अजूनकाही
पंडित जवाहरलाल नेहरू पाकिस्तानमध्ये लोकप्रियतेच्या स्पर्धेत कधीही जिंकू शकले नसते. त्याचं कारण अगदी सोपं आहे. ते म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीला त्यांनी अटीतटीचा विरोध केला होता. मात्र भारतातील सध्याच्या सत्ताधारी वर्तुळात आणि त्यांच्या निष्ठावान भक्तगणांत त्यांची जेवढी असभ्य शब्दांत निंदानालस्ती केली जाते, तेवढी अन्य कुठंही झाली नसेल. ते अधःपतित होते, दुराचारी होते. कुंटणखान्यात त्यांचा जन्म झाला होता. मरताना त्यांना गुप्तरोग झाला होता. त्यांनी एका कॅथलिक ननला विवाहबाह्य संबंधांतून गर्भवती केलं होतं. आपण काश्मिरी पंडित आहोत, असा ते दावा करायचे पण लपूनछपून कांदे खायचे. एकोणिसाव्या वर्षापासून पुढे रोज सकाळी नऊ वाजल्यापासून दारू पिऊन पडायचे. अमेरिकेतील अल्ट-राईट्स (यात वेगवेगळ्या प्रकारचे ‘हेट ग्रुप्स’ मोडतात.) जसे ठासून म्हणतात की, बराक ओबामा गुप्तपणे मुस्लिम धर्म पाळतात. त्याचप्रमाणे हिंदुत्ववादी लोकही आरोप लगावतात की, नेहरूंचे आजोबा घियासउद्दीन काझी नामक मुगल दरबारातील कोतवाल होते.
इंटरनेटवरील निनावी खोडसाळ लोक असे हल्ले करत असते, तरी फार लक्ष देण्याची गरज नव्हती. परंतु भाजप-राष्ट्रीय सरसंघचालक इत्यादी मंडळींकडून होणारे हे तीव्र हल्ले हळूहळू भारताच्या इतिहासातून नेहरूंची गच्छंती करण्याच्या दिशेनं जाऊ लागले आहेत. बेटवा शर्मा यांनी २०१६ साली माहिती दिली होती की, नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते किंवा नथुराम गोडसे या हिंदूराष्ट्रवाद्याने महात्मा गांधींची हत्या केली, हे भाजपशासित राजस्थानमधील इयत्ता आठवीच्या मुलांना शिकवलंच जात नाही. नेहरूंचं ‘नियतीनं दिलेल्या संकेताचं’ गाजलेलं भाषण काही राज्यांच्या अभ्यासक्रमातून हटवण्यात आलं आहे. ११ ऑगस्ट, १९४७ रोजी जिनांनी केलेलं सुप्रसिद्ध भाषण झिया उल हक यांच्या काळात ‘नाहीसं’ झालं होतं, त्याची आठवण यामुळे होते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
नेहरूंवरील व्यक्तिगत स्वरूपाच्या अपमानास्पद हल्ल्याची मोहीमच चालली आहे, तिच्या माध्यमातून खरं तर भारताच्या ‘निधर्मी’पणाच्या संकल्पनेविरुद्ध लढाईच (प्रॉक्झी वॉर) सुरू झाली आहे. अर्थात नेहरूंनी जेव्हा जाहीर केलं होतं की, भारताला एक वैविध्यपूर्ण, उदारमतवादी आणि बहुमिश्रित राष्ट्र बनवायचं आहे. त्या राष्ट्राची ताकद तेथील विविधतेतच आहे तेव्हा इथं पाकिस्तानात आम्ही कुणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता. हे गुळगुळीत चांगले शब्द वापरून लोकशाहीच्या बुरख्याआडून ते हिंदूंच्या बहुसंख्याकत्वाचंच समर्थन करत आहेत असंच आम्ही समजलो होतो. मात्र आता जेव्हा भाजपच्या हातात भारताचं नियंत्रण गेलंय आणि ते त्यांचा धार्मिक अजेंडा निष्ठूरपणे राबवू लागले आहेत. तेव्हा निधर्मीपणा किंवा अगदी सदोष निधर्मीपणाही जेव्हा नष्ट होतो, त्याचा खरा अर्थ काय होतो, त्याबद्दल काही थोड्या पाकिस्तान्यांच्या डोक्यात प्रकाश पडला!
मात्र मुसलमानांचा आणि पाकिस्तान्यांचा भूतकाळात जो काय समज झाला होता किंवा अजूनही काहींचा तो टिकून असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहरूंचे शब्द नेहमीच खरे मानले. विशेषतः गांधीहत्येनंतर त्यांनी संघावर बंदी घातली आणि हिंदुराष्ट्राचा प्राणपणाने विरोध केला, याबद्दल संघाने त्यांना कधीच क्षमा केली नाही. एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्यानं तर मुद्दामच लिहिलं की, “स्वातंत्र्यानंतर भारताची जबाबदारी नेहरूंनी त्यास पात्र असणाऱ्या संघकार्यकर्त्यांकडे दिली असती तर आत्तापर्यंत भारतात रामराज्य आलं असतं आणि शंभर कोटी लोकांनी दिवसात बारा वेळा हनुमान चालिसाचा जप केला असता.’’
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
हिंदुत्वाला नेहरू नष्ट व्हायला हवे असले तरी त्यातही काही विरोधाभास आणि विसंगती अशा आहेत. त्यातून ते सुटू शकत नाहीत. उजव्या मंडळींसह सर्व भारतीयांना आपल्या देशाच्या वैज्ञानिक प्रगतीचा अभिमान आहे. परंतु क्षणभर कल्पना करा की, १९४७ साली नेहरू नव्हे तर नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान असते तर आजचा भारत वैज्ञानिक दृष्टीनं कुठे असता?
अपवादात्मक अशा मंगळयानासारख्या अवकाश कार्यक्रमाऐवजी आणि ‘स्ट्रिंग थिअरी’ शोधून काढणारे प्रतिभावंत अशोक सेन यांच्याऐवजी भारत सर्व प्रकारच्या ‘क्रॅकपॉट सायन्स’ने भरलेला कचऱ्याचा डब्बा बनला असता. गोमूत्र आणि शेणपासून बनवलेल्या औषधांपुरतं वैद्यकीय संशोधन सीमित झालं असतं. मोराच्या ब्रह्मचर्याचं तीक्ष्ण निरीक्षण घडलं असतं. खगोलशास्त्राऐवजी ज्योतिष शिकवलं गेलं असतं आणि प्रत्यक्ष अंकगणित अजिबात न शिकवता फक्त वैदिक गणित शिकवलं गेलं असतं. आमच्या पाकिस्तानाप्रमाणेच डार्विनचा उत्क्रांतीवाद हा पाखंडी आणि धार्मिक श्रद्धेचा विनाशक मानला गेला असता.
नेहरूंची भारतीय विज्ञानावरची मोहर भारतभरात पसरलेल्या डझनावारी वैज्ञानिक संस्थांतून आणि विद्यापीठांतून दिसून येते. नेहरूंमुळेच त्यांची निर्मिती झाली आहे. कदाचित भारत हा जगातील एकमेव देश असेल, ज्याच्या राज्यघटनेनं ‘वैज्ञानिक वृत्ती’शी आपली बांधिलकी जाहीर केली आहे. ही कल्पना खास नेहरूंची आहे. ते तुरुंगात असताना तिनं त्यांच्या मनात आकार घेतला होता. थोडक्यात सांगायचं तर : ‘पवित्र ग्रंथ नव्हे तर फक्त तर्क आणि विज्ञानच आपल्याला भौतिक जगाबद्दलचे विश्वासार्ह ज्ञान देतात.’
२००५ साली मला भारताच्या सात शहरांतील ४० शाळा, कॉलेजे आणि विद्यापीठांना भेट देऊन त्यांच्यासमोर बोलण्याची संधी मिळाली तेव्हा नेहरूंमुळे त्यांच्या देशाला केवढा मोठा फरक पडला हेच दिसून येत होतं. नेहरू नसते तर विज्ञानाबद्दल सामान्य जनतेला एवढा मोठा आणि उघड उघड जाणवाणारा उत्साह वाटला नसता. एकाच शहरात अनेक विज्ञान संग्रहालयं उभारली जातात, तसंच प्राथमिक विज्ञानाची माहिती सर्वसामान्य भारतीयांना देण्यासाठी देशभरात असंख्य वैज्ञानिक संस्था चालवल्या जातात, त्यातूनच हे दिसून येतं. हिंदुत्वाच्या लाटेखाली यात किती बदल झाला असेल ते मला माहिती नाही. परंतु तेव्हा मला भारतात दिसलेल्या विज्ञानाविषयक उत्साहाचा काही टक्के भागही आजच्या घडीला पाकिस्तानात मला दिसत नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
नेहरूंनी आपल्या सैन्याधिकाऱ्यांनाही ताब्यात ठेवलं होतं. लोकशाहीत सैन्य हे नागरी अधिकारीपदाच्या खाली असलं पाहिजे. त्या नागरी पदाला उत्तर द्यायला बांधील पाहिजे. त्याउलट परिस्थिती असता कामा नये. त्यामुळेच फाळणी झाल्याझाल्या नेहरूंनी ताबडतोब मुख्य सैन्याधिकाऱ्याचा भव्य निवास रिकामा करण्याची आज्ञा देऊन ती जागा पंतप्रधानांच्या निवासासाठी वापरात यावी असं जाहीर केलं होतं. या आज्ञेमागे खूप मोठी प्रतीकात्मकता होती. म्हणजे ‘बॉस’ कोण आहे, हे त्यातून स्पष्टपणे ध्वनित होत होतं.
१९५८ साली अयुब खानांनी पाकिस्तानात लष्करी बंड घडवून आणलं, तेव्हा भारतीय लष्करानं राष्ट्रीय घडामोडीत घ्यावयाच्या भूमिकेस आणखी कात्री लावण्यात आली. जनरल करिअप्पा निवृत्त झाले होते. त्यांनी या लष्करी उठावाची प्रशंसा केली तेव्हा त्यांना तोंड बंद ठेवायला सांगण्यात आलं. सैन्यातील अधिकारी मग ते निवृत्त असोत की सेवेत असोत तयांना सार्वजनिक आणि अर्थविषयक गोष्टींवर –विशेषतः त्यांना मिळणारं निवृत्तीपश्चात वेतन आणि अन्य लाभ याविषयी बोलण्यास मनाई करण्यात आली. सैन्याच्या मालकीचे उद्योगधंदे आणि व्यवसाय अशी तर काही कल्पनाही नव्हती.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
हे सगळं आता कदाचित बदलू लागलं असू शकेल. कलहप्रियतेसाठी प्रसिद्ध असलेले सैन्यप्रमुख बिपिन रावत यांनी बऱ्याच परदेशी धोरणाविषयी मुक्तपणे भाष्य करून लष्कराची परंपरा मोडली आहे. रोहिंग्या निर्वासित समस्या, भारताने चीनसोबतची डोकलाम समस्या कशी सोडवावी, पाकिस्तानच्या अण्वस्त्रधारी असल्याच्या ढोंगाला उघड करावं इत्यादी अनेक बाबतीत त्यांनी मत प्रदर्शन केलं आहे. आता रावत हे अपवादात्मक उदाहरण आहे की, ‘लुडबुड करणारं सैन्य’ हे वैशिष्ट्य असणारी नवी सत्ता उदयास आली आहे हे काळच ठरवेल. मात्र सेनाप्रमुखांवर टीका करण्यास माध्यमांनी राष्ट्रद्रोह ठरवणं ही भारतीय लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे, हे मात्र निश्चित.
मोदी आणि त्यांच्या दोस्तांकडून ‘नेहरूंचा’ भारत किती बदलला जाईल हे अजून कळायचं आहे. खच्चीकरण आणि मोडतोड झालेली काँग्रेस विरुद्ध बाजूला आहे, याचा अर्थ हे लोक बराच काळ सत्तेत असू शकतात.
या सर्व काळात पाकिस्तानला मात्र आपलंच आरशातलं प्रतिबिंब सीमेपलीकडून दिसू लागलं आहे, हे मात्र नक्की.
.................................................................................................................................................................
हा मूळ इंग्रजी लेख पाकिस्तानच्या www.dawn.com या वर्तमानपत्रात २१ एप्रिल २०१८ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेख पाहण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
मराठी अनुवाद- सविता दामले
savitadamle@rediffmail.com
.................................................................................................................................................................
लेखक परवेझ हुडभॉय लाहोर आणि इस्लामाबादेत भौतिकशास्त्र शिकवतात.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Tue , 08 May 2018
ओ परवेझजी, भारतीय सैन्यप्रमुखांनी काय बोलावं आणि काय बोलू नये ते आम्ही भारतीय बघून घेऊ. आपण आजिबात काळजी करू नये. म्हणून सांगतो की एक काम करा. पाकिस्तान सोडा आणि भारतात येऊन रहा. बघा, तिथे राहून तुमचा स्क्रू ढिला पडलाय. भलत्याच चिंता मागे लावून घेताहात तुम्ही. करायचीच असेल तर पाकिस्तानच्या अस्तित्वाची चिंता करा. पण काये की इस्क्रू ढिला असल्यावर पाहिलं प्राधान्य तो घट्ट करायला हवं ना? ते भारतातच शक्य आहे. वेलकम टू इंडिया. आपला नम्र, -गामा पैलवान
Sachin T
Tue , 01 May 2018
भारताला सदोदित धोका देणार्या पाकिस्तानाचा, शत्रु राष्ट्रातला, एक प्रोफेसर नेहरूंवर स्तुतीसुमने उधळतो यावरूनच दिसून येते की चाचांची राजवट कोणाला पूरक होती ते. सर्जिकल स्ट्राइक करून पाकिस्तानची नाचक्की मोदिंजीनी केली असल्यामुळे, हा पाकड्या प्रोफेसर त्यांच्याविरूद्ध गरळ ओकत आहे. त्यांना लेचेपेचे लोकांच्या हाती भारताची सत्ता असायला हवी आहे, म्हणजे यांच्या दहशतवादी कारवायां करायला हे मोकळे. १९४७ ला मोदी पंतप्रधान असते तर त्यांनी तेव्हाच या पाकड्यांची नांगी ठेचली असती. तसेच नोबेल पिस प्राइज मिळवण्यासाठी काश्मिर प्रश्न युनोकडे नेण्याची घोडचूक मोदिजींनी नक्कीच केली नसती