4392

.............................................................................................................................................

‘स्पेशल’ मुलांचे भवितव्य - अरुणा शहानी

मरण अटळ आहे. म्हणजे अशा परिस्थितीला तोंड देणे अटळ, अपरिहार्यच आहे. अशा प्रसंगी एका ‘स्पेशल’ मुलांच्या वडिलांनी काढलेले उद्गार मला आठवतात. ते म्हणाले होते, “माझी देवाकडे प्रार्थना आहे, “देवा, माझे डोळे मिटण्याआधी या मुलाचे डोळे मिटावेत.” वरवर पाहता हे उद्गार क्रूर वाटण्याची शक्यता आहे. पण वडिलांच्या मनात मुलाच्या भविष्याविषयी असलेल्या काळजीपोटीच हे उद्गार निघालेले आहेत.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4394

.............................................................................................................................................

भारत : अस्वाभाविक राष्ट्र आणि अस्वाभाविक लोकशाही - रामचंद्र गुहा

आधुनिक भारताचे इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा शारदा साठे यांनी मराठी अनुवाद केला आहे. तो नुकताच रोहन प्रकाशनाद्वारे प्रकाशित झाला आहे. एक अस्वाभाविक राष्ट्र आणि अस्वाभाविक अशी लोकशाही प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणती वैचारिक मांडणी कारणीभूत झाली हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्यांना डोळ्यासमोर ठेवून प्रस्तुत ग्रंथ निर्माण केला आहे..

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4372

.............................................................................................................................................

व्यावसायिक नीतीमत्ता आणि स्पर्धेशी झगडणाऱ्या कथा - राजन मांडवगणे

या कथासंग्रहातल्या कथा आंतरराष्ट्रीय कंपन्यांची व्यावसायिक नीतीमत्ता आणि स्पर्धेच्या जगातला वेग यांच्याशी जुळवून घेण्याचा, तसेच नशिबाला दोष न देता आपला मार्ग स्वतः शोधायचा प्रयत्न करणाऱ्या आहेत. शहरी जीवनावरच्या, त्यातूनही कॉर्पोरेट जगातल्या या कथांमधल्या पात्रांचे प्रश्न हे भाषा आणि प्रांतापलीकडचे आहेत.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4395

.............................................................................................................................................

बंडखोरीकडून वेगानं आत्मशोधाकडे जाणारी कविता : वेदिका कुमारस्वामी - अश्विनी दासेगौडा - देशपांडे

फेसबुकच्या आजवरच्या इतिहासात कुणाच्या कवितांची प्रचंड चर्चा झाली? फेसबुकवच्या आजवरच्या इतिहासात कुठल्या कवयित्रीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली? फेसबुकवरच्या आजवरच्या इतिहासात ‘ही कवयित्री नेमकी कोण?’ याविषयी अनंत तर्क लढवले गेले? फेसबुकच्या आजवरच्या इतिहासात कुणाच्या कविता प्रचंड प्रमाणावर वाचल्या गेल्या? या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे - वेदिका कुमारस्वामी.

............................................................................................................................................

तोच आहे माझ्या स्वप्नातला राजकुमार, नसेना का त्याच्याकडे ‘काचेचा रथ!’ - जेन हॉकिंग

जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं आज इंग्लंडमध्ये वयाच्या ७६व्या वर्षी निधन झालं. त्यांची प्रथम पत्नी जेन हॉकिंग यांनी ‘ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी : माय लाइफ विथ स्टीफन’ या नावानं आपलं आत्मचरित्र इंग्रजीमध्ये लिहिलं आहे. हे इंग्रजी आत्मचरित्र व त्याचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसनं प्रकाशित केला आहे. हा मराठी अनुवाद सुदर्शन आठवले यांनी केला आहे.

‘ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी - माय लाइफ विथ स्टीफन’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4396

‘काळाचा छोटासा इतिहास’ या स्टीफन हॉकिंग यांच्या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/3014

.............................................................................................................................................

श्रीकृष्ण तुमच्या-आमच्यासारखा मनुष्य असून, स्वप्रयत्नाने त्याने परमेश्‍वरासारखा आदरभाव संपादन केला - डॉ. सदानंद मोरे

कृष्ण तुमच्या-आमच्यासारखा मनुष्य असून, स्वप्रयत्नाच्या बळावर त्याने परमेश्‍वरासारखा आदरभाव संपादन केला, अशी भूमिका घेतली तर त्याने केलेल्या कृती मानवी क्षमतेच्या कक्षेत येऊन त्यांचे अनुकरण करणे शक्य होते. हा दैवी अवतरण (खाली येणे) आणि मानवी आरोहण यांच्यातील फरक आहे. कृष्णचरित्राची ही दोन प्रारूपे आपल्यापुढे आहेत. पहिल्या प्रारूपात तो भज्य, पूज्य, वंद्य ठरतो; तर दुसर्‍यात तो अनुकरणीय आदर्श बनतो.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4398

.............................................................................................................................................

वीरा राठोडचं लेखन अधिक आश्वासक व प्रसन्न करणारं आहे - संजय पवार

वीरा राठोड फुले अमुक साली हे म्हणतात, बाबासाहेबांनी अमुक साली हे भाषण केलं, मार्क्स म्हणतो, शाहू अमुक साली तमुक करतात अशी सनावळीही देत नाहीत. याऐवजी ते शिक्षण तज्ज्ञांपासून, शास्त्रज्ञांपासून, खेळाडू, कलावंत यांना उद्धृत करतात. त्यातून काही अपरिचित इतिहास, मुद्दे कळतात. हे ‘अपरिचित’ मांडून आधुनिक इतिहासात नोंद करण्याची कामगिरी ते जाता जाता करतात..

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4399

.............................................................................................................................................

हे पुस्तक शिष्टाईचा विविधरंगी, विविधढंगी कॅलिडोस्कोप आहे! - ज्ञानेश्वर मुळे

विजय नाईक यांच्या याआधीच्या ‘साउथ ब्लॉक, दिल्ली- शिष्टाईचे अंतरंग’ या लोकप्रिय पुस्तकानंतर ते ‘शिष्टाईचे इंद्रधनू’ घेऊन मराठी वाचकांना भेटायला येत आहेत, हे आपल्या मराठीचं भाग्य आहे. यामुळे मराठी माणसाला एका अपरिचित विश्वातील कंगोरे तर कळतीलच, पण अशा पुस्तकांमुळे भाषेलाही श्रीमंती येते हे विसरता कामा नये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4400

.............................................................................................................................................

पक्ष्यांची किलबिल ऐकली, पक्षी-फुलपाखरे स्वछंद नाचताना दिसली की, आई-बाबा आमच्याबरोबर हसत-बोलत आहेत, असे वाटते - डॉ. निरुपमा व सुषमा गोविंद तळवलकर

आता आमचे आई-बाबा नाहीत; पण अजूनही पहाटे पक्ष्यांची किलबिल ऐकली, ब्लू जे, कार्डिनल व रंगीबेरंगी पक्षी, फुलपाखरे स्वछंद नाचताना, पंख फडफडवताना दिसली, समोरच अंगणात वा रस्त्यांत हरणे बागडताना दिसली, खारी, कुत्रे वगैरे प्राणीमित्र भेटले, ठरावीक वेळेला बदकांची मालिका आकाशात दिसली, मोर नाचताना पाहिला व कोकिळेचे सुस्वर गायन ऐकले की, आई-बाबाही सदैव आमच्यातच आहेत, आमच्याबरोबर हसत-बोलत आहेत, असे वाटते.

या पु्स्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4401

.............................................................................................................................................

दु:खांना हसावयाचे, ती हसण्यावारी न्यावयाची, हसून हसून ती विसरून जावयाचे, हा विनोदाचा खरा हेतू आहे - प्रदीप कुलकर्णी

विनोदामध्ये कलाटणी देण्याचं काम ‘पंच लाइन’ करते. श्रोत्यांना या कलाटणीचा थोडासा जरी सुगावा लागला, तरी एखाद्या फुग्यातली हवा निघून जावी तशी विनोदातली गंमत निघून जाते. म्हणूनच हास्यनिर्मितीमध्ये अचानकपणे आणि अनपेक्षितपणे मिळालेल्या कलाटणीला महत्त्व असतं. अपेक्षा आणि त्यांना मिळालेली कलाटणी यांच्यातील दरी जेवढी मोठी, तेवढा हास्याचा स्फोट अधिक मोठा.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4371

.............................................................................................................................................

‘आपले विचारविश्व’ :  गेल्या दशकातील मराठीतील एक सर्वोत्तम पुस्तक - टीम अक्षरनामा

गेल्या दशकभरात मराठीमध्ये तत्त्वज्ञानपर जी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, त्यातील हे पुस्तक सर्वोत्तम म्हणावं लागेल. ज्या पुस्तकाला इतक्या भिन्न प्रवृत्तीची लेखक\अभ्यासक\पत्रकार\वाचक मंडळी गौरवतात, ते पुस्तक नक्कीच डावं असू शकत नाही, हेही नमूद करायला हवं. त्यामुळे या पुस्तकाचं वाचन करणं हे शिरवाडकरांनी आपल्यावर करून ठेवलेल्या ऋणातून उतराई होण्यासारखंच आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4405

.............................................................................................................................................

‘लीळा पुस्तकांच्या’ : समाजाकडे, संस्कृतीकडे, स्वत:कडे बघण्याची एक खिडकी - नितिन भरत वाघ

जर आपण पुस्तकांना आणि पुस्तक संस्कृतीला समाजशास्त्रीय मूल्यमापनाचं ‘एकक’ गृहित धरत असू आणि त्याचं प्रमाण इतकं अत्यल्प असेल, त्यावरून लक्षात येतं ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक किती महत्त्वाचं आहे. हे पुस्तक केवळ पुस्तकांच्या जगाविषयी किंवा पुस्तकांविषयी माहिती देत नाही तर समाजाकडे, संस्कृतीकडे, स्वत:कडे बघण्यासाठी एक खिडकी प्रदान करतं. अशी खिडकी जी कुणासाठी उघडली तर लगेच उघडेल किंवा कुणासाठी कायमची बंद राही

लीळा पुस्तकांच्या - नीतीन रिंढे, प्रकाशक - लोकवाङ्मय गृह, मुंबई,  पाने – १९२, मूल्य – २५० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3383

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......