२०१७ : बेस्ट ऑफ ‘ग्रंथनामा’
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Fri , 29 December 2017
  • संकीर्ण वर्षाखेर विशेष Year-end Special ग्रंथनामा Granthnama

गेल्या वर्षभरात दर शुक्रवारी ‘ग्रंथनामा’मध्ये पुस्तक परीक्षणं, आगामी भाग, पुस्तकांची झलक, मुलाखती, साहित्यविषयक लेख असा विविधांगी मजकूर प्रकाशित झाला. त्यापैकी काही उत्तम अशा लेखांची ही झलक. त्यातून वर्षभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींवरही प्रकाश पडतो... आणि त्यांवरचं भाष्यही जाणून घेता येतं...

.............................................................................................................................................

कुरुंदकरांचे लेखन ‘आहे तसे ठेवणे’ पुरेसे; त्याचे महत्त्व पटवून देण्याची आवश्यकता नसते

लेखक व विचारवंतांचा एक दुर्मिळ वर्ग असा असतो, ज्यांचे लेखन निवडून वाचकांसमोर ‘आहे तसे ठेवणे’ पुरेसे असते; म्हणजे त्यांच्या लेखनाचे महत्त्व पटवून देण्याची आवश्यकता नसते. या दुर्मिळ वर्गात मराठीतून कुरुंदकरांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागते. कोणत्याही व्यक्तीचा वेध घेताना कुरुंदकर ज्या बहुविध पद्धतीने त्या व्यक्तीकडे पाहतात, तशाच प्रकारे ग्रंथांकडे पाहतात

विनोद शिरसाठ  Fri , 01 December 2017 

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/1540

.............................................................................................................................................

काय साठीचं दशक होतं राव!

मी उल्लेख केलेलं संगीत आणि संगीतकार आणि असे अनेक या सर्वांनी मिळून ही साठच्या दशकातली अभिमानास्पद मूस बनवली आहे. शैलींची आणि रागांची, नादांची आणि आवाजांची, तरुण, कल्पक, प्रगल्भ आणि फल दायी अशी सुवर्णनिर्मिती केली आहे. साठच्या दशकातल्या या संगीत रसायनशास्त्रज्ञांना खरंच सोनं सापडलं होतं असं वाटतं. निदान त्याची चमक निघून जाईपर्यंत तरी

पं. भास्कर चंदावरकर  Fri , 01 December 2017 

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/1538

.............................................................................................................................................

आर्केओगिरी : एका परिपूर्णतेचा प्रवास

चित्रकला कौशल्याच्या सुमार दर्जामुळे तयार झालेली पोकळी पुरातत्त्वीय पुराव्याशी १०० टक्के इमान राखून असलेल्या समर्पक, नेमक्या कॅप्शन्सनी भरून काढली. आणि या भांडवलावर मी माझे पहिले कार्टून फेसबुकवर टाकले! पुरातत्त्वज्ञांना हा approach अगदी नवीन होता. त्यांच्यात हास्याचे फवारे फुटले आणि आणखी हवे अशी मागणी होऊ लागली. ‘गांधीगिरी’च्या धर्तीवर ‘आर्केओगिरी’ हे नाव फेसबुकवर खुल्या मतदानातून सार्वमताने निवडले

शुभा खांडेकर Fri , 01 December 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/1537

.............................................................................................................................................

आपण पेरुगन आहोत. आपण एका व्यवस्थेचे व्यवस्थित बळी आहोत...

बरं झालं आपण पेरुगन मुरुगन झालो ते. वेळीच ज्याने निर्णय घेतला त्यानेच जगावर राज्य केलं. पेरुगन मुरुगन म्हणजे काय मस्त गोष्ट आहे. लोकशाहीत विचारांची लढाई विचारांनी लढली गेली पाहिजे असं काही नाही. बंदुकीची एक गोळी पण मस्त श्रीराम लागू होते. असे बरेच आवाज, घटनाक्रम पेरुगनच्या भवती फेर धरायला लागले. मणक्यातून वेदनेची एक सूक्ष्म कळ धावू लागलेली आहे

वर्जेश ईश्वरलाल सोलंकी  Fri , 24 November 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/1506

.............................................................................................................................................

म्हणे धर्मनिरपेक्ष राष्ट्र. अरे ह्या!

बाबाची एक गंमत सांगायची म्हणजे, तो कोणत्याही धर्माची सुट्टी असो, प्रत्येक सुट्टीच्या दिवशी घरात तणतणत  राहायचा की, लेकाच्या या धर्मांच्या सुट्ट्या कायमच्या बंदच केल्या पाहिजेत या देशातून. देशाच्या नावाच्या जेवढ्या सुट्ट्या आहेत दोनचार तेवढ्या ठेवल्या पाहिजेत. बाकी बंद. किंवा त्या त्या धर्मांच्या सुट्ट्या फक्त त्या त्या धर्मांच्या लोकांनाच दिल्या पाहिजेत. बाकीच्यांचा संबंध नाही

राजन खान Fri , 17 November 2017

http://www.aksharnama.com/client/article_detail/1477

.............................................................................................................................................

कृष्णा सोबती : आजच्या अतिरेकी दिवसांतला स्वच्छ मूल्यं असलेला दमदार आवाज

नुकताच २०१७ सालचा सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर झाला आहे. आपल्या ठाम भूमिकेमुळे त्यांच्या कलाकृतींना बहुआयामीपण प्राप्त झाले आहे. वर्तमान क्षणाला जे प्रस्थापित भेदात्मक वर्चस्ववादी सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, मानसिक संकेतांनी व संकल्पनांनी बाधित आहे, त्याला निखळ आवाज देणारे हे लेखकपण आहे

शोभा नाईक  Fri , 10 November 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/1448

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

“मी कोणत्याही बंदिस्त चौकटीत राहून काम नाही करू शकत. मी एखाद्या मुक्त पक्ष्यासारखी आहे!” - नासिरा शर्मा

आमच्या देशातल्या बुद्धिवादी लोकांना आशियातल्या आणि मध्यपूर्वेतल्या देशांविषयी फारशी माहितीच नाही. शिवाय माझ्यात एक त्रुटीही आहे. मी कधीच कुठल्या साहित्यिक गटात नव्हते. ना माझा कोणता गट आहे, ना मला गटबाजी करणं जमतं. आता याचे काही फायदेही आहेत आणि काही तोटेही आहेत, पण याचा अर्थ मला कुणीच ओळखत नाही असाही नाही. मला देशातल्या अनेक विचारी आणि बुद्धिवादी वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे

प्रमोद मुजुमदार Fri , 10 November 2017

http://www.aksharnama.com/client/article_detail/1447

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

या महिन्यात मासिक पाळी चुकणार याची तिला खात्री होती...

प्रसिद्ध तमीळ कादंबरीकार पेरुमल मुरुगन यांच्या ‘माधोरुबागन’ या कादंबरीने भारतीय साहित्यात खळबळ माजवली. ही कादंबरी त्यांना परत घेऊन माफीही मागावी लागली. गेल्या वर्षी या कादंबरीच्या ‘वन पार्ट वुमन’ इंग्रजी अनुवादाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यावरून तरुण कवी-कथाकार प्रणव सखदेव याने या कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे. या कादंबरीतील एक प्रकरण

पेरुमल मुरुगन Fri , 03 November 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/1423

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

 ‘दंशकाल’ - रहस्य, भीतीच्या पलीकडे जात समग्र मानवी आयुष्य कवेत घेणारी कादंबरी

‘दंशकाल’चं वाचन पुन्हा पुन्हा केलं तर त्यात रहस्याच्या, भीतीच्या पलीकडे जाऊन समग्र आयुष्य कवेत घेणाऱ्या बिंदूंची मांडणी दिसते. ‘दंशकाल’चं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करण्यामागे हेतू खरं तर हाच –की, गोष्ट सांगणारा कुणी गोष्टकार, गोष्ट न सांगताच काळाच्या उदरात गडप होऊन जाऊ नये आणि आपल्या सगळ्यांच्या गोष्टी सगळ्यांना स्पष्ट ऐकू येत राहाव्यात

स्वप्निल शेळके  Fri , 27 October 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/1401

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

गोळवलकरवाद (?) आणि आम्ही सेक्युलर भारतीय

आपण सेक्युलर मंडळींनी आता काय करायचं? कुणी रागावू नये, पण लक्षात घ्याव. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये दोन प्रकारची माणसं होती. एक- हुशार माणसं होती आणि दुसरी- जास्त हुशार माणसं होती. जास्त हुशार माणसांनी काय केलं? त्यांनी उद्ध्वस्त जर्मनीतलं सर्व रॉ-मटेरियल गोळा केलं आणि ते वापरून जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत स्थान मिळवलं. आपण हुशार आहोत की जास्त हुशार आहोत, हे ठरवण्याची वेळ आली आहे

विनय हर्डीकर  Sat , 30 September 2017 

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/1305

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

षांताराम पवार यांची कविता : चैत्रिक संवेदनशीलतेचा भाषिक उमाळा (पूर्वार्ध)

षांताराम हे आपल्या चैत्रिक संवेदनशीलतेतून आपल्या आसपासची जगरहाटी न्याहाळतात आणि त्यातील काही व्यवहार पाहून उमाळ्यानं त्यांच्या तोंडून जे भाषिक उदगार बाहेर पडतात त्यातून त्यांची कविता आकार घेते. यामुळेच त्यांच्या बऱ्याचशा कविता या आकारानं आटोपशीर असतात. क्वचित एखादी कविता भले तीन-चार पानांची असली तर शंकर महादेवनच्या सुप्रसिद्ध ब्रेथलेस गाण्यासारखे ते एकापुढे एक अथकपणे विराम न घेता ओळी लिहीत जातात

सतीश तांबे  Fri , 22 September 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/1281

षांताराम पवार यांची कविता : चैत्रिक संवेदनशीलतेचा भाषिक उमाळा (उत्तरार्ध)

षांतारामांच्या कवितेचं आवर्जून दखल घ्यावी असं आणखी एक वैशिष्ट्य असं की, त्यामध्ये बेगडीपणाचा, कृतकपणाचा लवलेश नाही. षांतारामांची कविता ही मूलत: विधानांची कविता आहे, जिला आपण त्यांचा स्वच्छंद असं म्हणू शकतो! या कवितेचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की, या कविता वाचताना त्यांचं वय जाणवत नाही. आज जी समकालीन कविता लिहिली जाते त्यात षांतारामांची कविता बेमालूम मिसळून जाऊ शकते

सतीश तांबे  Fri , 22 September 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/1280

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

अर्थशास्त्राकडे पाहण्यास सुरुवात करणाऱ्यांना खूप उपयोगी, पण अन्यथा निराशा करणारं पुस्तक

रघुराम राजन यांच्या ‘आय डू व्हॉट आय डू’ या पुस्तकाच्या सुरुवातीला नोटाबदलीबाबत केलेली त्रोटक आणि ‘पॉलिटिकली करेक्ट’ टिपणी, टीकाकारांना नामोल्लेख न करता दिलेले जबाब आणि वारंवार कळून येणारी अभ्यासविषयाची ठाम पकड हे ठळक बिंदू म्हणावे लागतील. कौशिक बसू यांच्या पुस्तकानंतर मूळच्या अॅकॅडमिक अर्थतज्ज्ञांनी त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारीबद्दल लिहिलेल्या पुस्तकांबद्दल अपेक्षा वाढल्या होत्या, पण

किरण लिमये  Thu , 21 September 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/1273

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

देवनागरी आणि अन्य भारतीय भाषांच्या लिप्या संगणकावर आणणाऱ्या ल. श्री. वाकणकरांची यशोगाथा

ल.श्री. वाकणकरांच्या संशोधनाची दखल ज्या प्रमाणात घ्यायला हवी होती, त्या प्रमाणात घेतली गेली नाही. देवनागरी आणि अन्य भारतीय भाषांच्या लिप्या संगणकावर ज्यांच्या संशोधनामुळे येऊ शकल्या, त्या वाकणकरांचे नावही सर्वसामान्यांना आज माहीत नाही. पाश्चात्य आणि भारतीय अभ्यासकांचे पूर्वग्रह इतके पक्के आहेत की, इंडो युरोपियन भाषाकुळातल्या संकल्पनेची वैय्यर्थता सिद्ध होऊनही ते आजही त्याचाच आधार घेतात

दीपक घारे  Fri , 08 September 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/1234

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

वेदनांचा प्रवास… आत आणि बाहेरही...

उपाय अनेक आहेत, असतील पण जोवर गरिबी, असहायता, अगतिकता, दुसऱ्यावर अवलंबित्व असेल, तोवर स्थलांतराच्या कहाण्यांचा शेवट होणार नाही. जीव किमान जगवावा इथपासून जीवमान अधिक उंचवावं इथपर्यंत अनेक प्रेरणांनी सीमेपलीकडे ये-जा चालूच राहणार. त्यासाठी धार्मिक, वांशिक, भाषिक, सांस्कृतिक अस्मितांचा आग्रह सोडत त्यापलीकडे स्वीकारशील व्हावं लागेल, हे आतून मान्य करू तोवर आहेच वेदनांचा प्रवास… आत आणि बाहेरही

नीतीन वैद्य  Fri , 01 September 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/1203

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

ऑपरेशन बेटी उठाओ

‘Operation Beti Uthao’ हा नेहा दीक्षित यांचा खळबळजनक प्रदीर्घ लेख ‘आउटलुक’ या साप्ताहिकाच्या ८ ऑगस्ट २०१६च्या अंकात प्रकाशित झाला होता. त्याचा त्याच म्हणजे ‘ऑपरेशन बेटी उठाओ’ या नावाने मराठी अनुवाद नुकताच लोकवाङ्मय गृह, मुंबई या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे. त्यातील हा काही भाग

नेहा दीक्षित  Fri , 18 August 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/1154

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

या पुस्तकाला आज जे महत्त्व मिळेल, त्यापेक्षा कैकपटीनं अधिक काही वर्षांनी येईल!

हर्डीकरांच्या लिखाणात सतत असणारा ‘मी’ आत्मसमर्थनात्मक नसून घटनेचा साक्षीदार या नात्यानं आलेला असतो. हर्डीकरांच्या याच प्रकारच्या लेखनामुळे त्यांचं हे पुस्तक केवळ तात्कालिक राजकीय विवेचन न राहता, ते एक प्रकारचं ‘क्रॉनिकल’ बनून राहील. आणि या पुस्तकाला आज जे काही महत्त्व आहे अथवा येईल, त्यापेक्षा कैकपटीनं अधिक महत्त्व काही वर्षांनी या साऱ्या काळाचं डॉक्युमेंटेशन करताना येईल, हे नक्की!

अथ‌र्व देसाई  Fri , 18 August 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/1153

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

शंकर चाफाडकर : पुस्तकांच्या घरातला माणूस

चाफाडकरांची तब्येत अलीकडे बरी नसते, त्यांना दम्याचा त्रास होतो आहे, हे माहीत होतं. त्यांचं वयही ऐंशीच्या पुढे झालं होतं. पण तरीही त्यांच्या उत्साहात, वाचनात आणि ग्रंथप्रेमात तसूभरही फरक पडला नव्हता. पुस्तकांविषयी बोलताना त्यांना आपल्या तब्येतीचा नेहमीच विसर पडायचा. बेळगावातल्या या पुस्तकप्रेमीचा हा खजिना अनुभवण्यासाठी कोल्हापूर, हुबळी, धारवाड, कोकण, गोवा अशा अनेक ठिकाणाहून वाचनप्रेमी जात असत

प्रवीण दशरथ बांदेकर  Fri , 11 August 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/1126

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

‘1984’ : २०१७ साली वाचलंच पाहिजे असं पुस्तक!

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेमध्ये जॉर्ज ऑर्वेलची ‘1984’ ही कादंबरी अचानक अॅमेझॉनच्या ‘बेस्टसेलर’ यादीत गेली. याला कारण होती अमेरिकेतील विद्यमान राजकीय परिस्थिती. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिकनांना पदोपदी ‘1984’ची आठवण येत आहे. भारतात काही अजून ‘1984’ बेस्टसेलर झालेली नाही. पण भारतातली विद्यमान राजकीय परिस्थिती अमेरिकेपेक्षा फारशी वेगळी नाही

मिचिको काकुतानी  Mon , 31 July 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/1089

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या साहित्याचे दर्शन कालदर्शिकेच्या माध्यमातून

श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे मराठीतील एक सर्वोत्तम ललितलेखक. त्यांची ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ आणि ‘कोरडी भिक्षा’ ही चार पुस्तके प्रसिद्ध आहेत. ही पुस्तके ललितलेखनातील मानदंड मानली जातात. त्यांच्या लेखनाचा हा आविष्कार कालदर्शिकेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे नाटककार-ललितलेखक हिमांशू स्मार्त आणि प्रकाशक राहुल कुलकर्णी यांनी. एकमेवाद्वितीय म्हणावा असा हा प्रयोग आहे

निवड व संपादन - हिमांशू स्मार्त Fri , 28 July 2017

http://www.aksharnama.com/client/article_detail/1076

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

लाल चिखल

डिसेंबर महिन्यात नोटबंदीमुळे पडलेल्या भावाला कंटाळून नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी २० लाख टोमॅटो रस्त्यावर टाकून दिले, तर छत्तीसगडमधील शेतकऱ्यांनी अशीच कितीतरी टन टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले. ५० पैसे किलो या भावानेही व्यापारी ते खरेदी करायला तयार नव्हते. सध्या मात्र टोमॅटोंचा भाव १०० रुपये किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे इंदूरमध्ये तर काही टोमॅटो विक्रेत्यांनी त्याची चोरी होऊ नये म्हणून सुरक्षारक्षक नेमले आहेत

भास्कर चंदनशिव  Tue , 25 July 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/1060

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

जादुई वास्तववादी शैलीतल्या अदभुत, उत्कंठावर्धक कथा

तांबे यांच्या कथांमधला निवेदक संवेदनशील आहे. आधुनिक विचारसरणीचा आहे. त्याचे सामाजिक भान सजग आणि तीव्र आहे. तो विज्ञानवादी आहे, तरीही अदभुतात रमणारा आहे. समाजातील आक्षेपार्ह गोष्टींबद्दल तीव्र नापसंती असलेला आहे. स्त्री-पुरुष संबंधांची जाण आधुनिक आहे. मनोव्यापारांचे सखोल आकलन आहे. कल्पित आणि वास्तव यांची बेमालूम सरमिसळ करून जादुई वास्तववादाची शैली तो अनुसरतो

आनंद थत्ते  Fri , 21 July 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/1043

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

​​​​​​​लीळाच, पण पुस्तकांविषयीच्या पु्स्तकांच्या!

रस्तुत पुस्तकात रिंढे यांनी पुस्तकांविषयीच्या पुस्तकांचा उदबोधक परिचय करून दिला आहे. तो अत्यंत वाचनीय तर आहेच, त्याचबरोबर वास्तविक पुस्तकसंस्कृती म्हणजे काय असते याची खोलवर जाणीव करून देणारा आहे. जगातल्या पुस्तकप्रेमींनी आणि पुस्तकवेड्यांनी पुस्तकसंस्कृतीला आकार दिला आणि ती आजपर्यंत टिकवून ठेवली

वसंत आबाजी डहाके Fri , 07 July 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/993

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

पुतिन नावाच्या हुकूमशहाची (कु)कर्मकथा!

जगभरात जनतेच्या भावनांशी खेळणारे, आक्रमक राष्ट्रवादाची भाषा करणारे, आक्रस्ताळे नेते सत्तेत येत आहेत. त्या सर्वांच्या आधीपासून पुतिन रशियात याच स्वरूपाचं राजकारण करत आहेत आणि सर्व मार्गांचा वापर करून टिकून आहेत. नव्यानं सत्तेच्या जवळपास पोचणाऱ्या अशा सर्व नेत्यांना पुतिन आपले आदर्श वाटू शकतात. त्यामुळे जगभरातील विचारी जनांनी पुतिन यांचे राजकारण आणि त्यांची कार्यशैली समजून घ्यायला हवी

संकल्प गुर्जर  Fri , 30 June 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/968

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

‘बालभारती’साठी मुखपृष्ठं करताना...

सातवी मराठी, नववी मराठी व इंग्रजी अशा ‘बालभारती’साठी तीन पुस्तकांची मुखपृष्ठं करण्याची संधी मिळाली. पुस्तकाचं उद्दिष्ट, मुलांवर त्याचा होणारा परिणाम आणि संपूर्ण महाराष्ट्रात किती वैविध्यपूर्ण जीवनशैली जगणाऱ्या मुलांच्या हातात ही पुस्तकं जातात हे जाणून घेऊन काम सुरू केलं. सर्व मुलामुलींना त्यांच्या संदर्भकक्षेतून चित्राशी जोडलेपण वाटावं, असं आव्हानात्मक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं

आभा भागवत Fri , 30 June 2017

http://www.aksharnama.com/client/article_detail/967

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

सेक्युलरायझेशनचा मूर्तिमंत जाहीरनामा

हे पुस्तक आकाराने अगदीच छोटेसे आहे. अगदी खरेय! अगदी प्रस्तावनेसह मोजायचे झाले तरी उण्यापुऱ्या एकशे वीस पानांत ते संपूनही जाते. पण या ठिकाणी हेही लक्षात घेणे गरजेचे की, मुळात जाहीरनामे अर्थात मॅनिफेस्टो हे आकाराने लहानच असतात. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो तरी असा कितीसा मोठा आहे? साधारणतः दीडशे पानांत तो संपतो. जाहीरनामे हे नेहमीच आकाराने छोटे, थेट काय ते बोलणारे आणि समोरच्याचे लक्ष चटकन वेधून घेणारे असेच असतात

विनय हर्डीकर  Fri , 09 June 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/902

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

आजची मराठी विज्ञानकथा कशी आहे?

गेल्या दहा वर्षांमधल्या शंभराहून अधिक चांगल्या विज्ञानकथा पाहिल्या तर त्यांच्यात सर्वांत जास्त उठून दिसणारा समान दुवा आहेत- तो म्हणजे विषयांमधली प्रचंड विविधता. विज्ञानकथांचा रोख बहुधा भविष्याकडे असतो. तरीही या विविधतेमध्ये बर्‍याचदा आजच्या विषयांना हात घातलेला दिसतो हे महत्त्वाचं. मराठी विज्ञानकथाखरोखरीच आजची आणि आजच्या मुख्य साहित्यप्रवाहाशी सुसंगत अशी प्रयोगशील दिसत आहे

मेघश्री दळवी, प्रसन्न करंदीकर  Sun , 30 April 2017 

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/766

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

निरंजन घाटे : विद्वत्तेची झूल न पांघरलेला विद्वान

ज्येष्ठ विज्ञानलेखक निरंजन घाटे यांचं ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट -एका लेखकाच्या ग्रंथप्रेमाची सफर’ हे १८५वं पुस्तकं नुकतंच प्रकाशित झालं आहे. विपुल लेखन करणाऱ्या घाट्यांच्या घराच्या भिंतीच पुस्तकांच्या आहेत! चित्रशाळेतली त्यांची खोली तर केवळ पुस्तकांनी खच्चून भरलेली आहे. तिच्यात शिरताना डोंगरातल्या गुहेत शिरावं तसं पुस्तकांच्या गुहेत शिरल्यासारखं वाटतं. त्यांच्याविषयीचा हा लेख

सुबोध जावडेकर  Sun , 30 April 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/765

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

‘Who Killed Osho?’ : ओशोच्या मृत्यूबद्दलचे खरेखुरे सत्य सांगणारे पुस्तक

‘मृत्युबद्दल दु:ख न बाळगता मृत्युचा उत्सव साजरा करावा’ असा संदेश देणारे आचार्य भगवान रजनीश उर्फ ओशो यांच्याच मृत्यूबद्दल शंका घ्यावी अशी परिस्थिती आहे. १९ जानेवारी १९९० रोजी ओशोंचा झालेला मृत्यू संशयास्पद मानला जातो. अमेरिका आणि युरोपियन न्यायालयात ओशोंच्या मृत्यपत्राबाबत खटला चालू आहे. २६ वर्षांनंतर या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे

श्रीनिवास देशपांडे  Sun , 30 April 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/764

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

आठवणीतले आप्पा

प्रसिद्ध प्राच्यविद्या संशोधक, ‘माफुआ’कार कॉम्रेड शरद पाटील यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीच्या ‘क्रांतिकारी सत्यसोधक - कॉम्रेड शरद पाटील’ या लेखसंग्रहाचे आज पुण्यात प्रकाशन होत आहे. या संग्रहात पाटील यांची कन्या, प्रा. सुजाता शिंदे यांच्या लेखाचाही समावेश आहे. वडिलांविषयीच्या हृद्य आठवणी सांगणारा हा त्यांचा लेख

प्रा. डॉ. सुजाता शिंदे  Wed , 12 April 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/715

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

जेएनयूमधले जगणं समृद्ध करणारे दिवस!

हे कसलं विद्यापीठ आहे की, जिथे युवकाला धडक मारणाऱ्या त्या ड्रायव्हरचा समाचार घेण्याऐवजी त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्याचं समर्थन केलं जात होतं! तोपर्यंत मी हेच पाहत आलो होतो की, अशा घटना घडतात तेव्हा लोक स्वतःच्या ताकदीचा उपयोग करतात, डोक्याचा नाही, पण इथे डोक्याचा उपयोग केला जात होता. त्या रात्री मी जेएनयूमध्येच थांबलो. जे जेएनयूमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना प्रवेश घेण्याआधीच जेएनयूमध्ये जागा मिळते

कन्हैया कुमार, अनुवाद - सुधाकर शेंडगे  Sun , 02 April 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/683

​​​​​​​​​​​​​​.............................................................................................................................................

फोगाट नावाची अफाट यशोगाथा

बलाली गावाच्या वेशीवर स्वागत करण्यासाठी उभारलेल्या कमानीवर लिहिण्यात आलेल्या गौरवोद्गारांना बघून एका माणसाच्या अखंड जिद्दीमुळे या खेड्यातल्या लोकांच्या दृष्टिकोनामध्ये आणि मागासलेल्या विचारांमध्ये कसा बदल झाला हे वाखाणण्याजोगं आहे. त्या कमानीवर लिहिलं आहे- “आंतरराष्ट्रीय महिला पेहेलवान गीता, बबिता, विनेश आणि रितू फोगाट यांच्या बलाली गावात आपलं स्वागत आहे.” ज्यांचं अस्तित्वच या जगातून पुसून टाकावं अशा मत

सानिया भालेराव  Fri , 06 January 2017

http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/383

​​​​​​​.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Ravi

Sat , 30 December 2017

खूप खूप आभार अक्षरनामा..

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......