२०१७ : बेस्ट ऑफ ‘सत्तावर्तन’ (राजा कांदळकर)
सदर - सत्तावर्तन
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 26 December 2017
  • संकीर्ण वर्षाखेर विशेष सत्तावर्तन राजा कांदळकर

संपादक-पत्रकार राजा कांदळकर यांचं ‘अक्षरनामा’वरील ‘सत्तावर्तन’ हे समकालीन राजकारणाचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. वर्षभरात या सदरात प्रकाशित झालेल्या लेखांपैकी काही उत्तम अशा लेखांची ही झलक. त्यातून वर्षभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींवरही प्रकाश पडतो... आणि त्यांवरचं भाष्यही जाणून घेता येतं...

.............................................................................................................................................

नाना पटोलेंचं बंड सुफळ संपूर्ण होईल?

भाजप काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक मोहऱ्यांना पावन करून घेत असताना त्यातलाच एक मोहरा कसा उलटतो याचा अनुभव भाजपला यानिमित्तानं येत आहे. आज पटोले एकटे आहेत. उद्या त्यांना जोड मिळाली आणि आणखी काही नाराज खासदार-आमदार या बंडाच्या झेंड्याखाली उभे राहणारच नाहीत असं नाही. आणि हे बंड राज्यपातळीवर भडकू शकत नाही असंही कुणी खात्रीनं म्हणू शकणार नाही.

Wed , 20 September 2017

.............................................................................................................................................

राज्य सरकारला न्या. अभय ओक यांची अॅलर्जी का आहे?

न्या. ओक पक्षपाती भूमिका घेतात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सरकारचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी भर न्यायालयात केली आणि सर्वत्र शांतता पसरली. न्या. ओक यांना दूषणं देऊन आणि मुंबई उच्च न्यायालयाची प्रतिष्ठा धोक्यात आणण्याचा प्रयत्न करून फडणवीस सरकारनं चुकीचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आणि मुख्य म्हणजे स्वतःची फटफजिती करून घेतली!

Wed, 30 August 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

टिळकभक्तांनो, मन करा रे थोर!

टिळकभक्तांनी मन मोठं केलं पाहिजे. गणेशोत्सवाचं जनकत्व निर्विवादपणे भाऊसाहेब रंगारी यांना देऊन हा वाद मिटवायला हवा. त्यामुळे लोकमान्य टिळकांची थोरवी आणखी वाढेल. कारण अशा वादात मन मोठं करण्याची भूमिका खुद्द टिळकांनी अनेक ठिकाणी, अनेक वेळा घेतलेली दिसते. टिळक हे मोठेच आहेत, याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. रंगारी यांना त्यांचा मान दिल्यानं त्यांचं मोठेपण उणावण्याचंही काहीएक कारण नाही.

Wed, 23 August 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

५८व्या मूक मराठा मोर्च्यावरील टळलेली तीन विघ्नं

९ ऑगस्ट २०१६ला औरंगाबादमध्ये पहिला मराठा क्रांती मूक मोर्चा निघाला. तेव्हापासून कालच्या मुंबईच्या ९ ऑगस्टच्या मोर्च्यासह गेल्या वर्षात राज्यभर ५८ मोर्चे निघाले. मुंबईचा मोर्चा निर्वाणीचा होता. लोकांचा सरकारवर रोष होता. मोर्च्याची कोणतीच मोठी मागणी सरकार मान्य करत नाही म्हणून लोकांमध्ये संताप होता. या पार्श्वभूमीवर काही आगळीक घडू नये, असा प्रयत्न होता. तरीही तीन विघ्नं येऊ पाहत होती.

Thu, 10 August 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

रामचंद्र गुहांचा फॉर्म्युला यशस्वी होईल काय?

काँग्रेसनं गांधी घराण्याच्या प्रेमापोटी इतर बदल स्वीकारले नाहीत. नेतृत्व बदल केला नाही तर काँग्रेसलाच पर्यायी नवा पक्ष उदयाला येईल, असं भाकीतही गुहा यांनी केलं आहे. तशीही काँग्रेसची गरज संपलेली आहे. काँग्रेसचं नेतृ्त्व असंच आळशी, निष्क्रिय आणि चालढकल नेत्यांच्या हातात राहिलं तर लोक नवा पक्ष उदयाला आणतील. इंदिरा गांधी यांच्या एकछत्री बलदंड सत्तेला पर्याय देण्यासाठी आणीबाणीच्या काळात लोकांतून जनता पक्ष उदयाला.

Wed, 19 July 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

ज्याला नाही कोणी, त्याला विखे पाटलांची लोणी

महाराष्ट्रात ज्या राजकीय घराण्यांनी, नेत्यांनी राजकारणाची स्वत:ची खास शैली निर्माण केली, त्यात विखे पाटील यांचं घराणं महत्त्वाचं मानलं जातं. या राजकारणाच्या शैलीला किंवा पॅटर्नला ‘लोणी पॅटर्न’ म्हटलं जातं. अशीच राजकारणाची वेगळी शैली शरद पवार यांच्या घराण्याने निर्माण केली. त्याला ‘बारामती पॅटर्न’ म्हणता येईल. ‘लोणी पॅटर्न’ला ‘बारामती पॅटर्न’पेक्षा जुनी पार्श्वभूमी आहे.

Wed, 12 July 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

…तर कदाचित गोपाळकृष्ण गांधी राष्ट्रपती झाले असते!

गांधी नकोत, आंबेडकरही नकोत, या काँग्रेसच्या भूमिकेमुळे नीतिशकुमार दुखावले. कम्युनिस्ट नाराजी दाखवत नसले तरी त्यांचं मौन बोलकं आहे. आणि देशातल्या जनतेला जायचा तो संदेश गेला आहेच. मीराकुमार या हरणाऱ्या उमेदवार आहेत, असा विनोद आता रामदास आठवलेही करू लागले आहेत! गांधी-आंबेडकरांना टाळणारा काँग्रेस पक्ष भाजपच्या आक्रमक राजकारणाला उत्तर कसा देणार, हा गंभीर प्रश्न राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने पुढे आला आहे.

Wed, 05 July 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

कुमार केतकरांच्या भविष्यवाणीतल्या खाचाखोचा

केतकर म्हणतात तसं लोकशाही, सेक्युलर विचार देशात राहिले पाहिजेत यात वाद नाही, पण बेभरवशाचे, लेचेपेचे सैन्य घेऊन ही लढाई थोडीच जिंकता येणार आहे? वाजपेयी, अडवाणींचा भाजप वेगळा होता, आताचा मोदी-शहा यांचा भाजप वेगळा आहे. हा भाजप लोकशाही, सेक्युलर असल्याचं हुशारीने भासवून सत्तास्थानी स्थिरावलाय. पुढची वाटचाल करतोय. त्याला रोखायचं असेल तर त्यापेक्षा जास्त हुशारी दाखवावी लागेल. ती हुशारी राहुल गांधींकडे कधी येणार?

Wed, 28 June 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

सत्यपाल महाराजांवरचा हल्ला पाच दिवस कुणी लपवला?

गेली किमान ३० ‌वर्षं सत्यपाल महाराजांचं कीर्तन महाराष्ट्र ऐकतोय. करोडो लोक त्यांच्या कीर्तनाचा आस्वाद घेऊन विचारमग्न झाली. अशा मोठ्या कीर्तनकारावर हल्ला होतो आणि त्याने ना सत्तेच्या अंगावर काटा उभा राहतो, ना पोलीस यंत्रणेला पत्रकार परिषद घेऊन लोकांना माहिती द्यावीशी वाटते, ना केईएम हॉस्पिटलच्या प्रमुखांना, ना राज्याच्या गृहखात्याच्या प्रमुखांना प्रसारमाध्यमांशी या विषयावर बोलावंसं वाटतं.

Fri, 19 May 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

उत्तर प्रदेशने उभे केलेले प्रश्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नेहमी शिमगा करणाऱ्यांना उत्तर प्रदेशातल्या विजयाने पुन्हा एकदा तोंडात बोट घालायला लावलं आहे. हा विजय साधासुधा नाही. याला राक्षसी बहुमतच म्हणावं लागेल. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला ४७ जागांवर आपटी खावी लागली, तर काँग्रेसला ७ जागा मिळवून तोंड लपवावं लागलं. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचा हत्ती १९ जागांवर गाळात फसला.

Sun, 12 March 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

गुरमेहेर, तू ग्रेट आहेस आणि सेहवाग, तू खुजा!

गुरमेहेर १९ महिन्यांपासून ती ही कॅम्पेन करते आहे. रामजस प्रकरणाअगोदरपासून तिची ही भूमिका युट्यूबवर उपलब्ध आहे. लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आहे. मग तोपर्यंत अभाविपचं लक्ष गेलं नव्हतं का? तेव्हा रिजिजू, सिन्हा, सेहवाग आणि आता बलात्काराची धमकी देणारे कुठे होते? रामजस प्रकरणात गुरमेहेरने अभाविपविरुद्ध भूमिका घेतल्यावर त्यांनी तिची भारत-पाक शांततेसंबंधीची भूमिका वादग्रस्त ठरवली.

Wed, 01 March 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

“शरद पोंक्षेंचा खून करायचाय! काय करू?”

“नथुरामा तुझी अवस्था पाहून दु:ख वाटतं रे. घड्याळाचे काटे उलटे फिरवता आले असते तर तुलाही नेलं असतं माझ्या सोबत आफ्रिकेला, भारत दर्शनाला, इंग्लंडला, नौखालीला. दाखवलं असतं तुला जगातलं द्वेष आणि प्रेमाचं चिरंतन द्वंद्व. ओळख करून दिली असती तुला प्रेमातून निपजणाऱ्या सुखाची, शांततेची आणि मानवतेची. पण आता सगळंच तुझ्या-माझ्या हाताबाहेर गेलंय. मला अनुसरणं नेहमीच अवघड आहे, तुला अनुसरणं मात्र आजकाल खूप सोप्पं झालंय.”

Wed, 25 January 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......