अजूनकाही
कटुआ आणि उन्नाव येथील बलात्काराच्या प्रकरणात भाजप नेत्यांचा सहभाग उघड झाल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगोलग कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र या दोन्ही प्रकरणांचा देश-विदेशातील प्रसारमाध्यमांतून गाजावाजा व्हायला लागल्यानंतर आणि मोदी, भाजप यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी ‘पीडित मुलींना न्याय मिळेल’ अशी मोघम प्रतिक्रिया दिली. त्यानंतर या आठवड्यात मोदी युरोपच्या दौऱ्यावर गेले. त्यात लंडनमध्ये त्यांची बहुधा त्यांनीच आधी काढून दिलेल्या प्रश्नांवर गीतकार प्रसून जोशी यांनी मॅरेथॉन मुलाखत (१८ एप्रिल रोजी) घेतली. त्यात मोदी मोठ्या आत्मविश्वासानं म्हणाले, ‘बलात्कार हा बलात्कार असतो. त्याचं राजकारण करू नका.’ हा त्यांचा सल्ला बहुधा कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणांवरून मोदी आणि त्यांच्या पक्षावर टीका करणाऱ्यांना असावा. विशेषत: विरोधी पक्षांना. कारण उघड आहे, त्यांचा पक्ष बलात्काराचं राजकारण करतो. मोदींच्या विधानानंतर दोनच दिवसांनी (२० एप्रिल २०१८) दै. डेक्कन हेरॉल्डमध्ये कर्नाटक भाजपची पहिल्या पानावर जाहिरात प्रकाशित झाली. ती अशी -
मोदींचा पक्ष बलात्काराचं राजकारण करतो आणि पक्षनेते, कार्यकर्ते, मंत्री काय करतात? काही उदाहरणं पहा -
कठुआ बलात्कार व हत्येप्रकरणातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्या मोर्च्यामध्ये भाजप (जम्मू-काश्मीर)च्या दोन मंत्र्यांचा समावेश, १४ एप्रिल २०१८
भाजप (उत्तर प्रदेश) आमदार कुलदीप सेंगर यांना बलात्कार प्रकरणी अटक, १३ एप्रिल २०१८
http://thewirehindi.com/39910/unnao-rape-case-bjp-mla-kuldeep-sengar-arrested-by-cbi/
भाजप (मुंबई) नगरसेवक अनिल भोसले यांच्यावर बलात्काराचा आरोप, २१ जाने २०१७
http://indianexpress.com/article/cities/mumbai/mumbai-bjp-corporator-booked-for-rape-4484437/
चार भाजप (गुजरात) आमदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल, ८ फेब्रुवारी २०१७
भाजप (दिल्ली) आमदार विजय जॉली यांना बलात्कार प्रकरणी अटक, २७ फेब्रुवारी २०१७
भाजप (केरळ) माजी आमदार हरतल हालाआप्पा बलात्कार प्रकरणात अटक, १८ ऑगस्ट २०१७
भाजप आमदार (उत्तराखंड) हरक सिंग रावत यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, ३० जुलै २०१६
हॉटेलमध्ये बलात्कार प्रकरणी भाजप आमदार उमेश अग्रवाल यांना अटक, १८ सप्टेंबर २०१५
Woman takes U-turn, tells Delhi court not raped by BJP MLA Umesh Aggarwal & others, October 1, 2015
भाजपचे महाराष्ट्राचे प्रवक्ते मधु चव्हाण यांना पक्षातील महिलेवरील बलात्कार प्रकरणी अटक, ९ मे २०१३
भाजप मंत्री (मध्यप्रदेश) राघव यांना बलात्कार प्रकरणी अटक, ९ जुलै २०१३
http://www.thehindu.com/opinion/blogs/blogs-end-of-the-day/article4920695.ece
भाजप नेते (उत्तराखंड) प्रमोद गुप्ता यांना बलात्कार प्रकरणी जन्मठेप, २६ सप्टेंबर २०१३
भाजप (कर्नाटक) आमदार जीवराज यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, ८ नोव्हेंबर २०१३
भाजप नेता (मध्य प्रदेश) चा ऑफिसमध्येच महिलेवर बलात्कार, २८ डिसेंबर २०१२
भाजप नेते (पंजाब) अशोक तनेजा यांना स्वत:च्या मुलीवर सलग आठ वर्ष बलात्कार, २६ मार्च २००९
http://archive.indianexpress.com/news/bjp-leader-booked-for-raping-daughter-for-8-yrs/439215/
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Thu , 26 April 2018