‘ललित’ चोखंदळ वाचकांची निवड – २००८ ते २०१७
ग्रंथनामा - जागतिक पुस्तक दिन
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 28 April 2018
  • ग्रंथनामा जागतिक पुस्तक दिन World Book Day २३ एप्रिल 23 April ललित मासिक Lalit Masik चोखंदळ वाचकांची निवड

२३ एप्रिल हा जगभर ‘जागतिक ग्रंथ दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं हा विशेष लेख.

ग्रंथप्रेमी मंडळाच्या सहकार्याने ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार आणि ग्रंथसंग्रह या विषयांना वाहिलेले मराठीतले एकमेव मासिक म्हणजे ‘ललित’. या मासिकाच्या वतीने ‘चोखंदळ वाचकांची निवड’ हा उपक्रम गेली ५२ वर्षे सातत्याने घेतला जातो आहे. दरवर्षी एकंदर ५०० वाचकांना त्यांना त्या वर्षी आवडलेली तीन पुस्तके कळवण्यास सांगितले जाते. त्यातील जे वाचक आपल्या आवडीची तीन पुस्तके कळवतात, त्यांची नावानिशी यादी ‘ललित’च्या एप्रिल महिन्याच्या अंकात प्रकाशित केली जाते. या निवडीमध्ये गेल्या दशकभरात चोखंदळ वाचकांनी निवडलेली ही पुस्तके.

.............................................................................................................................................

२००८

१) आर्त – मोनिका गजेंद्रगडकर, २) ‘मॅजेस्टिक’ कोठावळे – संपा. वि. शं. चौघुले, ३) गंगा आये कहाँ से – गुलजार – एका दिग्दर्शकाचा प्रवास – विजय पाडळकर, ४) पाणीयावरी मकरी – राम शेवाळकर, ५) त्या वर्षी – शांता गोखले, ६) मनश्री – सुमेध वडावाला-रिसबुड, ७) वारी : एक आनंदयात्रा – संदेश भंडारे, ८) गाथा इराणी – मीना प्रभू, ९) सरर्वोत्तम सरवटे – संपा. अवधूत परळकर, १०) रुजुवात – अशोक केळकर, ११) शांताराम पारितोषिक कथा – प्रस्तावना विलास खोले, १२) पुन्हा मर्ढेकर – विजया राजाध्यक्ष, १३) खुंदळघास – सदानंद देशमुख, १४) भारतीय भाषांतील स्त्रीसाहित्याचा मागोवा : खंड, १,२ – संपा. मंदा खांडगे आणि इतर, १५) कॉल ऑफ द सीज चंद्रमोहन कुलकर्णी, १६) अल्पसंख्य – विजय पाडळकर.

.............................................................................................................................................

२००९

१) प्रकाशवाटा – डॉ. प्रकाश आमटे, २) आणि दोन हात… - वि. ना. श्रींखडे, ३) मास्तरांची सावली – कृष्णाबाई नारायण सुर्वे, ४) गंगाजली – ४ – श्री. बा. जोशी, ५) ग्रंथांच्या सहवासात – संपा. सारंग दर्शने, ६) समुद्र – मिलिंद बोकील, ७) मी, नंदा – नंदा केशव मेश्राम, ८) एका स्टुडिओचे आत्मवृत्त – प्रभाकर पेंढारकर, ९) वाटा आणि मुक्काम – आशा बगे, भारत सासणे, सानिया, मिलिंद बोकील, १०) ‘तें’ दिवस – विजय तेंडुलकर, ११) अंतरीचे धावे – भानू काळे, १२) विश्वनाथ – मधुकर धर्मापुरीकर, १३) व्हाय नॉट ऑय? – वृन्दा भार्गवे, १४) जीएंची कथा : परिसर यात्रा – अ. रा. यार्दी, वि. गो. वडेर, १५) शोध मर्ढेकरांचा – विजया राजाध्यक्ष, १६) संवादाचा सुवावो (प्रा. राम शे‌वाळकरांची रंगलेली गप्पा) – महेश एलकुंचवार, १७) ग्राफिटी वॉल – कविता महाजन, १८) पिढीपेस्तर प्यादेमात – संतोष पद्माकर पवार.

.............................................................................................................................................

२०१०

१) हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ – भालचंद्र नेमाडे, २) सर आणि मी – ज्योत्स्ना संभाजी कदम, ३) पुण्याची अपूर्वाई – अनिल अवचट, ४) सुनीताबाई – मंगला गोडबोले, ५) वाचणाऱ्याची रोजनिशी – सतीश काळसेकर, ६) आश्रम नावाचं घर – अचला जोशी, ७) मी अल्बर्ट एलिस – डॉ. अंजली जोशी, ८) मेंदूतला माणूस – डॉ. आनंद जोशी, सुबोध जावडेकर, ९) मीच माझा मोर – प्रशांत असनारे, १०) सोन्याच्या धुराचे ठसके – उज्ज्वला दळवी, ११) सुंदर ती दुसरी दुनिया – अंबरीश मिश्र, १२) खेकसत म्हणणे, आय लव्ह यू – श्याम मनोहर, १३) फिनिक्सच्या राखेतून उठला मोर – जयंत पवार, १४) आहे कॉर्पोरेट तरी – संजय भास्कर जोशी, १५) धाकट्या नजरेतून – अलका गोडे, १६) रस-अनौरस – राजन खान, १७) उत्तम-मध्यम – श्री. बा. जोशी, १८) आपले विचारविश्व – के. रं. शिरवाडकर, १९) कहाणी कवितेची – नारायण सुर्वे, २०) नवेगावबांधचे दिवस  - मारुती चितमपल्ली, २१) मला भावलेले संगीतकार – अशोक रानडे, २२) महाभारताचा मूल्यवेध – रवीन्द्र शोभणे.

.............................................................................................................................................

२०११

१) शिल्प – मोनिका गजेंद्रगडकर, २) पोस्टमॉर्टेम –डॉ. रवी बापट , ३) दुर्गा भागवत : व्यक्ती, विचार आणि कार्य – संपा. अरुणा ढेरे, ४) मोरखुणा – विजय पाडळकर, ५) बाईच्या कविता – किरण येले, ६) क्रमश: महेश केळुस्कर, ७) जग बदल घालुनि घाव – एकनाथ आव्हाड, ८) गाधींनंतरचा भारत – रामचंद्र गुहा, अनु. शारदा साठे, ९) तपोवन- प्रभाकर पेंढारकर, १०) साहित्याची आस्वादरूपे - वि. शं. चौघुले, ११) लंगडी आजी आणि रावणमामा – अशोक प्रभाकर डांगे, १२) पुस्तकपंढरीचा वारकरी – पांडुरंग कुमठा, १३) पुढल्या हाका – सुबोध जावडेकर, १४) कुहू - कविता महाजन, १५) ऐसा दुस्तर संसार – भारत सासरणे, १६) आम्ही मायदेशी, मुलं परदेशी – नीलिमा बोरवणकर, १७) अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट – आनंद विंगकर, १८) कथनात्म साहित्य आणि समीक्षा – डॉ. हरिश्चंद्र थोरात, १९) प्रास – विष्णू जयवंत बोरकर, २०) काय डेंजर वारा सुटलाय! – जयंत पवार, २१) संस्कृतिरंग – वैशाली करमरकर, २२) रेषाटन : आठवणींचा प्रवास – शि. द. फडणीस, २३) कळशीच्या तीर्थावर – शरदकुमार माडगूळकर, २४) दादासाहेब फाळके : काळ आणि कर्तृत्व – जया दडकर, २५) नॅनोदय – अच्युत गोडबोले, माधवी ठाकूरदेसाई, २६) राधेने ओढला पाय… - मुकुंद टाकसाळे

.............................................................................................................................................

२०१२

१) मुसाफिर – डॉ. अच्युत गोडबोले, २) झिम्मा : आठवणींचा गोफ – विजया मेहता, ३) चार महानगरांतले माझे विश्व – जयंत नारळीकर, ४) तारांगण – सुरेश द्वादशीवार, ५) करूळचा मुलगा – मधु मंगेश कर्णिक, ६) काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? – शेषराव मोरे, ७) तांडव – महाबळेश्वर सैल, ८) बंद खिडकीबाहेर – सुलभा ब्रह्मनाळकर, ९) रमाबाई महादेवराव रानडे – विलास खोले, १०) ओल्या वेळूची बासरी – ग्रेस, ११) युगद्रष्टा महाराजा : सयाजीराव गायकवाड – बाबा भांड, १२) रिपोर्टिंगचे दिवस – अनिल अवचट, १३) वैचारिक व्यासपीठे – गोविंद तळवलकर, १४) गुलाबी सिर : द पिंक हेडेड डक – संतोष शिंत्रे, १५) पावसात सूर्य शोधणारी माणसं – नीरजा, १६) मनात – अच्युत गोडबोले, १७) शाळाभेट – नामदेव माळी.

.............................................................................................................................................

२०१३

१) अमलताश – डॉ. सुप्रिया दीक्षित, २) खेळता खेळता आयुष्य – गिरीश कार्नाड, ३) भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण – महाराष्ट्र – संपा. अरुण जाखडे, ४) गाणाऱ्याचे पोर – राघवेन्द्र भीमसेन जोशी, ५) ज्ञानतपस्वी रुद्र (नरहर रघुनाथ फाटक यांचे चरित्र) – अचला जोशी, ६) असा घडला भारत – संपा. सुहास कुलकर्णी, मिलिंद चंपारनेरकर, ७) गवत्या – मिलिंद बोकील, ८) अस्वस्थ वर्तमान – आनंद विनायक जातेगावकर, ९) खेळघर – रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, १०) आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण – शिल्पकार चरित्रकोश खंड ६ – संपा. सुहास बहुळकर, दीपक घारे, ११) पत्रकार दि. वि. गोखले : व्यक्तित्व व कर्तृत्व – संपा. नीला उपाध्ये, १२) चलत चित्रव्यूह – अरुण खोपकर, १३) त्वचा – भारत सासणे, १४) इन्व्हेंस्टमेंट – रत्नाकर मतकरी, १५) प्रिय बाबुआण्णा  - नंदा पैठणकर, १६) ब, बळीचा – राजन गवस, १७) मनगंगेच्या काठावर – सविता गोस्वामी, अनु. सविता दामले, १८) सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध – म. सु. पाटील, १९) रंग नाटकाचे – पुष्पा भावे, २०) प्रदीप लोखंडे, पुणे १३ – सुमेध वडावाला-रिसबूड, २१) ग्रेट भेट – निखिल वागळे, २२) चांदण्याचा रस्ता – प्रकाश नारायण संत, २३) मनातली माणसं – नरेंद्र चपळगावकर, २४) रूपवेध – डॉ. श्रीराम लागू.

.............................................................................................................................................

२०१४

१) मेळघाटातील मोहोर : डॉ. रवींद्र कोल्हे\डॉ. स्मिता कोल्हे – मृणालिनी चितळे, २) घूमर – आनंद अंतरकर, ३) रंग याचा वेगळा : दत्तप्रसाद दाभोळकर – लेखन आणि जीवन – संपा. भानू काळे, ४) खिडक्या अर्ध्या उघड्या – गणेश मतकरी, ५) प्रेमातून प्रेमाकडे – अरुणा ढेरे, ६) तत्पूर्वी – दासू वैद्य, ७) कवीची मस्ती – विजय पाडळकर, ८) हुमान – संगीता धायगुडे, ९) अश्वमेध – रवींद्र शोभणे, १०) ईश्वर डॉट कॉम – विश्राम गुप्ते, ११) इंदिरा (इंदिरा संत यांची समग्र कविता), १२) झपूर्झा – अच्युत गोडबोले, १३) धूळमाती – कृष्णात खोत, १४) अॅट एनी कॉस्ट – अभिराम भडकमकर, १५) बंद दरवाजा – भारत सासणे.

.............................................................................................................................................

२०१५

१) टाटायन – एक पोलादी उद्योगगाथा  - गिरीश कुबेर, २) लस्ट फॉर लालबाग – विश्वास पाटील३) मम म्हणा फक्त – वीरधबल परब, ४) जिव्हाळा – रामदास भटकळ, ५) त्रिबंध – महेश एलकुंचवार, ६) शोध – मुरलीधर खैरनार, ७) लांबा उगवे आगरी – म. सु. पाटील, ८) मुद्रा – आशा बगे, ९) अर्घ्य – मधु मंगेश कर्णिक, १०) बिछडे सभी बारी बारी – बिमल मित्र, अनु. चंद्रकांत भोंजाळ, ११) नाटकवाल्याचे प्रयोग – अतुल पेठे, १२) वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा – जयंत पवार, १३) उद्या – नंदा खरे,  १४) देवाचे लाडके – विनय हर्डीकर, १५) मी माझ्याच थारोळ्यात – नीरजा, १६) रघुनाथ त्रिवेदी यांच्या कथा – अनु. जयप्रकाश सावंत, १७) अर्पणपत्रिकेतून जी.ए.दर्शन – वि. गो. वडेर, १८) खेळीया रे – वसंत वाहोकार, १९) चोषक फलोद्यान – रंगनाथ पठारे, २०) जाणिवा जाग्या होताना – अरुणा ढेरे, २१) तहानलेले पाणी – विश्वास वसेकर, २२) पॉप्युलर रितीपुस्तक – रामदास भटकळ, मृदुला जोशी, २३) भुई भुई ठाव दे – सीताराम सावंत, २४) माझे रंगप्रयोग – रत्नाकर मतकरी, २५) मार्ग – मिलिंद बोकील.

.............................................................................................................................................

२०१६

१) भुईरिंगण – रश्मी कशेळकर, २) मन में है विश्वास – विश्वास नांगरे-पाटील, ३) सय – माझा कलाप्रवास - सई परांजपे, ४) उगम – मोनिका गजेंद्रगडकर, ५) विरंगी मी, विमुक्त मी – डॉ. अंजली जोशी, ६) आणि मग एक दिवस – नसीरुद्दीन शहा, अनु. सई परांजपे, ७) सुन मेरे बंधू रे – एस. डी. बर्मन यांचे जीवनगीत – सत्या सरन, अनु. मिलिंद चंपानेरकर, ८) वाडी-वस्ती – संपा. आल्हाद गोडबोले, ९) मुद्रणपर्व – दीपक घारे, १०) माती, पंख आणि आकाश – ज्ञानेश्वर मुळे, ११) दरवळे इथे सुवास – अंबरीश मिश्र, १२) स्वत:तल्या परस्त्रीचा शोध – सुजाता महाजन, १३) पांढरे हत्ती – रवींद्र शोभणे, १४) कार्यमग्न – अनिल अवचट, १५) आपले बुद्धिमान सोयरे – सुबोध जावडेकर, १६) अनुवाद – आशा बगे, १७) अचंब्याच्या गोष्टी – संपा. सुबोध जावडेकर, मधुकर धर्मापुरीकर, १८) मंटोच्या निवडक कथा – अनु. डॉ. वसुधा सहस्रबुद्धे, १९) पोर्ट्रेट पोएम्स – विश्वास वसेकर, २०) चारीमेरा – सदानंद देशमुख, २१) उजव्या सोंडेच्या बाहुल्या  - प्रवीण दशरथ बांदेकर.

.............................................................................................................................................

२०१७

१) लीळा पुस्तकाच्या – नीतीन रिंढे, २) वाचत सुटलो त्याची गोष्ट : एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर – निरंजन घाटे, ३) अंगारवाटा – शोध शरद जोशींचा – भानू काळे, ४) निवडक बाबूराव अर्नाळकर – संपा. सतीश भावसार, ५) दंशकाल – हृषिकेश गुप्ते, ६) कालचक्र – अरुण टिकेकर, ७) धूळपेर – आसाराम लोमटे, ८) मोराची बायको – किरण येले, ९) लोभस – एक गाव, काही माणसं – सुधीर रसाळ, १०) पायी चालणार – प्रफुल शिलेदार, ११) माझी वाटचाल – राम प्रधान, १२) ऑर्गन – आशा बगे, १३) गगनिका – सतीश आळेकर, १४) चित्रभास्कर – पं. भास्कर चंदावरकर, अनु. आनंद थत्ते, १५) तीन पायांची शर्यत – डॉ. बाळ फोंडके, १६) लोककवी साहिर लुधियानवी – अक्षय मनवानी, अनु. मिलिंद चंपानेरकर, १७) विश्वस्त – वसंत वसंत लिमये, १८) नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य, १९) पुतिन – महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान, २०) परतवारी – सुधीर महाबळ, २१) माझा धनगरवाडा – धनंजय धुरगुडे, २२) अटलजी – कवीहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी – सारंग दर्शने, २३) नुसताच गलबला – अशोक कोतवाल, २४) भटकेगिरी -  द्वारकानाथ संझगिरी.

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

vishal pawar

Sun , 29 April 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......