२०१७ : बेस्ट ऑफ ‘कळ’फलक (संजय पवार)
सदर - ‘कळ’फलक
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 26 December 2017
  • संकीर्ण वर्षाखेर विशेष कळफलक संजय पवार

प्रसिद्ध नाटककार, स्तंभलेखक संजय पवार यांचं ‘अक्षरनामा’वरील ‘‘कळ’फलक’ हे बंद्या रुपयासारखं खणखणीत साप्ताहिक सदर. वर्षभरात या सदरात प्रकाशित झालेल्या लेखांपैकी काही उत्तम अशा लेखांची ही झलक. त्यातून वर्षभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींवरही प्रकाश पडतो... आणि त्यांवरचं संजय पवार यांचं मर्मभेदक भाष्यही जाणून घेता येतं...

.............................................................................................................................................

छकुली आणि मी

छकुलीशी काहीही संबंध नसताना, पार कोर्टात जाऊन निकाल ऐकून आले. खरं तर त्या गर्दीत मला हंबरडा फोडावासा वाटत होता. अगदी मोठ्यानं. छाती फुटली असती इतक्या जोरात. छकुलीसाठी नाही. माझ्यासाठीच. छकुलीचं नाव कळलं नाही, तसं माझंही नाव कुणाला माहीत नाही. छकुलीला रेप करून मारणारांची नावं जशी कळली, तसंच माझ्यावर प्रेम करून जीवानिशी गेलेल्या त्या माझ्या प्रियकराचं नावंही तुम्हाला माहीत आहे. नितीन आगे!.......

Thu, 07 December 2017

.............................................................................................................................................

 ‘मी लाभार्थी’ थर्ड डिग्रीचा! - अनिकेत कोथळे (२६)

महाराष्ट्रीय जनहो! तुम्ही आम्ही आपण सर्वच या मायबाप सरकारचे असे ना तसे ‘लाभार्थी’ आहोत. आपल्या सर्वांच्याच कहाण्या कदाचित जाहिरातीत येणार नाहीत. त्यांना प्रसिद्धी मिळणार नाही. अशा वेळी रसून न बसता, जे कुणी ‘मी लाभार्थी’ म्हणून झळकले, मिरवले त्यांच्याबद्दल कणमात्र असूया न बाळगता आपण आपल्याला मिळालेला लाभ, आपणच एकमेकांना सांगायला हवा. आपणच आपला आधार (क्रमांक नव्हे!) बनूया.......

Tue, 14 November 2017

.............................................................................................................................................

‘फेसबुक’ ठीक हो! ‘फेस टु फेस’ कधी भिडणार?

एका पक्षाच्या नेत्यानं आता किती जणांच्या पोस्ट वाचायच्या? कविता झेलायच्या? प्रतिपादनं मांडायची, खोडायची? आपल्या कोशात जाऊन बसलेले राज ठाकरे फेसबुक वरून पुन्हा कोशातच जाणार. केवळ निवडणुका आल्यावरच मैदानं शोधायची? ‘फेसबुक’पेक्षा ‘फेट टु फेस’ हा व्यक्तीकडून समष्टीकडे जाणारा राजकारणाचा खरा पाया आहे. आज लोकांच्या असंतोषाला वाचा फोडणारा आवाज हवाय, व्हर्च्युअल नाही तर खऱ्या भूमीवर....... 

Tue, 26 September 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

तोही एक सदोष मनुष्यवध होता, हाही एक सदोष मनुष्यवध आहे…

मुंबई पोलिसांनी कामगारनगरातील सहा मुलांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय! पोलिसांची ही तत्परता डॉ. खोलेबाईंची तक्रार घेताना दिसून आलीच होती. पण या पोरांवर थेट सदोष मनुष्यवधाचंच कलम काय म्हणून लावलं? आणि जे तर स्पष्ट झालं तर मग रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यासाठी कंत्राटदार, पालिका, आयुक्त, वार्ड ऑफिसर यांपैकी किती जणांवर आजपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लावलाय?.......

Wed, 20 September 2017 

​​​​​​​.............................................................................................................................................

एक ‘आरजे’ बीएमसी को…

आरजे मलिष्का काय, वागळे काय, ‘ईपीडब्ल्यू’चे संपादक काय, या मच्छरांची सर्वशक्तीमान सत्तेला नेमकी भीती वाटते कशाची? त्यांच्या ‘किटक’सदृश्य उपस्थितीची? की त्यांच्या अणकुचिदार दंशांची? जशी हत्तीला मुंगी कानात शिरायची वाटते तशी?... सोनूचा भरोसा आज बीएमसीवर नाय, पण उद्या तो राज्य मंत्रालय किंवा केंद्र सरकारवरही राहिला नाही तर? तेव्हा राधासुता तुझा धर्म काय राहिल हे लवकर कळेलच!.......

Wed, 26 July 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

परवाच्या पराभवाला जबाबदार काँग्रेस!

२०१४ पासून तो शेपूट घालूनच बसला होता. हूं नाही की चूं नाही. आपल्या सैन्यावर गोळीबार दूरच, इस्लामाबादेतून मान वळवून बघायचीही हिंमत नाही. गिरनारचा सिंह दिल्लीत वास्तव्याला आल्यापासून पार गळपटलाय शेरखान! निमूट शाल पांघरून, दिलेली मिठाई खात बसतो! अशा शोचनीय शत्रू राष्ट्राच्या अकरा लोकांनी १२५ करोड जनतेच्या हातातोंडातला घास नाक खाजवून दाखवत घेऊन जावा? स्वत:च फस्त करावा? या शोचनीय पराभवाला, मानहानीला कारण काँग्रेस!....... 

Tue, 20 June 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

चला, मोदीमुक्त भाजप करू या!

शीर्षक बरोबरच आहे. अजिबात गफलत झालेली नाही. गोंधळ नाही. उपहास, उपरोध किंवा खास भाजप स्टाईल नावीन्यपूर्ण शब्दप्रयोगही नाही. आहे, ते विधान आहे. ठाम विधान आहे. सदिच्छा म्हणा हवं तर. सद्यकालीन दोन तृतीयांश बहुमतासह सत्तेवर असलेल्या, २५ वर्षांहून अधिक वय असलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या पक्षांतर्गत निर्णयात ढवळाढवळ करण्याचीही आमची इच्छा (आणि देशद्रोही धमक) नाही. तरीही आम्ही असं का म्हणतोय? .......

 Tue, 30 May 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

ना खाया, ना पिया…गिलास तोडा उसका बाराना!

तर इथून पुढे लक्षात ठेवा, भारत बदलतो म्हणजे मोदींचा कुर्ता बदलतो. भारत बदलतो म्हणजे मोदींचं जॅकेट बदलतं. भारत बदलतो म्हणजे मोदींचं ताजं भाषण. भारत बदलतो म्हणजे मोदींची नवी घोषणा. भारत बदलतो म्हणजे मोदींच्या नव्या घोषणेची सर्व प्रसारमाध्यमांतील जाहिरात. भारत बदलतो म्हणजे सरकार विरोधात कुठेच काही छापून, लिहून न येणं, प्रक्षेपित न होणं, व्हायरल न होणं. भारत बदलतो म्हणजे मोदीच पंतप्रधानपदी आजन्म राहणं.......

Tue, 23 May 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

तीच भूमी, तेच प्रश्न, तीच लढाई!

मुक्ता टिळक या बहुधा शिक्षित असाव्यात. तरीही त्या जेव्हा अज्ञानमूलक बोलतात, तेव्हा त्यांचे डोके ठिकाणावर आहे का, हे विचारणं भाग पडतं. आणखी एक घासून गुळगुळीत झालेला मुद्दा. आरक्षणात फक्त प्रवेश घेताना गुण कमी-जास्त हे तत्त्व पाळलं जातं. आरक्षणातल्या विद्यार्थ्याला परीक्षेत, गुणांत आरक्षण नसतं. तिथं ३५च्या खाली नापास, ६० पर्यंत प्रथम वर्ग, पुढे डिस्टिंक्शन हे इतर विद्यार्थ्यांप्रमाणे त्यालाही लागू असतं. .......

Tue, 09 May 2017 

​​​​​​​.............................................................................................................................................

उन्मादाला ‘चपराक’ अशी बसेल की…

राजकीय यशानं संघ परिवाराला जो उन्माद चढलाय. त्यामुळे गोहत्या, राममंदिर आदि विषयावर शिरच्छेदापर्यंत जिभा सैल सुटल्या आहेत, तर कुणी तरुण विजय ‘दक्षिणेत आम्ही काळ्यांसोबत राहतोच की!’ म्हणून बेलगाम वर्णवर्चस्ववादी बोलतो! संघ परिवाराने आपला हा हिंदू राष्ट्रवादाचा भगवा उन्माद थांबवावा. अन्यथा या देशातला सच्चा भारतीय या उन्मादाला अशी चपराक देईल की, ज्याचा प्रतिध्वनी खैबरखिंडीतही ऐकू येईल!.......

Tue, 11 April 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

जळता निखारा गिळलेला माणूस!

असंख्य आठवणी घेऊन परवा भैय्यालाल भोतमांगे गेला. सर्वोच्च न्यायालयाला एक तारीख उधार देऊन गेला. फाशीवरून जन्मठेपेवर आलेल्यांना कदाचित चौदा वर्षांचा दिलासा देऊन गेला. बायकोची बदनामी, मुलांची स्वप्नं काळजात कोरून गेला. भैय्यालाल गेली दहा वर्षं एक जळता निखारा गिळून जगत होता. परवा चिता पेटली असेल. नंतर राख साचली असेल. राख सावडायला कुणी गेलंच असेल तर त्याला तो जळता निखारा परवाही जळतानाच दिसला असेल!.......

Tue, 24 January 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

मोदी मला भेटले

मोदी मला भेटले त्याची ही गोष्ट एकाच अपवादाने पुन्हा भेटत राहते. ईश्वरप्रतिरूप झालेले मोदी मला फक्त एकाच ठिकाणी भेटले नाहीत. सुरक्षारक्षकांच्या गराड्यात, मुलांना प्राथमिक शिक्षण देणाऱ्या, यशोदाबेन नरेंद्र मोदी या प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेच्या शाळेत मोदी मला भेटले नाहीत. अर्थात कुसुमाग्रज म्हणालेच होते, ज्यांना हवाय त्यांच्यासाठी ईश्वर आहे, ज्यांना नकोय त्यांच्यासाठी तो नाही. या वाक्यासह शेवटी मोदी मला भेटले.......

Tue, 17 January 2017

​​​​​​​.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......