आमच्या ग्रंथालयांची लग्नं
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
राजन मांडवगणे
  • अॅन फॅडिमनचं पुस्तक. खालील छायाचित्रांत फॅडिमन तिच्या पुस्तकासह.
  • Sun , 20 November 2016
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो Ex Libris एक्स-लिब्रिस अॅनी फॅडिमन Anne Fadiman

काही महिन्यांपूर्वी मी आणि माझ्या नवऱ्याने आपापला ग्रंथसंग्रह एकत्र करायचं ठरवलं. आम्ही एकमेकांना दहा वर्षांपासून ओळखतो आहोत, सहा वर्षांपासून एकत्र राहतो आहोत आणि पाच वर्षांपूर्वी आम्ही लग्नही केलं आहे. आमचे विजोड कॉफी मग्ज एकोप्याने नांदताहेत. एकमेकांचे टी-शर्ट्स, सॉक्स फारच घट्ट होत असूनही आम्ही ते वापरतो आहोत. काही महिन्यांपूर्वी आमच्या रेकॉर्ड्सचाही संकर घडून आलाय. माझा Josquin Desprez Motes जॉर्जच्या Worst of Jefferson Airplaneबरोबर सुखाने नांदतोय. आम्हा दोघांचाही त्यावर विश्वास आहे; पण आमचा ग्रंथसंग्रह मात्र अजूनही स्वतंत्रच आहे; माझा उत्तरेकडच्या पोटमाळ्यात, तर जॉर्जचा दक्षिणेकडच्या पोटमाळ्यात. माझ्या Billy Buddला त्याच्या Ploby-Dickपासून चाळीस फुटांवर झुरत ठेवणं, यात काहीच अर्थ नाही, यावर आमचं एकमत झालं खरं, पण त्याबाबत आम्ही काहीच पुढाकार घेतला नाही.

मेल्विलच्या या अलग ठेवलेल्या दोन्ही कादंबऱ्यांच्या साक्षीनेच आम्ही या पोटमाळ्यात लग्न केलं होतं. चांगल्या आणि वाईट काळात, तसंच सुखदुःखात आम्ही एकमेकांना साथ दिली. त्या बाबतीत काही प्रश्न नव्हता; पण आमच्या दोघांच्या ग्रंथसंग्रहांचीही लग्नं लागल्याशिवाय आणि त्यातून जास्तीच्या प्रती काढून टाकल्याशिवाय 'Book of Common Prayer' घडून येणार नव्हती; आणि ही काही चांगली गोष्ट नव्हती. हे घडवून आणण्याची गंभीरपणाने प्रार्थना करणं गरजेचं होतं, कारण या गोष्टीवरून एकमेकांच्या भावना दुखावणं योग्य नव्हतं. आम्ही दोघंही लेखक आहोत. बरेचसे लोक स्वतःची प्रेमपत्रं जपून ठेवतात. अगदी त्याचप्रमाणे आम्हीही आमच्या पुस्तकांमध्ये गुंतलेलो होतो. आम्ही पलंग शेअर करत होतो आणि पुढे मुलं झाल्यावर त्यांना तुलनात्मक पद्धतीने शिकवण्यासाठी The Complete of W. B. Yeatsची माझी प्रतही शेअर करत होतो. त्यातली Under Ben Bulden ही कविता मी एकदा चक्क यीट्सच्या ड्रमक्लीप चर्चयार्डमधल्या थडग्यावर वाचली होती. त्यातली T. S. Eliot's Selected Poems ही जॉर्जकडची प्रत त्याला त्याच्या नववीतल्या रॉब फॉन्सवर्थ या मित्राने 'बेस्ट विशेस फ्रॉम गेरी चीव्हर्स' अशा संदेशासह भेट दिली होती (गेरी चीव्हर्स हे रॉबचं एक टोपणनाव. तो बोस्टन Brunis इथं हद्दरक्षक होता. त्याच्या थडग्यावर कोरलेलं हे नाव युनिक होतं. टी. एस. एलियट आणि आइम्स हॉकी यांच्याशी ते इतिहासात पहिल्यांदाच जुळत होतं).

आमच्या दोघांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये काही महत्त्वाचे फरक होते. त्यामुळे आमच्या नाखुशीमध्ये मेल्विल भर घालण्याचंच काम करत होता. जॉर्जचा कारभार एखाद्या गोदी कामगारासारखा होता, तर माझा अगदी टापटीप. त्याची पुस्तकं 'साहित्य' या एकाच नावाखाली लोकशाही पद्धतीसारखी एकमेकांमध्ये मिसळलेली होती. त्यांपैकी काही उभी, काही आडवी आणि काही तर अक्षरशः एकमेकांच्या पाठीमागे ठेवलेली होती. माझी पुस्तकं मात्र देशानुसार आणि विषयानुसार विभागलेली होती. बऱ्याच लोकांकडे अस्ताव्यस्तपणाचीही एक सहनशीलता असते. जॉर्जने त्या त्रिमितीय पद्धतीतही एक सूत्र ठेवलं होतं. त्याला एखादं पुस्तक हवं असेल, तर त्याची जागा त्याला बरोबर ठाऊक असे आणि ते नेमकं तिथेच मिळे; पण दुसर्‍या बाजूला त्याची पुस्तकं नकाशे, स्कॉचच्या बाटल्या, कात्री यांच्यासह अविश्वसनीयरित्या आणि उनाडपणे पसरलेली असत. कोणतीही दिशा नसलेल्या या पुस्तकांना मर्यादा घालणं गरजेचं होतं. माझी पुस्तकं मात्र लष्कराच्या पलटणीसारखी शिस्तीत लावलेली असत.

लग्नानंतर पाच वर्षांनी मुलं झाल्यावर आमच्यात अधिक जवळीक आणि घरोबा निर्माण करण्यासाठी मी आणि जॉर्जने आमचा ग्रंथसंग्रह एकत्र करण्याचं ठरवलं. पण तो करण्याबाबतची योजना स्पष्ट नव्हती. म्हणून आम्ही जॉर्जच्या इंग्लिश गार्डनमधली आणि माझ्या फ्रेंच गार्डनमधली जागा चर्चेसाठी निवडली. जॉर्जने माझ्या पद्धतीप्रमाणे त्याची पुस्तकं लावली असती, तर ती त्याला योग्य वेळी सापडली असती, पण त्याने त्याच्या पद्धतीप्रमाणे माझी पुस्तकं लावली असती, तर मला मात्र ती कधीच सापडली नसती, या मुद्द्यावर थोड्या चर्चेनंतर मी जॉर्जचं मन वळवू शकले. विषयानुसार पुस्तकांची वर्गवारी करण्यावर आमचं एकमत झालं आणि या वर्गवारीसाठी आम्ही इतिहास, मानसशास्त्र, निसर्ग, प्रवास, असे काही विषय निश्चित केले. साहित्यविषयक पुस्तकांचे मात्र राष्ट्रीयत्वानुसार पोटविभाग पाडले. ही योजना जॉर्जला वाजवीपेक्षा जास्त चोखंदळ वाटली असली, तरी आमच्या काही मित्रांनी सुचवलेल्या योजनेच्या तुलनेत ही योजना काही अगदीच वाईट नसल्याचं त्याने मान्य केलं. या मित्रांच्या काही मित्रांनी त्यांचं घर काही महिन्यांसाठी एका इंटिरिअर डेकोरेटरला भाड्याने दिलं होतं. जेव्हा या मित्रांना घर परत ताब्यात मिळालं, तेव्हा त्यांच्या संपूर्ण ग्रंथसंग्रहाची रंगानुसार आणि आकारानुसार पुनर्रचना करण्यात आली असल्याचं त्यांना दिसलं. त्यानंतर काही दिवसांनी तो डेकोरेटर एका वाहन-अपघातात सापडला.

पण आमच्या या योजनेत अनेक अडचणी निर्माण होत होत्या. जेव्हा मी इंग्लिश साहित्य कालानुक्रमे लावण्याचं, तर अमेरिकी साहित्य लेखकानुसार लावण्याचं जाहीर केलं, तेव्हा आम्ही संकटात सापडलो. आमचा इंग्लिश ग्रंथसंग्रह तब्बल सहा शतकांमधला होता. जर तो आम्ही कालानुक्रमे शेल्फमध्ये लावला असता, तर पुस्तकं प्रत्यक्ष न उघडताही ती आम्हाला नुसती डोळ्यांनी पाहून समजू शकली असती, असा माझा युक्तिवाद होता. व्हिक्टोरियन काळातल्या सगळ्या पुस्तकांना एकत्रच ठेवायला हवं होतं. त्यांना वेगळं ठेवणं हे घटस्फोटित कुटुंबासारखं झालं असतं. दुसऱ्या बाजूला आमचा अमेरिकी साहित्याचा संग्रह मुख्यतः विसाव्या शतकातला होता. त्यामुळे ही पुस्तकं वर्णानुक्रमेच लावायला हवी होती. या सगळ्या प्रकाराने जॉर्ज वैतागला, पण आमच्या वैवाहिक आयुष्यातल्या सुसंवादात एक खरं रूपांतर घडून येत होतं. माझा शेक्सपिअरचा संग्रह जॉर्जने एका बुककेसमधून दुसऱ्या बुअककेसमध्ये हलवायला सुरुवात केली, तेव्हा खास करून वादाचा मुद्दा उद्भवलाच. मी ओरडले, ''सगळी नाटकं कालानुक्रमेच ठेवली जातील, असं बघ!''

''म्हणजे तुला असं म्हणायचंय का की, आपण प्रत्येक लेखकानुसार कालानुक्रमे पुस्तकं लावायची? पण शेक्सपिअरने त्याची नाटकं केव्हा लिहिली, हे तर कुणालाच माहिती नाही'', जॉर्ज म्हणाला.

''छान! शेक्सपिअरने 'द टेम्पेस्ट'च्या आधी 'रोमिओ अँड ज्युलिएट' लिहिलं आहे, हे आम्हाला माहिती आहे. त्याच पद्धतीने ते मला आपल्या कपाटातही पाहायला आवडेल'', मी धमकावलं. नंतर एकदा जॉर्ज म्हणाला की त्याने माझ्यासोबत घटस्फोट घेण्याचाही काही वेळा गंभीरपणे विचार केला होता.

एका आठवड्यात आम्ही माझी उत्तरेकडच्या कपाटातली पुस्तकं जॉर्जच्या दक्षिणेकडच्या कपाटात हलवली. आम्ही रोज रात्री शेल्फमधून पुस्तकं खाली काढायचो. ती पुन्ही शेल्फमध्ये ठेवण्यापूर्वी त्यांची सरमिसळ होत होती. म्हणजे एक आठवडा आम्ही ठिकरीच्या खेळाप्रमाणे शंभरच्यावर पुस्तकांची वर्गवारी केली आणि ती पुस्तकं बाथरूमपासून स्वयंपाकघरापर्यंत आणि स्वयंपाकघरापासून बेडरूमपर्यंत लावून ठेवली. आम्ही ती हाताळत होतो, त्यांना गोंजारत होतो. त्यांच्यापैकी काहींवर जुन्या प्रियकरांची नावं होती, तर काहींवर इतरांची नावं होती. काही तर 'टाइम कॅप्सूल'सारखी होती. माझ्याकडचं 'मेजर ब्रिटिश रायटर्स' हे कवींचं पुस्तक १९७०मध्ये मी हायस्कूलला असताना लावलेलं पाठ्यपुस्तक होतं. जॉर्जच्या 'ऑन द रोड' या प्रतीमध्ये दहा सेंट्सचा स्टॅम्प लावलेलं एक पोस्ट्कार्ड सापडलं.

सगळी पुस्तकं खाली आल्यावर कुठली पुस्तकं एकत्र ठेवावीत आणि कुठे ठेवावीत, यावरून आमच्यात पुन्हा गरमागरम चर्चा झाली. ही पुस्तकं आम्ही हलवण्याआधी माझी पुस्तकं माझ्या पोटमाळ्यात नऊ वर्षं राहत होती. इंग्लिश साहित्य नेहमीच समोरच्या दरवाजाच्या भिंतीलगतची मोक्याची जागा अडवून बसत असे (दुसऱ्या बाजूच्या टोकाला, माझ्या डेस्कच्या उजव्या बाजूला दारालगत एक छोटं बुकशेल्फ होतं. त्याच्या बाजूला 'द झिपकोड डिरेक्टरी' आणि 'द कम्प्लीट स्कारडेल डाएट' दडून बसलेले होते). या जागेत पर्याय म्हणून अमेरिकी साहित्य ठेवायला पात्र होतं, असा जॉर्जचा विचार होता. शेवटी, तो बरोबरच असल्याच्या निष्कर्षाप्रत आम्ही आलो. शिवाय आमची प्रदर्शनी भिंत माझ्या नवऱ्याकडून आणि माझ्याकडूनही पुन्हा सजवली जाणार होती. त्यामुळे मी नवऱ्याला शरण गेले, पण माझ्या घशात भावनावेगाने आवंढा दाटून आला.

आमच्या बेडच्या मागच्या शेल्फमध्ये 'बुक्स बाय फ्रेंड्स अँड रिलेटिव्हज' या नावाने आम्ही एक नवीन वर्गवारी केली. ही कल्पना मला माझ्या एका लेखक मैत्रिणीच्या कल्पनेवरून सुचली होती. तिनेही असाच एक कप्पा केला होता. या कल्पनेबद्दल जॉर्ज सुरुवातीला साशंक होता. लेखकांच्या दृष्टीने हे अपमानकारक होण्याचा संभव असल्याचं त्याला सुरुवातीला वाटलं. उदा. मार्क हेल्प्रीनला अमेरिकी साहित्यसृष्टीतून हद्दपार करून एकदा त्याला वर्णानुक्रमे अर्नेस्ट हेमिंग्वेच्या नंतर टाकल्यानंतर पीटर लेरांजिस या स्त्री-टोपणनाव असलेल्या लेखकाच्या 'द बेबी-सिटर्स क्लब'च्या सोळा खंडांच्या बरोबरीने बेडखाली टाकून देणं (नंतर मात्र त्याने त्याचा विचार बदलला आणि मार्क आणि पीटर एकानंतर एक असणं हा चांगला पर्याय होऊ शकत असल्याचं ठरवलं).

आठवड्याच्या शेवटी आम्ही आम्हा दोघांकडील जास्तीच्या प्रती वेगळ्या केल्या आणि त्यातील कुठल्या ठेवायच्या यावर आमची घनघोर चर्चा झाली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, आमच्या आवडत्या पुस्तकांच्या प्रतींना मर्यादा घालण्याची गरज होती. मग आम्ही त्यांची वाटणी केली. जॉर्जने त्याच्या ‘टू द लाईट हाऊस’चा त्याग केला तर मी माझ्या ‘कपल्स’च्या गुलाबी पेपरबॅक प्रतीला गुडबाय केल. खरं तर ही प्रत मी माझ्या पौगंडावस्थेत वाचलं होतं. त्याच्या तुकडे पडलेल्या भागांना बिजागरीनं जोडावं तसं रबरबँडनं जोडलं होतं. पण आम्ही ठामपणे एकत्र यायचं ठरवलं होतं. आमच्यातील अंतर संपून गेलं होतं.

आमच्या दोघांच्या संग्रहात पन्नास पुस्तकांच्या प्रती डबल निघाल्या. आम्ही ठरवलं की, ज्या पैपरबॅक प्रतीच्या समासात मजकूर लिहिलेला असेल, त्या सोडून इतर पेपरबॅक प्रतींऐवजी त्यांच्या हार्डबाउंड प्रती ठेवायच्या. जॉजने ‘मॅजिक माइंटेन’ची प्रत तर मी माझ्या ‘वॉर अँड पीस’ची प्रत काढून टाकली. ‘वुमन इन लव्ह’ने मात्र बरीच दु:खी चर्चा करवली. जॉर्जने ते सोळाव्या वर्षी वाचलं होतं. त्याने ते पुन्हा वाचल्यावर आग्रह धरला की, त्याच्या मूळ बॅन्टॅम पेपरबॅकसारखी दुसरी आवृत्ती मिळणार नाही. त्याचं मनाला उत्तेजित करणारं एक पूर्ण नग्न आणि एक अर्ध नग्न बायकांचं छायाचित्र. मी हे पुस्तक अठराव्या वर्षी वाचलं होतं. त्या वर्षी मी डायरी वापरत नव्हते, पण त्याची मला कुणी आठवण करून द्यायची गरज नाही. कारण त्याच वर्षी माझा कौमार्यभंग झाला होता. मी माझ्या त्याविषयीच्या सर्व कॉमेंट माझ्या वायकिंग आवृत्तीत उघडपणे लिहिल्या होत्या. (उदा. पान १८ – व्हायोलन्स सबस्टीट्यूट, फॉर सेक्स, पान १५४ – सेक्शुअल पेन, पान १५९ – सेक्शुअल पॉवर, पान १५८ – सेक्स.) आम्ही काय करू शकत होतो, पण आम्ही दोन्ही प्रती पंचाने पुसून काढल्या. दोन्ही ठेवाव्या का?

अखेर मध्यरात्रीनंतर आमचं काम फत्ते झालं. आमच्याकडच्या जास्तीच्या प्रती, शिवाय इतर शंभर किंवा दु:खी मनाने निवडलेल्या, त्यांचा ढिग गाडीत भरून त्यांना निरोप दिला. घाम पुसत आणि धापा टाकत आम्ही आमचा विजयोत्सव साजरा केला, एकत्रित मेल्विसच्या समोर. एकमेकांना किस केलं.

आमचं ग्रंथालय निर्दोषपणे लागलं खरं, पण ते थोडंसं हवेशिवाय होतं. जॉर्जने माझ्या आयुष्यात येण्याआधीच्या माझ्या आयुष्यासारखं. आणि एका आठवड्यानंतर पायरीपायरीने जॉर्जची नेहमीची पद्धत पुन्हा सुरू झाली. शिस्तीत आणि सरळ रेषेत लागलेलं आमचं घर पुन्हा मूळपदावर येऊ लागलं. कुठे वाऱ्याने उडून गेलेले कपडे, तर कुठे तीनचाकी सायकलीचे ठोसे. आमच्या नवीन पद्धतीला संग्रहाने आणि नवऱ्याने तडा देण्याचं काम सुरू केलं. ते मूळपदावर आले. आमच्या बेडच्या बाजूची टेबल नव्या, न निवडलेल्या पुस्तकांनी दबून जाऊ लागली. शेक्सपिअरच्या पुस्तकांची पुनर्रचना झाली. एके दिवशी मला दिसलं की, ‘इलिएड’ आणि ‘दि डिक्लाईन अँड फॉल ऑफ रोमन एम्पाअर’ त्यांच्या जागेतून ‘फ्रेंडस आणि रिलेटिव्हज’च्या कप्प्यात जाऊन बसले होते. पुरावा समोरासमोर आणल्यावर जॉर्ज हातावर हात ठेवत म्हणाला, “छान! गिबन आणि मला ती पुस्तकं आवडतात.”

काही आठवड्यांपूर्वीची गोष्ट. जॉर्ज बाहेरगावी गेला होता. मी ‘ट्रॅव्हल्स विथ चार्ली’ पुन्हा वाचायचं ठरवलं. प्रत घेऊन मी बेडरूममध्ये गेले. हे पुस्तक मी सतराव्या वर्षांत पर्दापण करत असताना उन्हाळ्यात वाचलं होतं. मी माझ्या जीर्ण झालेल्या पेपरबॅक प्रतीविषयी जरा हळवी झाले होते. एका माणसाबरोबर स्टाईनबेक पाय वाकडे करून बसला आहे. त्याच्यासमोर कुत्रा आहे असं चित्र त्याच्या मुखपृष्ठावर होतं. मी १९२पानावर पोहचले, तिथं दुसरा परिच्छेद कॅलिफोर्नियातील लाल झाडांचं जंगल कमी होण्याविषयी होता. तिथं माझ्या नवऱ्याच्या हस्ताक्षरात लिहिलेलं होतं – ‘आपण पर्यावरण नाहीसं का करतो आहोत?’ या शोकमय विधानाला माझीही मान्यता होती.

आमच्याकडे तंतोतंत जुळणाऱ्या दोन प्रती होत्या आणि आम्ही त्यातील जॉर्जची प्रत ठेवली होती. माझी पुस्तकं आणि त्याची पुस्तकं ही आता आमची पुस्तकं झाली होती. आम्ही खरोखर विवाहित कुटुंब होतो!

वैधानिक इशारा : हा लेख म्हटलं तर अॅनी फॅडिमनच्या ‘एक्स लिब्रिस - कन्फेशन्स ऑफ अ कॉमन रीडर’ या पुस्तकातील ‘मॅरिइंग लायब्ररीज’ या लेखाचा अनुवाद आहे, म्हटला तर तो अनुवाद नाही. खरं म्हणजे फॅडिमनच्या लेखाच्या अनुवादाला सुरुवातही केली होती. पण नंतर नंतर तो अनुवाद राहिला नाही, तो त्या लेखावर आधारलेला एक स्वतंत्र लेख होत गेला. म्हणजे हा लेख अनुवाद म्हणून फसलेला असला तरी तो स्वतंत्रपणे वाचताना आनंद नक्की देऊ शकेल. आणि समजा नाही दिला तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकताच की!

(Ex Libris : Confessions of a Common Reader - Anne Fadiman, Penguin Books, Pages - 131, Price - 350 Rs.)

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......