टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • राममंदिर, हार्दिक पटेल, राहुल गांधी आणि बाबरी मशीद
  • Sat , 09 December 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya राहुल गांधी Rahul Gandhi

१. गुजरातमधील डभोईचे भाजपचे उमेदवार शैलेश मेहता यांनी जे लोक ‘दाढी’ आणि ‘टोपी’चे समर्थन करतात, त्यांनी आपला आवाज वाढवू नये. त्यांना दहशत बसवण्यासाठीच मी आलो आहे, असा दमच एका सभेत दिला. सभेत कोणी दाढीधारी व्यक्ती असेल तर मी त्यांची माफी मागतो. पण या गोष्टी कमी झाल्या पाहिजेत. मला अनेकांनी गर्दीच्या ठिकाणी असं वक्तव्य करू नये अशा सूचना केल्या आहेत. पण मी केवळ १० टक्के लोकांमुळे मौन का बाळगू? ते जे काही काम करत आहेत, त्यांना ते बंद करावंच लागेल. एका तडीपार व्यक्तीला भाजप उमेदवाराची भीती वाटते, असं बुधवारी शांतता समितीच्या बैठकीत एकानं सांगितलं. हे लोक घाबरावे यासाठीच मी इथं आलो आहे. तडीपार आणि समाजकंटकांना घाबरण्याची गरज आहे. त्यांच्यात डोळे वर करण्याची हिंमत आली नाही पाहिजे. त्यांनी जर असं केलं तर याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असं मेहता म्हणाले.

गुजरातेत काही पदार्थांवर बंदी आहे ना? भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असून हे गृहस्थ जाहीरपणे दाढीवाल्यांबद्दल बोलतायत, तडीपारांबद्दल बोलतायत, तडीपारांना दहशत असली पाहिजे, वगैरे मुक्ताफळं उधळतायत. यांच्यावर पक्षनेतृत्वावर टीका केल्याबद्दल पक्षशिस्तीच्या भंगाची कारवाई व्हायला हवी.

.............................................................................................................................................

२. बँक ऑफ बडोदा दरोडय़ाचा उलगडा हिवाळी अधिवेशनापूर्वी व्हावा यासाठी नवी मुंबई पोलिसांनी आरोपींना बोलतं करण्यासाठी खेकड्यांचा वापर केला, असं समजतं. उलवा येथून आणलेले जिवंत खेकडे नांग्या काढून आरोपींच्या अंगावर सोडण्यात आले होते. त्यांच्या भीतीनं आरोपींनी पोलिसांना माहिती दिल्याचं सांगण्यात येतं. त्याचप्रमाणे एका आरोपीला कुटुंबाला अटक करणार असल्याचं पोलिसांनी सांगितल्यानंतर त्यानं सर्व सांगण्याची तयारी दर्शवली. त्याच्या मागणीनुसार त्याच्यासाठी मद्य आणि बिर्याणीचीही व्यवस्था करण्यात आली. ही संपूर्ण टोळी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या नावावर विविध पोलिस ठाण्यात ३०-४० गुन्हे दाखल असल्याचं समजतं. पोलिस या टोळीवर मोक्का लावण्याच्या तयारीत आहेत. या गुन्ह्यातील केवळ ५० टक्के ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोलिस स्टेशनात गुन्हेगारांचेही योग्यतेनुसार वर्ग केले जातात की काय? की आर्थिक गुन्ह्यांसाठी, पोलिसांची बेअब्रू करणाऱ्या गुन्ह्यांसाठी वेगळ्या पद्धती वापरल्या जातात? फुटकळ पाकिटमारांना किंवा पाकिटमारीचा साधा संशय असलेल्यांनाही जीव जाईल इतका मार पडतो आणि अख्खी बँक लुटणाऱ्या बड्या गुन्हेगारांसाठी बिर्याणी आणि मद्यपानाची व्यवस्था होऊ शकते. गुन्हाच करायचा, तर तोही मोठाच करावा, असा संदेश या बातमीतून मिळतो आहे.

.............................................................................................................................................

३. भाजपशी पटलं नाही म्हणून पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या नाना पटोलेंकडून शिवसेनेनं स्वाभिमान शिकावा, असा उपरोधिक सल्ला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिला. ‘सत्ता सोडू आणि सरकारमधून बाहेर पडू’ असं म्हणायचे, खिशात राजीनामे असल्याचे इशारे द्यायचे आणि सतत सरकारसमोर नाक घासत राहायचं. वारंवार नाक घासल्याने आता शिवसेनेला नाकच राहिलेलं नाही, अशीही कडवी टीका राणे यांनी केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विस्तारसभेसाठी कोल्हापुरात आलेले राणे म्हणाले की, ‘द्या आणि घ्या’ (गिव्ह अँड टेक) या मुद्द्यावर आपण भाजपशी जोडले गेलो आहोत. भाजपनं देण्यासाठी काही कालवाधी घेतला असावा असं म्हणत त्यांनी भाजपसंबंधीचा प्रश्न टाळला. काँग्रेस सोडल्यावरही राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांच्यावर टीका करणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘गिव्ह अँड टेक’मध्ये मिळालेल्या गाजराची पुंगी वाजण्यास सुरुवात झालेली दिसते. राणे जे शिवसेनेला सांगतायत, ते त्यांनाही तंतोतंत लागू होतंय. पण, मूळ तिथूनच आलेले असल्यानं ते त्यांच्या लक्षात येत नसावं. मुलाच्या आमदारकीच्या रूपाने एक पाय काँग्रेसच्या हद्दीत ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, ती त्यांची त्यांनीच ओढवून घेतली आहे.

.............................................................................................................................................

नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक? - संपादन : राम जगताप

पाने - ११६, मूल्य – १२५ रुपये.

ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/323

.............................................................................................................................................

४. पंतप्रधानांविषयी अपशब्द वापरणाऱ्या नेत्याला काँग्रेसनं तडकाफडकी निलंबित केलं. पण पंतप्रधान जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळी ते भारताच्या सुनेला ‘बार गर्ल’ म्हणायचे, ते योग्य होते का, असा सवाल पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी विचारला आहे.

काहीतरीच काय हार्दिकभाऊ, सगळा पक्ष खाली करायचा विचार आहे का? यांच्यासारखीच भाषाशैली वापरून इतरांना देशाच्या थोरवीचे, संस्कृतीचे दाखले देणारे पूर्णवेळ, अर्धवेळ, पगारी आणि बिनपगारी प्रचारक देशाबाहेर पाठवायचं ठरलं, तर दोनपाच कोटी लोकांचा भार हलका होईल भारतभूवरचा आणि उरलेल्या लोकांचं आयुष्य त्यातल्या त्यात सुसंस्कृतपणे व्यतीत होईल.

​​​​​​​.............................................................................................................................................

५. अयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद वाद न्यायप्रविष्ट असताना भाजप खासदार तपन भौमिक यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. हिंदू जागे झाले असून न्यायालयाचा निर्णय हा हिंदूंच्या बाजूनं असेल आणि नसल्यास तो हिंदूंच्या बाजूनंच लागेल याची पुरेशी काळजी घेतली जाईल, असं विधान त्यांनी केलं आहे. मध्य प्रदेश पर्यटन विकास मंडळाचे अध्यक्ष असलेले भौमिक म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभेत आमचे लोक आहेत, ते नवा कायदा आणतील आणि अयोध्येत राम मंदिरच बांधले जाईल. या प्रयत्नात यश मिळालं नाही तरी कोट्यवधी हिंदू एकत्र येतील आणि मंदिर बांधतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

यात नवल काही नाही. निकाल जवळ येऊ लागला आहे आणि गुजरातेत मतदान जवळ येऊ लागलं आहे, तशी ही पक्षाची आणि परिवाराची भूमिका मांडली जाऊ लागली आहे. बाकी ते बोलतायत, त्यात काही चूक नाही. हे मंदिर बांधल्यानंतर भौमिक आणि अन्य वानरसेना कायमची शांत बसण्याची गॅरंटी देत असेल, तर देशातले लोक वर्गणी काढून मंदिर बांधून देतील, यात शंका नाही.

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......