मुलांचा भावनांक वाढवता येतो!
पडघम - बालदिन विशेष
डॉ. संयोगिता नाडकर्णी
  • या लेखातील सर्व छायाचित्रं प्रातिनिधिक आहेत
  • Mon , 14 November 2016
  • भावनांक बुद्ध्यांक मुलं पालकत्व IQ EQ Parenting Intelligence Quotient Emotional Quotient

माणूस जसा सामाजिक प्राणी आहे, तसाच तो भावनात्मक प्राणीदेखील आहे. Emotion हा शब्द E-motion म्हणून बघितला जाऊ शकतो. भावनांमध्ये नैसर्गिकरीत्याच एक शक्ती दडलेली असते. हीच शक्ती माणसाला कृती करण्यास भाग पाडते. माणसाला जसा तर्कसंगत, वस्तुनिष्ठ विचार करता येतो, तितकंच भावनेच्या आहारीही जाता येतं. खरं तर मनुष्य आयुष्यातील पुष्कळ गोष्टी भावनेमुळेच करतो असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. मैत्रीपासून प्रेमापर्यंत आणि मुलांच्या संगोपनापासून वृद्ध आई-वडलांच्या देखभालीपर्यंत माणसातील भावनाच त्याला मार्गदर्शन करत असतात. या अर्थातच चांगल्या भावना आहेत. पण वाईट भावनादेखील माणसाला तितक्याच किंवा जास्त प्रवृत्त करतात. गुन्हे, भ्रष्टाचार किंवा अपरांधामध्ये भावनाच दडलेल्या असतात. असं भावनांचं आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतकं असूनदेखील भावनांचा फारसा शास्त्रशुद्धरीत्या अभ्यास केला गेलेला नाही.

- पाच वर्षांचा अर्णव दुसऱ्या मुलांना सारखा मारत असतो. त्याच्या मनासारखं झालं नाही तर तो ओरडत सुटतो. शाळेत तो आता ‘मारकुटा’ म्हणून ओळखला जातो.

- सात वर्षांची काव्या आईला सारखी चिकटून असते. सारखं तिच्याबरोबरच राहावं असं तिला वाटतं. बाथरूम, किचन, घराबाहेर आई कुठेही गेली की, ती पाठोपाठ जाते. तिला शाळेत जाणं नकोसं वाटतं.

- १२ वर्षांचा आदित्य आजकाल चिडका झाला आहे. लहानसहान गोष्टींवरून तो उखडतो. आई-बाबांशी त्याचे सतत किरकोळ वाद सुरू असतात.

- १४ वर्षांची रेखा आजकाल खूपच डायटिंग करते. तिने तिचा आहार खूपच कमी केला आहे. तिला कुणा नटीसारखं दिसायचं आहे. पण ती रडकी, चिडचिडीसुद्धा झाली आहे.

या मुलांच्या समस्या वेगवेगळ्या असल्या किंवा त्यामागची कारणंदेखील भिन्न असली तरी त्यात एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे या सगळ्या समस्या त्यांच्या भावनिक विश्वातून निर्माण झालेल्या आहेत.

मुले आणि भावना?!

अनेकांना मुलांना (विशेषत: लहान मुलांना) भावना असतात हे माहीत नसतं. त्यामुळे अनेक पालक अशा समस्येकडे केवळ एक वर्तनसमस्या म्हणून बघतात. पण फक्त वर्तनावर लक्ष दिल्यास त्याचं मूळ कारण अज्ञातच राहतं. त्यामुळे जरी वर्तन सुधारलं तरी ती भावना दुसऱ्या रूपात प्रकट होते. खरं तर भावनेच्या पाठीदेखील अजून एक गोष्ट असते. ती म्हणजे विचार.

विचार – भावना – वर्तन ही एक लिंक आहे. अगदी लहानपणी विचार विकसित झालेले नसतात. त्यामुळे मुलं फक्त भावना दाखवतात. तिच्यामुळे वर्तन होतं. जसं, भावना - वर्तन

मुलांच्या भावनांचं काय स्वरूप असतं? मुलांच्या भावना खूप प्रकारच्या असतात. आनंद, उत्साह, भीती, दु:ख, कारुण्य अशा भावना मुलांना लहान वयापासून अवगत असतात. पुढे याच भावना विकसित होऊन त्यांच्या विविध छटा दिसू लागतात. मग त्या प्रौढांसारख्या होऊ लागतात. पण मुलांच्या भावनांचा फार कमी विचार केला गेला आहे. मुलांची वाढ व विकास हा शारीरिक, बौद्धिक व कृतिकौशल्यांच्या पातळीवर पाहिला गेला आहे. त्यामुळे मूल कधी चालतं, बोलतं, किती आकडे मोजतं, कुठले रंग ओळखतं, नावं कशी सांगतं, गोष्टी कशा ओळखतं, यालाच पालक सारखं मोजत-मापत असतात. हे चूक नाही, पण सर्वस्वी याच गोष्टींच्या आधारे विकास मापल्यास मुलाची खरी प्रगती ओळखता येत नाही. वर दिलेल्या विकासांबरोबरच भावनिक व सामाजिक कौशल्यांचादेखील विकास होत असतो.

भावनिक विकास

भावनिक विकास मुलाच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहे. तसंच तो मुलाच्या स्व-प्रतिमेशी घनिष्ठरीत्या निगडित आहे. आताच्या काळात नुसतीच कौशल्यं, बुद्धी किंवा कसबं वापरून व्यवहार\व्यवसाय करता येत नाही. हे जवळजवळ सर्वच पालकांना माहीत असतं.

डॅनियल गोलमन या शास्त्रज्ञाने emotional quotient (भावनांक) अर्थात EQची संकल्पना मांडली. १९९६मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात ही संकल्पना उलगडून सांगितली आहे. IQ (बुद्ध्यांक) ची संकल्पना माणसाच्या बौद्धिक क्षमतेवर आधारित आहे. माणसाची बौद्धिक क्षमता चांगली असल्यास त्याला आपोआपच यश मिळतं, असं समजलं जाई. परंतु कोलमनने म्हटलं आहे – “पूर्वी तुमची कार्यकौशल्यं यशासाठी पुरेशी होती, पण आज तुमची भावनिक व सामाजिक कौशल्यं दाखवण्याची गरज आहे.”

भावनिक बुद्धिमत्ता

भावनिक बुद्धिमत्तेत खालील गोष्टी येतात

१. स्वत:च्या भावनांचं भान

२. भावनांचं स्व-नियोजन म्हणजे स्वत:च्या हानिकारक भावनांना प्रतिबंध घालण्याची क्षमता.

३. संघर्ष नियोजन. परस्परात होणाऱ्या संघर्षाचं परीक्षण व त्यात सुधारणा.

४. दुसऱ्यांवर प्रभाव. दुसऱ्यात सुधारणा करता येणं आणि त्यांना आपलं म्हणणं पटवून देता येणं.

५. टीमवर्क आणि सहकार्य. एकमेकांना सहकार्य करता येणं आणि गटपद्धतीनं काम करता येणं.

आजकाल खूप मुलांमध्ये प्रकर्षाने वरील गोष्टींचा अभाव दिसतो. भावना हा मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहे. त्यामुळे त्या नियोजित केल्या नाहीत वा त्यांचं नियोजन झालं नाही तर व्यक्तिमत्त्व व्यवस्थित घडत नाही, तसंच मुलांची स्व-प्रतिमा कमी होऊ शकते. याचा परिणाम त्यांच्या अध्ययनक्षमता, वर्तन आणि कामगिरीवर होतो.

भावनांक (EQ) वाढवता येतो का?

सुदैवाने EQ हा IQ प्रमाणे स्थिर नसतो. पालक मुलांचा EQ वाढवू शकतात. तो वाढवण्यासाठी खालील गोष्टी करता येतात –

१. मुलाच्या दृष्टिकोनाचा विचार व त्याचं संवेदनक्षम निरीक्षण : बहुतेक पालक मुलाच्या वागण्याला महत्त्व देतात. ‘तू असं वाग’, ‘असं करू नको’, ‘अमके चूक’, ‘तमके बरोबर’ असं सांगत मुलाला समाजाच्या दृष्टीने उचित घडवायचा प्रयत्न असतो. हे पूर्णपणे चूक नाही. पण हे करताना मुलाच्या भावना सारख्या दूर सारल्या जात नाहीत ना हे बघणं गरजेचं असतं. तसं झाल्यास मुलामध्ये अढी बसू शकेल. तसंच वरवर काही करण्याची किंवा दाखवण्याची सवय होते. फक्त वर्तन उचित म्हणजे व्यक्तिमत्त्व उचित असं नाही. त्यासाठी आतून भाव निर्माण व्हावा लागतो. त्यामुळे मुलाला ‘काय वाटत आहे?’, ‘राग आलाय का?’, ‘निराश वाटतंय का?’ असे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. त्यातून त्यांना स्वत:च्या भावनाही हळूहळू ओळखता येतात.

२. भावनांना वाट देणं : मुलांना भावना सारख्या दाबून ठेवायला शिकवू नका. त्याचा वर्तनावर परिणाम होतो. भावना योग्य रीतीनं दाखवण्यासाठी मुलांना प्रोत्साहून द्या. त्यासाठी त्यांच्या भावनांचा स्वीकारण होणं गरजेचं आहे. ती भावना चुकीची असली तरी. उदा. धाकट्या भावाला खेळणं आणल्यास मोठ्या मुलाला राग आला असेल तर तो चुकीचा आहे असं म्हणण्याऐवजी त्याचा स्वीकार करा. ‘तुला असं वाटणं चूक नाही, पण एखादी गोष्ट हवी असल्यास तुला फक्त राग येऊन चालणार नाही,’ असं सांगा. त्यामुळे त्याला फक्त भावना आणि त्यामुळे होणारं वर्तन यापलीकडे विचार करता येईल. तसंच राग येणं चूक नसलं तरी तो आवरता न येणं हे चूक आहे हेही स्पष्ट करा.

३. उपाय-योजना : आपण एखादी समस्या किंवा परिस्थिती बदलण्यासाठी काय काय करू शकतो ते मुलाला विचारा. त्यामुळे थोडं जाणीवपूर्वक त्याला भावनेच्या कबजातून दूर नेता येतं.

वरील गोष्टी भावना अनावर झाल्यानंतर करणं निष्फळ आहे. त्यासाठी रोजच छोटे-छोटे प्रयत्न करावे लागतील. बहुतेक पालक वेळ वाचवण्यासाठी मुलाला तिथल्या तिथं उपाय सांगून किंवा शिक्षा करून मोकळे  होतात. पण रोज थोडीशी संवादात्मक गुंतवणूक केल्यास मुलात खूप फरक होईल.  त्यामुळे पुष्कळ वर्तनसमस्या टळतील.

खूप पालक व मुलांमध्ये संवादच होत नाही. ही फार दुर्भाग्याची गोष्ट आहे. टीव्ही, आयपॅड, मोबाईल फोन यातून मुलं संवाद शिकत नाहीत. त्यांना संवादाचं कसबच उमगत नाही. ती पुढे नाती कशी जोडणार? माणूस नात्यांतून घडतो व सक्षम होतो. नात्यांअभावी माणूस यंत्रवत व पोकळ होतो आणि दबलेल्या भावनांना चुकीच्या मार्गानं वाट देतो. उदा. आक्रस्ताळेपणा, बंडखोर वृत्ती, राग, नैराश्य, वैफल्य. ही घसरती वाट आहे. त्यामार्गानं जायचं नसेल तर भावनिक क्षमता मुलांत बाणणं निकडीचं आहे.

 

लेखिका मानसोपचारतज्ज्ञ आहेत.

sanyogitanadkarni@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......