अजूनकाही
आज बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित गुजरात विधानसभेचा निकाल जाहीर होणार. देशभर आणि जगभर (पाकिस्तानातसुद्धा!) या निवडणुकीविषयी उत्सूकता आहे. बहुतांश एक्झिट पोल्सनी भाजपच गुजरातमध्ये सत्तेवर येणार असा ठोस अंदाज वर्तवला आहे. पण गुजराती मतदार खरोखरच भाजपला निवडून देतात की, काँग्रेसला याचा फैसला आज होईल.. दूध का दूध, पानी का पानी...
.............................................................................................................................................
हे ग्राफिक मागच्या पंधरवड्यात मिंट या इंग्रजी वर्तमानपत्रात प्रकाशित झाले होते. गुजरात विधानसभा निवडणुकीची माहिती यातून जाणून घेता येते.
१२ डिसेंबर रोजी योगेंद्र यादव यांनी भाजपचा गुजरात विधानसभा निवडणुकीत पराभव होऊ शकतो, याचा अंदाज वर्तवणारे ट्विट केले. त्यावेळी त्यांनी तीन शक्यता सांगितल्या होत्या. त्या शक्यतांची एका हिंदी वर्तमानपत्रात आलेली ही बातमी. या बातमीनुसार काँग्रेस गुजरातमध्ये सत्तेत येऊ शकते का, याच्या तीन सकारात्मक शक्यता सांगितल्या आहेत.
प्रख्यात निवडणूक तज्ज्ञ योगेंद्र यादव दै. लोकसत्तामध्ये ‘देशकाल’ या नावानं साप्ताहिक सदर लिहितात. त्या सदरामध्ये त्यांनी ७ डिसेंबर रोजी लिहिलेला लेख. यात त्यांनी भाजपचा गुजरातमध्ये पराभव होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली होती.
निवडणूक तज्ज्ञ योगेंद्र यादव यांनी भाजपचा गुजरातमध्ये पराभव होईल, असा आपण वर्तवलेला अंदाज चुकीचा होता, याविषयीची ही ‘फायनान्सिअल एक्सप्रेस’मध्ये आलेली बातमी. ती १५ डिसेंबर रोजी प्रकाशित झाली आहे.
बीबीसी मराठी या पोर्टलनेही वेगवेगळ्या एक्झिट पोल्सची आकडेवारी एकत्र दिली आहे. त्यात भाजपला बहुमत मिळेल असाच दावा केलेला आहे.
‘लोकमत नेटवर्क १८’ या वृत्तवाहिनीने वेगवेगळ्या एक्झिट पोल्सचे अंदाज एकत्रितरीत्या दिले आहेत. त्यात ‘टाइम्स नाऊ’ या टाइम्स समूहाच्या इंग्रजी वृत्तवाहिन्याच्या वतीने घेण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला गुजरातमध्ये सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.
‘लोकमत नेटवर्क १८’ या वृत्तवाहिनीने वेगवेगळ्या एक्झिट पोल्सचे अंदाज एकत्रितरीत्या दिले आहेत. त्यात ‘टाइम्स नाऊ’ या टाइम्स समूहाच्या इंग्रजी वृत्तवाहिन्याच्या वतीने घेण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला गुजरातमध्ये बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज आधीच्या अंदाजानंतरचा आहे.
व्यंगचित्रकार युसुफ मुन्ना यांनी मागच्या आठवड्यात आपल्या फेसबुक वॉलवर टाकलेले हे व्यंगचित्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीत आणि त्याआधी जे जे बाण सोडले, त्यातला कुठलाच बाण योग्य निशाण्यावर लागणार नाही, असे युसुफ यांनी या चित्रातून सूचित केले आहे.
राहुल शर्मा यांनी गुजरातमध्ये भाजपचा पराभव का होऊ शकतो, याची दिलेली कारणे. ही पोस्ट त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर १६ डिसेंबर रोजी टाकली आहे. कारणं योग्य वाटतात खरी, पण गुजराती मतदारांना ती कितपत ग्राह्य वाटतात, याचा निवाडा आज होईल.
महेश शहा हे दै. सकाळचे अहमदाबादमधील वार्ताहर. त्यांनी मात्र एक्झिट पोल्सनी भाजपला गुजरातमध्ये निवडून दिले असले तरी, गुजरातमधील निवडणूक तज्ज्ञ, अभ्यासक, एनजीओ यांचा हवाला देत गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक आणि आश्चर्यकारक लागण्याची शक्यता कालच्या आपल्या बातमीमध्ये वर्तवली आहे. ती कितपत खरी ठरते, ते कळलेच.
.............................................................................................................................................
‘मध्यमवर्ग- उभा, आडवा, तिरपा’ या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299
.............................................................................................................................................
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment