‘फाईट क्लब’ : जसजसा हा सिनेमा कळतो, तसतसा तो आपल्यासाठी ‘मास्टरपीस’ बनतो
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
जीवन नवगिरे
  • ‘फाईट क्लब’ची वेगवेगळी पोस्टर्स
  • Sat , 31 March 2018
  • कला-संस्कृती इंग्रजी सिनेमा English Movie फाईट क्लब Fight Club ब्रॅड पिट Brad Pitt

Chuck Palahniuk च्या कादंबरीवर आधारित डेविड फिन्चरचा ‘फाईट क्लब’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. पण त्यानंतर DVD  सेल्सच्या जोरावर आज तो ‘कल्ट क्लासिक’ बनला आहे. त्याची लोकप्रियता वाढतच चाललीये. बऱ्याच जणांचं ‘फाईट क्लब’ आवडण्याचं कारण म्हणजे त्यातला माइंड ट्विस्टिंग भाग होय. पण ते तर फक्त त्याचं एक लहानसं उपकथानक आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे टायलर डर्डन (ब्रॅड पिट) मध्येच सगळा सिनेमा दडलाय. जेवढं तुम्ही टायलर डर्डनला समजून घेता, तेवढा ‘फाईट क्लब’ समजतो.

सिनेमामधला प्रोटॅगॉनिस्ट वा नरेटर हा एडवर्ड नॉर्टन आहे. सुरुवातीपासून आपण बघतो की, हा नरेटर वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचं शिबीर अटेंड करत असतो. तो निद्रानाशानं ग्रासलेला असतो आणि दररोजच्या जीवनपद्धतीला कंटाळलेला असतो. म्हणूनच मनःशांतीसाठी तो रुग्णांचं शिबीर अटेंड करत असतो, जिथं त्याला त्यांच्यासोबत मनमोकळ्या पद्धतीनं रडता येतं आणि रिलॅक्स होता येतं. यामुळे त्याचा निद्रानाश कमी होतो आणि त्याला चांगली झोप लागते. तोपर्यंत मारला सिंगरही त्याच्या आयुष्यात येत नाही. तिच्या येण्यानं पुन्हा तो अस्वस्थ होतो आणि इन्सोम्नियाक होतो. आणि असाच एकदा तो प्लेनमध्ये टायलरला भेटतो, जो की सोप सेल्समन असतो. पुढे आपण बघतो की, नरेटरच्या फ्लॅटमध्ये स्फोट झालाय आणि त्याच्या सर्व वस्तू त्याच्यामध्ये उदध्वस्त झाल्यात. मग पुढे तो टायलरला फोन करतो आणि त्याच्या घरी राहायला जातो. इथून ‘फाईट क्लब’ची सुरुवात होते.

नरेटर हा कॅपिटॅलिस्टिक जीवनपद्धतीचा माणूस आहे. बारमधल्या सीनमध्ये टायलरला तो सगळं सांगत असतो की, मी हळूहळू कशा सगळ्या गोष्टी पूर्ण करत होतो उदा. सोफासेट. टेबल इत्यादी आणि एक परफेक्ट लाइफस्टाइल मिळवणार होतो, पण स्फोटामुळे सगळं गेलं. तिथं आपल्याला टायलरचा इमटेरिअलिस्टिक दृष्टिकोन बघायला मिळतो. तो म्हणतो "आपण फक्त ग्राहक आहोत. या मटेरिअलिस्टिक लाइफस्टाइलचे आपण बाय प्रॉडक्ट्स आहोत. आपल्याला गरिबी, गुन्हेगारी इत्यादीनं फरक नाही पडत. सेलिब्रिटी मॅगझिन्स, टीव्ही चॅनेल्स, इनरवेअर ब्रँड इत्यादीचा आपण विचार करतो. एक परफेक्ट लाईफ जगण्यामागे धावत असतो. मी तर म्हणतो थांबवा हे सगळं? एक पूर्ण लाइफस्टाइल मिळवणं थांबवा आणि बिनधास्त जगा."

या सगळ्यामधून आपल्याला टायलरचा नाहीलिस्टिक दृष्टिकोन दिसून येतो. कारण परफेक्ट आयुष्य जगण्याचा अर्थ काय? का एवढी सगळी धावपळ? कारण आयुष्य निरर्थक आहे आणि आपण जे काही करतो, त्याला या पूर्ण विश्वात कवडीभराचा अर्थ नाही. मग या सगळ्या मटेरिअलिस्टिक जगण्याला काय अर्थ? टायलर पुढे म्हणतो, "आपण ज्या काही गोष्टीचे मालक बनतो, शेवटी त्याच गोष्टी आपल्या मालक बनून जातात." त्यांच्यात आपण अडकून जातो. उदा. लाईफ इन्शुरन्स. जेव्हा आपण या सगळ्या मटेरिअलिस्टिक गोष्टी गमावू, तेव्हाच आपण मुक्तपणे मनासारख्या गोष्टी करू शकू.

पुढे जाऊन दोघं फाईट क्लब सुरू करतात, जिथं बरेच पुरुष येऊन आपल्या म्यासकुलीनीटीचं प्रदर्शन करत असतात. इथं म्यासकुलीनीटी हासुद्धा महत्त्वाचा भाग होय. कारण पुरुषांना त्याचं प्रदर्शन करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म भेटतो, आणि प्रत्येक पुरुषाची ती एक सुप्त इच्छा असते. म्हणूनच नरेटर सांगतो, सगळ्यांना अशा क्लबची गरज होती. प्रत्येकाची अशी सुप्त इच्छा होती. आम्ही फक्त ती अस्तित्वात आणलीये. टायलर म्हणतो, "मी इथं मजबूत आणि हुशार माणसं बघतोय, त्यांची ऊर्जा बघतोय. पण आपण सगळे जॉब करण्यात आणि ‘व्हाईट कॉलर्स, टाय’ घालून गुलाम बनून जगण्यात जीवन घालवतोय. अॅडव्हर्टायझिंगमुळे आपण कार आणि कपडे विकत घेण्यामागे धावतोय, ज्या जॉबचा आपण द्वेष करतो तेच काम करतोय, ज्यामुळे आपण वेगवेगळ्या निरर्थक गोष्टी खरेदी करू शकू. आपण मध्य इतिहासात आहोत. आपल्याला कोणती मोठी लढाई नाही किंवा उद्देश नाही. आपली खरी लढाई ही आध्यात्मिक लढाई आहे आणि आपलं खरं नैराश्य म्हणजे आपलं आयुष्य आहे." 

इथं आपण टायलरचा एक्सिस्टन्टियालिस्ट दृष्टिकोन बघतो आणि कॅपिटॅलिझममुळे आपण कशा प्रकारे वस्तूंच्या मागे गरज नसतानाही विकत घेण्यासाठी पळत आहोत, हे तो सांगतो. ‘आपलं नैराश्य म्हणजे आपलं अस्तित्व’ हे तर एक्सिस्टेन्शिअलीझमचं तत्त्व होय. आपलं अस्तित्व हे निरर्थक आहे, म्हणून आपलं जीवन निराशामय आहे. यालाच एक्सिस्टन्टिअल डिस्पेर म्हणतात. एक्सिस्टेन्शिअलीस्टिक आणि नाहीलिस्टिक दृष्टिकोन आपल्याला टायलरच्या सांगण्यात दिसून येतात. तो अँटी कॅपिटॅलिस्टिकसुद्धा आहे. जीवन हे निरर्थक आहे आणि दररोजच्या धावपळीत काही एक अर्थ नाही. म्हणूनच आपलं युद्ध हे आध्यात्मिक युद्ध आहे. आपण सगळ्यांनी बांधून घेतलेल्या या सिस्टिममध्ये रोबोट्ससारखे जगतोय आणि प्रत्येक गोष्ट मिळवण्याच्या मागे पळतोय आणि या सगळ्या सामाजिक बंधनात अडकून जातोय. जेव्हा की ते पूर्णतः निरर्थक आहे. आपलं जगणं निरर्थक आहे. मग अशा जगण्याचा काय अर्थ?

इथंच पुढे अल्बर्ट काम्यूचं अॅब्सर्डिसमचं तत्त्वज्ञान येतं. अशा अस्तित्वातून मुक्त होणं म्हणजे रिबेलिझम हे काम्यूचं तत्त्वज्ञान. इथून पुढे आपल्याला तेच बघायला मिळतं. टायलर स्वतःची फाईट क्लबमधील लोकांची आर्मी बनवतो. आणि पुढे ‘प्रोजेक्ट मेहेम’ सुरू करतो, नरेटरला याची काहीच कल्पना नसते. टायलर त्याच्या आर्मीला ठिकठिकाणी जाऊन अंधाधुंदी माजवण्यास सांगतो. ते जाऊन लोकांचे अपार्टमेंट्स जाळत असतात. इथून पुढे अराजकतेला सुरुवात होते. तो त्याला एक प्रकारचं रिबेलिझम समजतो, पण काम्यूचं रिबेलिसम या अराजकतेपासून वेगळं. मग टायलरच्या अशा करण्यात काय अर्थ आहे? या अराजकतेमागचा त्याचा उद्देश काय?

टायलर म्हणतो, "तुमचा जॉब, तुमचे बँक बॅलन्स, तुमची कार, तुमच्या वॉलेटचे कन्टेन्टस हे सगळे तुमच्या अस्तित्वाला काहीच अर्थ देत नाही. तुम्ही काही स्पेशल नाही, तुम्ही काही युनिक नाही, तुम्ही (आपण हुमन्स) या जगातील इतरांसारखीच हळूहळू विघटित होणारी बकवास ऑरगॅनिक द्रव्यं आहात." आपला पैसा, जॉब इत्यादी आपल्याला व्यावहारिक जीवनात अर्थ देतात, पण त्याला या पूर्ण विश्वामध्ये अबसोल्यूट असा काहीच अर्थ नाही. एकूणच आपल्या व्यावहारिक जगण्याला काहीच अर्थ नाही. म्हणून टायलर म्हणतो की, असं व्यावहारिक जगणं सोडून द्या आणि तुम्ही अस्तित्वात आहात हे सिद्ध करा. तुमचं जगणं सिद्ध करा. आणि त्यामुळेच तो असं अंधाधुंद काम करायला लागतो. हे सगळे नॉर्मल लोक शांतपणे अस्तित्वाच्या अज्ञानी निद्रेत पडलेत, त्यांना झटका देण्यासाठी. या सगळ्या ऑथोरिटिरिअन सिस्टिमला हलवून देण्यासाठी तो अशी अराजकता पसरवायला लागतो.

नरेटरला हळूहळू हे सगळं लक्षात यायला लागतं आणि तो हे थांबवण्यासाठी प्रयत्न करत असतो. कारण पुढील घटना भयानक घडणारी असते. नरेटर टायलरच्या मागे त्याचा शोध घेत असतो. याप्रकारे सिनेमाचा थर्ड अॅक्ट पुढे सरकत असताना नरेटरला कळतं की, टायलर आणि आर्मी ‘प्रोजेक्ट मेहेम’मधून क्रेडिट कार्डस कंपनीच्या बिल्डिंग्जला नष्ट करणार असतात. टायलरला सोप(साबण) पासून स्फोटकं तयार करता येत असतात आणि तो हे सगळ्यांना शिकवतो. पण आपण सुरुवातीला बघतो की, नरेटरचा फ्लॅट स्फोटामध्ये नष्ट झालाय. मग आपला संशय टायलरवर जाणारच, पण इथंच पुढे चित्रपट बघताना आपल्याला सगळ्यात मोठा शॉक हा असतो की, टायलर नावाचा कोणी व्यक्ती नाहीच आहे. टायलर आणि नरेटर (एडवर्ड नॉर्टन) हे दोघंही एकच आहेत.

आपण सुरुवातीपासूनच बघतो की, नरेटर हा मेंटली अस्वस्थ आहे, तो इन्सोम्नियाक आहे. आणि याच मानसिक अस्वस्थेमधून आपल्या जीवनाच्या कंटाळवालेपणातून तो त्याचा अल्टर इगो टायलरला तयार करतो. आपण प्रत्येक जण आपल्या अल्टर इगोसोबत अजाणतेपणानं विचारांच्या माध्यमातून बोलत असतो आणि तो आपल्यासाठी एक आदर्श असतो. नरेटर टायलरला तयार करतो, कारण तो एक परफेक्ट स्मार्ट स्ट्राँग पुरुष आहे आणि सगळ्या आयुष्याच्या बंधनातून मुक्त आहे. त्याच्यामार्फत तो या सगळ्या गोष्टी करू शकतो. पण याची त्याला काहीच कल्पना नसते. आणि याच प्रकारे स्वतःच त्याच्या फ्लॅटमध्ये स्फोट घडवून आणतो. तोच फाईट क्लब सुरू करतो व ‘प्रोजेक्ट मेहेम’ला लीड करतो. हा फाईट क्लबचा माइंड ट्विस्टिंग पार्ट आहे. पुढे नरेटर टायलरला थांबवतो, त्याला गोळी झाडतो, पण बिल्डिंग्जचे स्फोट थांबवण्यात त्याला उशीर होतो. यातूनच दिग्दर्शकाला असं सांगायचंय की, अशी अराजकतासुद्धा तुमच्या एक्सिस्टेशिअल डिस्पेरला पर्याय नाही.

इथं सिनेमा संपतो.

नरेटरचं पुढे काय होतं, माहीत नाही? पण टायलरला मारण्यासाठी त्याला स्वतःला गोळी मारावी लागते आणि तो जखमी होतो.

एकंदरीत फाईट क्लब हा एक्सिस्टन्टिअल डिस्पेरबद्दल बोलतो. मटेरिअलिस्टिक आणि कॅपिटॅलिस्टिक जगण्यावर भाष्य करतो. आणि रिबेलिझम दाखवतो, पण अराजकता हा त्याचा पर्याय नाही हेसुद्धा सांगतो. मग काय? आपल्या एक्सिस्टेन्शिअल डिस्पेरमधून बाहेर कसं यायचं? आपण आपलं हे निरर्थक जीवन कसं अर्थपूर्ण बनवायचं? यासाठी अनेक जणांनी सांगून ठेवलंय, जसं सार्त्रचं मुक्त होण्याचं तत्त्वज्ञान, नित्शेची Übermensch ची कल्पना होय किंवा काम्यूचं रिबेलिझम. पण टायलरसारखी अराजकता त्याचं नक्कीच उत्तर नव्हे. आणि दिग्दर्शकालासुद्धा शेवटी हेच दाखवायचं आहे, म्हणूनच नरेटर टायलरला संपवतो.

शेवटी असं म्हणता येईल की, फाईट क्लब नक्कीच एक मास्टरपीस आहे. समीक्षकांनी त्याला नाकारलं होतं आणि तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. कारण हा सिनेमा पहिल्यांदा पाहताना त्याचा पूर्ण गाभा कळत नाही. आणि तो जीवनाविषयी निराशाजनक दृष्टिकोन सांगतो. जे सामान्य प्रेक्षकाला बघायचं नसतं. सामान्य प्रेक्षक त्याच्या धकाधकीच्या लाइफस्टाइलला कंटाळून, एक विरंगुळा मिळावा म्हणून सिनेमा बघायला येतो, तेव्हा त्याला एका हलक्याफुलक्या करमणूकप्रधान सिनेमाची अपेक्षा असते, अशा कॉम्प्लेक्स सिनेमाची नव्हे. आणि तो मग फक्त प्रश्न करतो की, दिग्दर्शक काय दाखवतोय? तसं बघितलं तर डेविड फिन्चर टायलरला सिनेमामध्ये प्लेन सीनमध्ये दाखवण्या अगोदरसुद्धा बऱ्याच वेळा दाखवतो. बऱ्याचदा त्याची एक सेकंदासाठी झलक आपल्याला दिसते (उदा. नरेटरच्या ऑफिसमध्ये) आणि बऱ्याच सीनमध्ये आपल्याला स्टारबक्सचे कपही दिसून येतात. आणि एवढं सगळं कळायला एकापेक्षा जास्त वेळेस सिनेमा बघावा लागतो.

जसा जसा हा सिनेमा कळत जातो, तसा तसा तो तुमच्यासाठी ‘मास्टरपीस’ बनून जातो. आणि हीच एखाद्या सिनेमाची खरी ओळख असते.

.............................................................................................................................................

लेखक जीवन नवगिरे आयआयटी (मद्रास)मध्ये शिकत असून सिनेरसिक आहेत.

navgirejeevan@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Sanket Shelke

Sun , 01 April 2018

@सचिन पाटील यांनी उपस्थित केलेला मुद्दा अतिशय योग्य आहे. परंतु इतक्या कमी वयात लेखकाने केलेलं चित्रपटाचं तात्विक विश्लेषण कौतुकास्पद आहे.


SACHIN PATIL

Sat , 31 March 2018

Though adaptability is the way to enrich our language but you should achieve golden mean.... All the best.


SACHIN PATIL

Sat , 31 March 2018

Narrator म्हणजे निवेदक बरं का


SACHIN PATIL

Sat , 31 March 2018

एवढा चांगला लेख पण अतोनात इंग्रजी शब्द घुसडवून चव घालवली आहे. अस्तित्ववाद, व्यस्ततावाद, भौतिकवाद एवढे साधे सोपे शब्द मराठीत आहेत रे दादा.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख