अजूनकाही
सध्या उत्तर कोरियाचा कोरियाचा हुकूमशहा किम जोंगच्या आचरटपणामुळे संपूर्ण जग भीतीच्या खाईत लोटलं गेलं आहे. पण त्याची पर्वा न करता किम जोंगनं आपला संहारक जैविक शस्त्रं विकसित करण्याचा कार्यक्रम चालूच ठेवला आहे. ही संहारक शस्त्रं तयार करण्याचा कार्यक्रम उत्तर कोरियानं १९६०च्या दशकातच सुरू केला असल्याची माहिती समोर आली आहे. कोरियाच्या युद्धानंतर १९५० ते १९५३ या दरम्यान हजारो लोकांचा मृत्यू कॉलरा, टायफाइड, टायफस आणि देवी या आजारांनी झाला होता. याला कारणीभूत होती अमेरिकेची जैविक शस्त्रं. तशीच जैविक शस्त्रं तयार करण्याचं काम सध्या किम जोंग करत आहे. त्यातून प्लेग, अँथ्रेक्स, देवी आणि टायफससारख्या आजारांचा फैलाव होऊन अनेक निरपराधी माणसं मृत्यूमुखी पडू शकतात. उत्तर कोरियात दोन जैविक शस्त्रं तयार करण्याचे कारखाने आणिअनेक संशोधन केंद्र चालू असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणेनं प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे जगभरचे तज्ज्ञ सध्या चिंतेत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे किम जोंग इतके नसले तरी वेडाचार करण्याच्या बाबतीत त्याच्याशी बरोबरी करायचा प्रयत्न करत आहेत. किम जोंगला ते धमक्या देत आहेत. पण त्याचा काहीही परिणाम किम जोंगवर न होता, तो आपला कार्यक्रम पुढे रेटत आहे.
या पार्श्वभूमीवर १७ सप्टेंबर २०१७ रोजी निधन झालेल्या स्तानिस्लाव पेत्रोव्हविषयी जाणून घ्यायला हवं. या पेत्रोव्ह यांनी १९८३ साली जगाला अणुयुद्धापासून वाचवलं होतं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पेत्रोव्ह हे तत्कालिन सोव्हिएत रशियाच्या लष्करामध्ये अधिकारी होते. सप्टेंबर १९८३मध्ये एके दिवशी मॉस्कोतील ‘सिक्रेट कमांड सेंटर’मध्ये अमेरिकेनं आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचा अलार्म वाजला. मात्र त्याची खात्री होत नव्हती. सोव्हिएत रशियाचं ‘सिक्रेट कमांड सेंटर’ अमेरिकेच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी उभारण्यात आलं होतं. त्याचे स्टेशन इन्चार्ज पेत्रोव्ह होते. २६ सप्टेंबर १९८३ रोजी पेत्रोव्ह आपली शिफ्ट संपत आली होती. तेवढ्यात सेंटरमधील अलार्म वाजू लागला. अमेरिका पुढील काही मिनिटांमध्ये पाच बॅलेस्टिक क्षेपणास्त्र रशियावर डागणार असल्याचा तो अलार्म होता. पेत्रोव्ह पंधरा सेकंद आश्चर्यचकित झाले, पण त्यांना पुढच्या क्षणी निर्णय घ्यायचा होता. त्यांनी स्वत:ला सावरत हा अलार्म चुकून वाजला असल्याचं स्पष्टीकरण दिलं. त्यामुळे सोव्हिएत रशियानं अमेरिकेच्या या कथित क्षेपणास्त्राला अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्रानं प्रत्युत्तर द्यायचं टाळलं. परिणामी जग दुसऱ्या अणुयुद्धाच्या खाईत जाण्यापासून वाचलं. या घटनेची माहिती पेत्रोव्ह यांनी आपल्या कुटुंबांसह इतर कुणालाही दिली नव्हती. १९९० साली सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यानंतर या घटनेची माहिती बाहेर आली. तेव्हा पेत्रोव्ह रशिया आणि जगभर ‘हीरो’ झाले.
इतकंच नव्हे तर त्यांच्यावर पुढे ‘The Man Who Saved the World’ हा पन्नासहून अधिक मिनिटांचा माहिती पट तयार करण्यात आला. त्यात बॉलिवुडचे प्रसिद्ध कलाकार रॉबर्ट डी निरो आणि मॅट डिमन यांनी काम केलं. या माहितीपटाचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. पेत्रोव्ह यांनी जगाला एका अणुयुद्धापासून वाचवल्यामुळे जगभर त्यांचं कौतुक करण्यात आलं.
त्यामुळे या महान लष्करी अधिकाऱ्याच्या निधनाची बातमी जगभरातील जवळपास सर्व प्रसारमाध्यमांनी दिली. ही बातमी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात त्यांच्या जगभरच्या प्रसारमाध्यमांनी पेत्रोव्ह यांच्या मुलाच्या हवाल्यानं प्रसिद्ध केली. प्रत्यक्षात पेत्रोव्ह यांचं निधन १९ मे रोजी झालं होतं. मात्र निवृत्तीनंतर ते रशियातल्या एका छोट्याशा खेडेगावात राहत होते. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी बाहेर यायला इतके दिवस लागले असं सांगितलं जातं.
किम जोंगच्या वेडाचारापासून जगाला वाचवणारा नवा पेत्रोव्ह पुढे येवो अशीच इच्छा, प्रार्थना आपल्यापैकी बहुतेक जण करतील. जगाला संकटाच्या खाईत लोटू पाहणाऱ्या किम जोंगला आवर घातला जाईलच. तोवर पेत्रोव्ह यांचा हा माहितीपट पाहायला हरकत नाही. कुणी सांगावं त्याच्यापासून प्रेरणा घेऊन नवा पेत्रोव्ह तयारही होईल.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment