अजूनकाही
सोमवारी सकाळी, एका फेसबुक पोस्टनं धक्का बसला आणि प्रस्तुत लेखक अवाक झाला. त्या पोस्टमध्ये असलेला एक स्क्रीनशॉट लोकप्रिय पॉर्न वेबसाईटवर ट्रेंड होत होता. चंदेरी दुनियेतले सेलिब्रेटी आणि पॉर्न जॉनरच्या मागणीनंतर, कठुआमध्ये सामूहिक बलात्कार आणि खून झालेल्या छोट्या मुलीचं नाव, सर्वांत आघाडीवर पोहचलं होतं.
आठ वर्षाच्या मुलीचं अपहरण, तिचा छळ, सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर निर्घृण खून झाला, त्याविषयी भारतात दु:ख वाटायला हवं, त्याऐवजी पॉर्न बेवसाईटवर तिच्या नावाशी निगडित सर्च करण्याची लाट उसळलेली पाहायला मिळाली. हा ट्रेंडिंग सर्च दाखवतो की, भारतातील इतरांचे लैंगिक वर्तन चोरून पाहणाऱ्या आणि परपीडक ग्राहक हा भारतातील इतर लोकांच्या दु:खावर जगतो. एका सर्व्हेनुसार इंटरनेट पॉर्नोग्राफीच्या या बहुसंख्य ग्राहकांपैकी तो चाळीस टक्के असून या वेबसाईटसवरील १४.२ कोटी व्हिजिटसपैकी आहे.
म्हणजे आपण दडपलेल्या लैंगिकतेच्या वेडाचार झालेल्या लोकांबरोबर राहात आहोत?
एका मुलीचा मृत्यू ही फक्त एक घटना असून ती काहींची विकृती तृप्त करण्याचं साधन झाली आहे. बलात्कार पीडितेच्या शेवटच्या व्हिडिओ चित्रणाचा पॉर्नप्रेमींनी वेगवेगळ्या पॉर्न वेबसाईटवर शोध घेतला आहे. परिणामी, शोध घेण्याची ही पद्धत असभ्यकतेकडून क्रूरतेकडे वळली. याची सुरुवात तिच्या नावानं, नंतर काही एमएमस, बलात्कार, क्लिप, मुस्लीम इत्यादींनी होते.
पॉर्नप्रेमींनी बलात्कार पीडितेच्या नावानं टॅग तयार केले आहेत, ज्याद्वारे अधिकाधिक क्लिक केले जात आहेत. हे पॉर्न बेवसाईटसवर तयार केलेले टॅग भविष्यात पॉर्न व्हिडिओ अपलोड करण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतात. तरीही जे कोणी या व्हिडिओंच्या शोधात आहेत किंवा ज्यांचे शोधण्याचे प्रयत्न फारसे यशस्वी झाले नाहीत, त्यांना आशा आहे की, त्यांना कुणीतरी क्लिप पुरवेल.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406
.............................................................................................................................................
हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तामधल्या मनोचिकित्सकांच्या म्हणण्यानुसार, दडपलेल्या लैंगिकतेमुळे आत्यंतिक लैंगिक कृत्यांचं व्हिडिओ चित्रण पाहण्याचं विकृत कुतूहल निर्माण होतं.
मॅक्स हेल्थकेअरच्या मेंटल हेल्थ अँड बिहॅविअरल सायन्सेस विभाचे प्रमुख डॉ. समीर मल्होत्रा सांगतात – “लैंगिकता हा सहसा चर्चा न केला जाणारा विषय असतो आणि त्यामुळे कुतूहल निर्माण होतं. बऱ्याच वेळा लोकांना लैंगिकतेच्या अवास्तव कल्पनांचा त्रास होऊ शकतो. हे अनैसर्गिक लैंगिक इच्छेमुळे होतं.”
भारतामध्ये एकूण नोंदणीकृत बलात्काराची प्रकरणं ३८, ९४७ आहेत आणि मुलांवर १०६,००० पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. भारतात बलात्कारांच्या खटल्यांबाबत एक समस्या आहे. सरकारी आकडेवारी सांगते की, भारतातील लैंगिक हिंसाचाराच्या घटनांपैकी ९९ टक्के घटना पोलिसांकडे नोंदवल्याच जात नाहीत.
भारताच्या बलात्काराची समस्या ही गलिच्छ बलात्कार संस्कृतीचा एक परिणाम आहे. खाजगी संभाषणानुसार तो अनेकदा साजरा केला जातो. हे उघड गुपित आहे की, उत्तर भारतीय राज्यांमध्ये चालत्या वाहनांमध्ये महिलांवर केल्या जाणाऱ्या बलात्काराकडे खेळ\गंमत म्हणून पाहिलं जातं. वेबसाईटवरील विनामूल्य डाटा आणि पॉर्नोग्राफिक साहित्यासोबत लैंगिक उत्तेजनेसाठी पॉर्नोग्राफिक व्हिडिओ पाहण्याची उत्सूकता वाढली आहे.
जेव्हा काहीतरी नवीन घडतं, तेव्हा व्हॉटसअॅप ग्रुप्स फेक पॉर्न व्हिडिओंनी ओसंडून वाहू लागतात. यावेळी मात्र बलात्कार पीडितेचा व्हिडिओ अजून तरी त्या स्थितीला पोहचलेला नाही, त्यामागचं कारण कदाचित लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या संतापात असावं.
थोडा सखोल शोध घ्या म्हणजे तुम्हाला सर्वत्र सांप्रदायिक ताण दिसेल! होय, हे व्हिडियो 'हिंदू-बॉय-मुस्लिम-गर्ल-व्हिडिओ', 'हिंदू मुस्लिम सेक्स पोर्न व्हिडीओज' इत्यादी नावांनी टॅग केले गेले आहेत. खोट्या नावांनी तयार केलेले व्हिडिओ, ज्यात पुरुषांच्या लैंगिक अवयवांचं वर्णन करतात, ज्यांचा इतर धर्मांतील स्त्रिया आनंद घेताना दिसतात.
कुणालाही माहीत नाही की, पॉर्नोग्राफीच्या माध्यमातून कुणी सांप्रदायिक संघर्षाला सुरुवात केली आहे. पण, हे सत्य आहे की, अशा व्हिडिओंची संख्या आणि लोकप्रियता वाढत चालली आहे. एखाद्या गटाचा द्वेष करणारा व्हिडिओ अपलोड झाला रे झाला की, इतर आणखी व्हिडिओ अपलोड करून संघर्ष चालू ठेवतात.
हा ट्रेंडिंग सर्च भारतात फारसा आश्चर्यचकित करणारा नाही. बलात्काऱ्याकडून बलात्काराच्या व्हिडिओची विक्री, हा भारतात ‘धंदा’ झाला आहे.
उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्काराच्या व्हिडिओंची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार “शेकडो, कदाचित हजारो हिंसक लैंगिक अत्याचाराच्या रेकॉर्डिंग रोज मोठ्या प्रमाणावर विकत घेतल्या आणि विकल्या जातात.”
अनुवाद - टीम अक्षरनामा
.............................................................................................................................................
हा मूळ इंग्रजी लेख www.outlookindia.com या संकेतस्थळावर १६ एप्रिल २०१८ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Fri , 27 April 2018