अजूनकाही
जगभरात विविध देशांमध्ये शास्त्रज्ञ अचाट असे नवनवे शोध लावत आहेत, अफलातून नवे सिद्धान्त मांडत आहेत. अशाच काही नजीकच्या काळातील महत्त्वाच्या, इंटरेस्टिंग, विज्ञानविषयक घडामोडींची माहिती...
१. ‘थँक्सगीव्हिंग’ हा सण अमेरिकेत मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. यंदा हा दिवस २४ नोव्हेंबर रोजी साजरा केला गेला. यानिमित्तानं विखुरलेलं कुटुंब मेजवानीसाठी एकत्र येतं आणि वर्ष संपत आल्याची जाणीव सर्वांना होऊ लागते. वर्षाखेरीच्या निमित्तानं ‘न्यू यॉर्क टाईम्स’ने या वर्षभरात त्यांनी प्रकाशित केलेल्या महत्त्वाच्या विज्ञानविषयक लेखांचा आढावा ‘थिस थँक्सगीव्हिंग बी थँकफुल फॉर सायन्स’ या लेखात घेतला आहे.
यात वजन कमी करण्यामागचे शास्त्र उलगडणारे आणि त्यावर नवीन प्रकाश टाकणारे विविध लेख अक्षरशः आपल्याला खडबडून जागं करणारे आहेत. खूप वाढलेलं वजन कमी करणं इतकं अवघड का असतं आणि चित्रविचित्र डायट करून वजन कमी केलं, तरीही ते पुन्हा वाढू न देणं किती जिकिरीचं आहे, हे या लेखांत स्पष्ट करून सांगितलं आहे.
काही निवडक आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि अतिश्रीमंत व्यावसायिक (जसे की अमेझॉनचे जेफ बेझोस आणि टेस्ला मोटर्सचे इलॉन मस्क) अंतराळातील पर्यटन, परग्रहावर मानवी वसाहत निर्माण करणं यावर संशोधन करत आहेत, त्यासंबंधित तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मोठी गुंतवणूक करत आहेत. इलॉन मस्क यांचं म्हणणं आहे की, येत्या ४० ते १०० वर्षांत मनुष्य प्राणी इतर ग्रहांवर वास्तव करणारा प्राणी बनेल.
याबरोबरच पुरातत्वशास्त्रीय शोधांमधून पुढे आलेली नवीन माहिती आणि कुत्र्यांच्या उत्क्रांतीबद्दल अफलातून अशी माहिती वाचायला मिळते.
हा लेख सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.
http://www.nytimes.com/2016/11/21/science/thanksgiving-science.html?_r=0
.................
२. एके काळी डायनासॉर प्रजातीचे प्राणी पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात नांदत होते. परंतु ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी एक महाकाय उल्का पृथ्वीवर येऊन आदळली आणि त्यातून आलेल्या प्रलयात डायनासॉर नष्ट झाले, हा सिद्धान्त आपण अनेकदा ऐकलेला आहे. परंतु ही उल्का पृथ्वीवर पडली असताना नक्की काय घडलं याबद्दल तपशीलवार सिद्धान्त आता शास्त्रज्ञांनी मांडला आहे. आणि यातली माहिती अक्षरशः धक्कादायक आहे. ही उल्का पडल्यावर ६० मैल रुंदी असलेलं विवर तयार झालं आणि वर उडालेले खडक एव्हरेस्ट पर्वताच्या उंचीच्या दुप्पट उंचीवर हवेत भिरकावले गेले आणि ते खाली पडल्यावर विवराभोवती पर्वतांचं एक रिंगण तयार झालं.
एनपीआरच्या वेबसाईटवर हा लेख सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.
.................
३. वरिष्ठ भारतीय शास्त्रज्ञ प्रा. एम. जी. के. मेनन यांचं नुकतंच निधन झालं. डॉ. होमी भाभा यांचे शिष्य असलेले प्रा. मेनन इस्रोचे माजी चेअरमन होते. भारतीय शासन आणि विज्ञानक्षेत्र यांचातला दुआ म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्यांना श्रद्धांजली वाहणारा आणि त्यांच्या भरीव कार्याची ओळख करून देणारा लेख ‘हिंदू’ दैनिकाच्या वेबसाईटवर वाचू शकता.
.................
४. क्रिकेट हा आपला सर्वांचा आवडता खेळ. पण टी २० ला सुरुवात झाल्यापासून टेस्ट क्रिकेटला उतरती कळा लागली आहे. टेस्ट क्रिकेटला पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी डे-नाईट टेस्ट मॅच प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्या आहेत. या सुरू करण्याआधी चेंडू कुठल्या रंगाचा असावा जेणेकरून तो सूर्यप्रकाशात आणि तरतरी कुत्रिम प्रकाशात खेळाडूंना व्यवस्थित दिसेल यावर मोठी चर्चा झाली. अखेर गुलाबी रंगाचा नवा चेंडू बनवण्यात आला. परंतु ‘द कॉन्व्हर्सेशन’ या वेबसाईटवर क्वीन्सलँड विद्यापीठातील शास्त्रज्ञ डेरेक हेन्री आर्नल्ड यांनी यावर प्रश्नचिन्ह उभं केलं असून, गुलाबी चेंडू धोकादायक असल्याचं त्याचं म्हणणं आहे.
यामागचं विज्ञान समजून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
http://theconversation.com/pink-balls-in-day-night-cricket-could-challenge-players-at-sunset-69339
.................
५. चालकविरहीत मोटारगाड्यांची चाचणी सर्वत्र होऊ लागली आहे. गुगल, व्होल्वोसारख्या कंपन्या यात आघाडीवर आहे. परंतु अशा गाड्यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे नीतीशास्त्रीय प्रश्न उभे राहत आहेत. अपघात होत असल्यास त्या गाडीने काय करावे? गाडीतील लोकांना वाचवायचा प्रयत्न करावा का पादचाऱ्यांना वाचवावं? अशा प्रश्नांची सविस्तर चर्चा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment