डोनाल्ड ट्रम्प : अमेरिकेचा किम जोंग उन नंबर एक आणि जगाचा किम जोंग उन नंबर दोन
पडघम - विदेशनामा
टीम अक्षरनामा
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Thu , 25 January 2018
  • पडघम विदेशनामा डोनाल्ड ट्रम्प Donald Trump

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारला तो २० जानेवारी २०१७ रोजी. म्हणजे कालच्या २० जानेवारीला त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण झालं. कसं गेलं हे वर्ष जगासाठी, अमेरिकेसाठी? नोव्हेंबर २०१६मध्ये अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल लागला. तेव्हापासून ‘अक्षरनामा’वर प्रकाशित झालेले निवडक लेख.

.............................................................................................................................................

अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक : काही निरीक्षणे - सुभाष नाईक\23 October 2016

डोनाल्ड ट्रम्प या निवडणुकीत विजयी झाले तर, या शंकेनं अमेरिकेतील भारतीय, आशियाई व अन्य परदेशी तरुण धास्तावले आहेत. ट्रम्प निवडून आले तर एच १ बी व्हिसावर निर्बंध आणू शकतील, अशी भीती त्यांना वाटते. व्यापारी करार रद्द झाले तर आंतरराष्ट्रीय संबंध कसे राहतील, भारत- अमेरिका संबंध कसे असतील, भारत- पाकिस्तान संघर्षात ट्रम्प काय भूमिका घेतील असे अनेक प्रश्न भारतीयांच्या मनात आहेत.

http://www.aksharnama.com/client/article_detail/39

.............................................................................................................................................

ओबामा गेले, ट्रम्प आले! - जयराज साळगावकर\09 November 2016

कुठल्याही प्रकारचा अन्याय सहन करायचा नाही, ताबडतोब प्रतिकार करायचा आणि शत्रूला केवळ नेस्तनाबूदच नाही, तर नष्ट करायचं, हे अमेरिकेचं तत्त्वज्ञान आहे. हे तत्त्वज्ञान अमेरिकेतल्या ‘बायबल बेल्ट’चं आहे. त्यांना ट्रम्प यांनी भुरळ घातली!

http://www.aksharnama.com/client/article_detail/136

.............................................................................................................................................

ट्रम्पचं राष्ट्राध्यक्ष होणं काळजीत टाकणारं… - एक भारतीय-अमेरिकन\10 November 2016

ट्रम्पसारखा आजवर राजकारणात नसलेला माणूस एका पॉवरफुल देशाचा राष्ट्राध्यक्ष होतो, तेव्हा ते जरा आव्हानात्मक ठरू शकतं. आता ही जबाबदारी ट्रम्प कशी पेलतात हे बघणं गरजेचं आहे. ट्रम्प यांचा स्वभावही बऱ्यापैकी चिडका वाटतो. कारण निवडणूक पूर्व चर्चांमध्ये आणि भाषणांमध्ये ते जरा अहंकारी वाटले होते. ते थोडं काळजीत टाकणारं आहे.

http://www.aksharnama.com/client/article_detail/139

.............................................................................................................................................

‘ट्रम्प ही सबंध जगावरच आलेली आपत्ती आहे’ : सुनील देशमुख - टीम अक्षरनामा\10 November 2016

मूळचे सांगलीचे असलेले सुनील देशमुख गेली ४० वर्षं अमेरिकेत राहत आहेत. वॉल स्ट्रीटवर त्यांनी कमॉडिटी ट्रेडिंगमध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. महाराष्ट्रात पुरोगामी सामाजिक कार्याला मदत करणारा उद्योजक, महाराष्ट्र फाउंडेशनचे अध्यक्ष असलेल्या देशमुखांची ही अमेरिकेच्या ४५व्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमित्ताने परखड मुलाखत.

http://www.aksharnama.com/client/article_detail/140

.............................................................................................................................................

डोनाल्ड ट्रम्प : महाभयंकर माणूस (?) - चिंतामणी भिडे\11 November 2016

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पविषयी कुठलाच अंदाज लावता येत नाही आणि हीच सगळ्यात धोकादायक बाब आज जगभरातील राजकीय विश्लेषकांना वाटतेय. त्यांच्यातल्या खळबळीचं कारणही हेच आहे. सगळ्यातलं सगळं कळणाऱ्या आपल्यासारख्या विद्वानांना हा माणूस नेमकं काय करणार आहे, याचा पुसटसाही अंदाज असू नये, हे वास्तव पचवणं तसं जडच आहे.

http://www.aksharnama.com/client/article_detail/143

.............................................................................................................................................

एक पाऊल पुढे, दोन पावलं मागे - संपादक अक्षरनामा\11 November 2016

ट्रम्प यांच्या वर्णद्वेषी, स्त्रीविरोधी आणि स्थलांतरिताना लक्ष्य करणाऱ्या राजकारणामुळे अल्पसंख्याक, स्त्रिया, युवा आणि स्थलांतरित वर्ग आज भयभीत आहे. गेल्या अनेक दशकांत संघर्ष करून मिळवलेल्या सामाजिक बदलांची माघार तर होणार नाही ना अशी चिंता अनेकांना भेडसावत आहे. ओबामांना विजयी करून एक पाऊल पुढे आलेला अमेरिकी समाज आज जणू दोन पावलं मागे गेला आहे.

http://www.aksharnama.com/client/article_detail/144

.............................................................................................................................................

जग सगळे डळमळले ग! - निलेश कोरडे\22 November 2016

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी झालेल्या निवडीवर जगभरात आश्चर्य आणि अविश्वास व्यक्त होत आहे. ट्रम्प यांची स्वतःची अशी कोणतीही ठाम राजकीय मतं नाहीत. गेल्या दीड वर्षांत त्यांनी जवळजवळ सर्वच बाबतीत कोलांट्याउड्या मारलेल्या आहेत. त्यांचं बेधडक, तारतम्यविहीन आणि गर्विष्ठ व्यक्तिमत्त्व पाहता ते काय गोंधळ घालू शकतील, याविषयी जगभरात काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

http://www.aksharnama.com/client/article_detail/192

.............................................................................................................................................

अमेरिका विरुद्ध रशिया अर्थात डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध व्लादिमिर पुतीन - चिंतामणी भिडे\ 29 December 2016

२६ डिसेंबर १९९१ रोजी रशियन महासंघाचं विघटन होऊन १५ नवी राष्ट्रं उदयाला आली आणि अमेरिका आणि रशिया यांच्यातल्या शीतयुद्धाची अधिकृत समाप्ती झाली. या घटनेला परवाच्या सोमवारी २५ वर्षं पूर्ण झाली. या निमित्ताने बरंच चर्वितचर्वण झालं, पण जागतिक राजकारणावर प्रभाव टाकणारे नेते गेल्या २५ वर्षांचं सिंहावलोकन करून काही शहाणपणाचे धडे शिकतील, ही अपेक्षा मात्र फोल ठरताना दिसते आहे.

http://www.aksharnama.com/client/article_detail/357

.............................................................................................................................................

भय इथले संपत नाही... - चिंतामणी भिडे\ 23 January 2017

अमेरिकेचा अध्यक्ष कितीही सर्वशक्तिमान असला तरी त्याच्या एकट्याच्या आवाक्यातली ही बाब आहे का? जागतिक राजकारणात इतके विविध फोर्सेस वेगवेगळ्या दिशांनी कार्यरत असतात. जी अमेरिका जागतिकीकरणाची जन्मदाती, आजवर जिने जागतिकीकरणाचा झेंडा उंच धरला, अवघ्या जगाला साम-दाम-दंड-भेद नीती वापरत जागतिकीकरणाच्या प्रवाहात ओढलं, तीच अमेरिका आज ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा स्वकोशात जाऊ बघत आहे.

http://www.aksharnama.com/client/article_detail/442

.............................................................................................................................................

पॅरिस करार आणि अमेरिकेचा अध्यक्षीय घटस्फोट - दामोदर पुजारी\13 June 2017

या दुर्दैवी घटनेनंतर अमेरिकेचं जागतिक राजकारणातील अग्रस्थान संपुष्टात येण्याची स्पष्ट चिन्हं आहेत. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर पॅरिस करारामधून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेला चार वर्षांचा अवधी बाकी आहे. म्हणजे तोवर अमेरिकेतील पुढची अध्यक्षीय निवडणूक येऊन ठेपेल. त्या वेळेस सत्तापालट झाल्यास कदाचित पुनर्विचार होण्यास वाव आहे. अन्यथा अमेरिकेचा पॅरिस कराराशी अध्यक्षीय घटस्फोट झालेला आहे, हे नक्की.

http://www.aksharnama.com/client/article_detail/914

.............................................................................................................................................

मोदींच्या अमेरिका दौऱ्यात दडलंय काय? - चिंतामणी भिडे \ 26 June 2017

ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर मोदी प्रथमच अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. इतकंच नव्हे, तर व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्यासह जेवण घेणारेही ते पहिलेच परराष्ट्रप्रमुख असणार आहेत. मोदींचा हा दौरा कमालीचा लो प्रोफाइल आहे आणि याचं कारण ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्त्वात दडलंय. ट्रम्प कमालीचे इगोइस्टिक आहेत, मोदींचा इगोही काही छोटा नाही. पण एक ‘म्यान में दो तलवारे नहीं रह सकती’, हे सुदैवाने भारतीय गोटाने ओळखलेलं दिसतंय.

http://www.aksharnama.com/client/article_detail/954

.............................................................................................................................................

‘हॅन्स अँडरसनच्या परीकथा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4342

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......