‘नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक?’ची दुसरी सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
टीम अक्षरनामा
  • ‘नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक?’चे मुखपृष्ठ
  • Fri , 08 December 2017
  • ग्रंथनामा Granthnama अभय टिळक Abhay Tilak नोटबंदी Demonetization राम जगताप Ram Jagtap नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक Notabandi - Arthkranti ki Aarthik ghodchuk?

गेल्या वर्षभरात नोटबंदीचा ‘अक्षरनामा’ने सातत्याने पाठपुरावा केला. त्यातील निवडक लेखांचे ‘नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक?’ या नावाने फेब्रुवारी २०१७ मध्ये पुस्तकही प्रकाशित केले. ८ नोव्हेंबर रोजी ‘अक्षरनामा’ने ‘वर्षपूर्ती की वर्षश्राद्ध?’ या नावाने विशेषांक प्रकाशित केला. त्यातील सहा लेखांचा समावेश या सुधारित आवृत्तीमध्ये केला आहे. त्याशिवाय आणखी एक लेखही घेतलेला आहे. शिवार वाचकांच्या सोयीसाठी संपूर्ण पुस्तकाची पुनर्रचना केली आहे. या आवृत्तीच्या निमित्ताने...

.............................................................................................................................................

८ नोव्हेंबर २०१६च्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्रीपासून चलनातून ५०० व १,००० रुपयांच्या नोटा बाद केल्या. आणि तेव्हापासूनच कामधाम, झोप, जेवण-खाण सोडून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, लघुउद्योजक, नोकरदार वर्ग यांना पुढचे तीनेक महिने बँका आणि एटीएमच्या रांगांमध्ये तिष्ठत उभं राहावं लागलं. त्यात काहींना आपला जीवही गमवावा लागला. मात्र त्याच वेळी ‘मोदी यांच्या कारकिर्दीतला एक ऐतिहासिक निर्णय’ म्हणून या घटनेवर अर्थतज्ज्ञांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत आणि पत्रकारांपासून शेतीतज्ज्ञांपर्यंत अनेकांनी विविध अंगांनी चर्चा केली.

सप्टेंबर २०१७ भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपल्या वार्षिक अहवालात नोटबंदीमुळे जवळपास ९० टक्के जुन्या नोटा परत आल्या असल्याचं नमूद केलं आणि परत नोटबंदीच्या फोलपणाची चर्चा सुरू झाली. भाजप सरकारनं तेव्हा नोटबंदीच्या निमित्तानं केलेले दावे आणि भाजपसमर्थक सध्या करत असलेले दावे, हे पाहून प्रसिद्ध उर्दू कवी राहत इंदौरी यांच्या एका कवितेची आठवण होते. तिची पहिली ओळ अशी आहे - ‘झुठोंने झुठोंसे कहा, की सच बोलो!’

नोटबंदी जाहीर केल्यानंतर पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली आणि सरकारमधील इतर मंत्री, खासदार यांनी केलेले दावे आणि नोटबंदीचे समर्थक अर्थतज्ज्ञ यांनी वर्तवलेली भाकितं कोणती होती, या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, लघुउद्योजक, नोकरदार वर्ग यांच्यावर नेमका काय परिणाम झाला, याचा ‘अक्षरनामा’नं सातत्यानं पाठपुरावा करून त्यावर वेगवेगळ्या लेखकांचे लेख छापले. त्यातील निवडक लेखांचं ‘नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक?’ या नावानं फेब्रुवारी महिन्यात पुस्तकही प्रकाशित केलं.

कालच्या ८ नोव्हेंबरला नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाले. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी भारतीय चलनातून ५०० व १००० रुपयांच्या चलनी नोटा रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला, तेव्हा ते देशाला सांगत होते की, फक्त ५० दिवस कळ काढा, पुढे सगळे सुरळीत होईल. पण ५० चे १००, १०० चे २०० आणि २०० चे ३६५ दिवस झाले, तरी नोटबंदीचे फायदे काही दिसायला तयार नाहीत. मात्र, मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१७ हा नोटबंदीचा पहिला वाढदिवस ‘अँटी ब्लॅक मनी डे’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन करून नोटबंदीचे समर्थनच केले.

नोटबंदीने भारतीय अर्थव्यवस्था, उद्योग यांना फटका बसलाच, पण सर्वांत मोठी किंमत मोजावी लागली ती रिझर्व बँकेला. तिची विश्वासार्हता पूर्णपणे धोक्यात आली. केंद्र सरकारने आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी रिझर्व बँकेची विश्वासार्हता पणाला लावली.

कुठलेच सरकार आपल्या चुका सहजासहजी कबूल करत नसते. मोदी सरकारने नोटबंदीबाबत तेच केले. पण गेल्या वर्षभरात या निर्णयाची चिकित्सा तज्ज्ञांनी आपापल्या परीने केली. ‘अक्षरनामा’ने या विषयाचा सुरुवातीपासूनच पाठपुरावा केला. त्यातील निवडक लेखांचे फेब्रुवारी २०१७ मध्ये पुस्तकही प्रकाशित केले. बरोबर ७ नोव्हेंबर २०१७ रोजी या पहिल्या आवृत्तीची शेवटची प्रत विकली गेली. ८ नोव्हेंबर रोजी ‘अक्षरनामा’ने ‘वर्षपूर्ती की वर्षश्राद्ध?’ या नावाने विशेषांक प्रकाशित केला. त्यातील सहा लेखांचा समावेश या सुधारित आवृत्तीमध्ये केला आहे. त्याशिवाय आणखी एक लेखही घेतलेला आहे. शिवाय वाचकांच्या सोयीसाठी संपूर्ण पुस्तकाची पुनर्रचना केली आहे. त्यामुळे नोटबंदीच्या सर्व बाजू सहजपणे समजावून घ्यायला मदत होईल.

या नव्या आवृत्तीचेही वाचक स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.

.............................................................................................................................................

अनुक्रम

वृतान्त-निरीक्षणे

कालच्या ‘सर्जिकल स्टाईक’नंतर झोप लागली का? । माधव लहाने

खूप लोक ‘नोटा’कुटीला आले! । राम जगताप

मला असे प्रश्न पडले म्हणजे माझं देशावर प्रेम नाही का? । अमिता दरेकर

चिखलठाण्याची रोकडरहित अर्थव्यवस्था । पी. साईनाथ (अनु. अजित वायकर)

नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थकारण ठप्प, तरी रहा गप्प! । आनंद शितोळे

शेतकऱ्याने जगावं की, मरावं? की आहे तसंच खितपत पडावं? । प्रवीण तोरडमल

नोटबंदीचे भूत । पार्थ एम. एन. (अनु. प्रज्वला तट्टे) 

संसदेत नोटकोंडी आणि सामान्यांचा ‘मनी’कल्लोळ । कलिम अजीम 

कॅशलेस समाज

कॅशलेस होण्यामुळे करचोरी बंद होत नाही । रवीश कुमार (अनु. टीम अक्षरनामा)

भारत करा ‘कॅशलेस’! । महेश सरलष्कर

काळा पैसा, अर्थहीन क्रांती आणि कॅशलेस सोसायटी । आनंद शितोळे

निश्चलनीकरणाचा निर्णय तुघलकी ठरू नये इतकंच! । डॉ. मंदार काळे आणि अ‍ॅड. राज कुलकर्णी

विश्लेषण

पैशांसाठी आम्हां फिरविशी दाही दिशा... । प्रकाश बुरटे

मोदींचा देशांतर्गत ‘सर्जिकल स्ट्राईक’, ८२ ठार! । कॉ. भीमराव बनसोड

पैसा कुठे आणि कसा छापला जातो? । प्रकाश बुरटे

भाष्य

नोटबंदीची महाशोकांतिका । डॉ. मनमोहन सिंग (अनु. अजित वायकर)

मोदी सरकारचा फसलेला साहसवाद । अभय टिळक

मोदींची अर्धीमुर्धी साफसफाई । महेश सरलष्कर

डोंगर पोखरून उंदीर काढणार? । विनोद शिरसाठ

माणसे काय, नोटांच्या रांगेतही मरतात! । राम जगताप

वर्षपूर्ती की वर्षश्राद्ध?

नोटबंदीचा फसलेला ‘महायज्ञ’! । महेश सरलष्कर

नोटबंदी : एका वर्षानंतर । माधव दातार

निश्चलनीकरणाच्या यशापयशाचा लेखाजोखा । विश्वजित कदम

दुर्बल अर्थव्यवस्थेवरील अनावश्यक ‘सर्जिकल स्ट्राईक’! । टी. के. जयरामन आणि भानू प्रकाश (अनु. प्रज्वला तट्टे)   

सुनील आणि अनिल । लोकेश शेवडे

‘राष्ट्रवादाचे प्रयोग’ व्हाया नोटबंदी । महेश सरलष्कर

.............................................................................................................................................

नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक? - संपादन : राम जगताप

पाने - ११६, मूल्य – १२५ रुपये.

ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/323

.............................................................................................................................................

‘नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक?’विषयी दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये वैभव वझे यांनी लिहिलेले परीक्षण वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा - कॅशलेशचे गांभीर्य - वैभव वझे, २१ मे २०१७

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......