अजूनकाही
१७ ऑक्टोबरपासून रविवारचा अपवाद वगळता रोज टप्प्याटप्प्यानं प्रकाशित होणारा ‘अक्षरनामा’चा दिवाळी अंक आज ‘संकीर्ण’ या विभागाबरोबर संपला.
या वर्षीच्या अंकाचा प्रमुख विषय ‘माध्यमांचं अधोविश्व | मीडिया का अंडरवर्ल्ड | Underworld of Media’ हा असला तरी त्याशिवाय या अंकात ‘ऑनलाइन\सोशल मीडिया’, ‘तळवलकर - एक मूल्यमापन’ आणि ‘संकीर्ण’ असे इतरही तीन विभाग होते. पहिल्या ‘माध्यमांचं अधोविश्व | मीडिया का अंडरवर्ल्ड | Underworld of Media’ या विभागात सर्वाधिक म्हणजे दहा लेख, दुसऱ्या विभागात तीन लेख, तिसऱ्या विभागात चार लेख आणि चौथ्या विभागात चार लेख असे एकंदर २१ लेख आणि तीन संपादकीय असा हा चोवीस लेखांचा यंदाचा दिवाळी अंक होता. पहिल्या आणि तिसऱ्या विभागांसाठी स्वतंत्र संपादकीय लेख लिहूून त्यांमागची भूमिका स्पष्ट केली आहे. दुसरा विभाग हाही पहिल्या विभागाचाच भाग होता. आणि खरं तर तिसरा विभागही. त्यामुळे या अंकातला सर्वांत शेवटचा म्हणजे ‘संकीर्ण’ हा विभाग मात्र पूर्णपणे वेगळा आणि ललित लेखनाचा होता. या विभागातल्या चारही लेखांमधील विषयवैविध्य वाचकांच्या त्यांची फक्त शीर्षकं वाचूनही लक्षात येईल. खरं तर या विभागाचं नियोजन केलं नव्हतं. तो ऐनवेळी जुळून आलेला विभाग आहे. पण दिवाळी अंकाच्या परंपरेनुसार ललित विषयांचा समावेश अंकात असायला हवा, तो या विभागाच्या निमित्तानं करता आला. आणि त्यातही चार नावीन्यपूर्ण विषय देता आले, यासाठी संबंधित लेखकांचे मनापासून आभार.
मराठीमध्ये माध्यम-चिकित्सा पुरेशा प्रमाणात केली जात नाही. ती करण्याचा प्रयत्न या अंकात केला आहे. माध्यमांचा आपल्या दैनंदिन जगण्याशी निकटचा संबंध असल्यानं आणि माध्यमांमध्ये मानवी जगण्यातल्या सर्व क्षेत्रांचा समावेश होत असल्याने बारा-पंधरा लेखांमध्ये या विषयाचे काही निवडक पैलूच उलगडले जाऊ शकतात. काही लेख ऐनवेळी हाताशी आले नसल्यानं ते या अंकात घेता आलेले नाहीत. मात्र यापुढेही ‘अक्षरनामा’ आपल्यापरीनं शक्य तेवढ्या तटस्थ, नि:पक्ष आणि तारतम्यानं माध्यम-चिकित्सा करण्याचा प्रयत्न करेल.
वाचकांनी या अंकाविषयीचा आपला अभिप्राय आम्हाला आवर्जुन कळवावा. त्यामुळे आम्ही कुठे कमी पडलो, कुठे बरं काम करू शकलो, याचा आढावा घेऊन यापुढे त्यानुसार सुधारणा करता येतील.
‘अक्षरनामा’चा गतवर्षीचा पहिला दिवाळी अंकही दिवाळी अंकांच्या रूढ परंपरेला काहीसा छेद देणारा होता. किंबहुना ऑनलाईन स्वरूपात प्रकाशित होणाऱ्या जवळपास सर्वच दिवाळी अंकांचं ते एक व्यवच्छेदक लक्षण मानता येईल.
पुढच्या आठवड्यात ‘अक्षरनामा’ला एक वर्ष पूर्ण होईल. या वर्षभराचा आढावा घेऊन नव्या वर्षाची सुरुवात अधिक कार्यक्षमतेनं, कल्पकतेनं आणि विचारीपणानं करण्याचा आमचा प्रयत्न असेलच. नवे लेखक, नवे विषय आणि प्रश्न-समस्या यांच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न अधिक कसोशीनं करण्याचा मानस आहे. ही वाटचाल आपणा वाचकांच्या भरवशावरच करता येणार आहे. त्यामुळे आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवाव्यात.
.............................................................................................................................................
अनुक्रम
१. संपादकीय - माध्यमांचं अधोविश्व | मीडिया का अंडरवर्ल्ड | Underworld of Media
२. आजच्या भारतातील प्रसारमाध्यमं : एक दृष्टिक्षेप
३. पत्रकारितेला घाला ‘ग’च्या ‘गा’मध्ये!
४. भारतीय प्रसारमाध्यमं लोकांच्या बाजूनं नाही, त्यांच्या विरोधात काम करतात!
६. विचारकलह ते व्यक्तिकेंद्री भोगवाद
७. भारतीय मीडियात दलित पत्रकार का नाहीत?
८. उथळ नक्की कोण? टीव्ही चॅनेल्स की टीव्ही पाहणारे?
९. हल्ली 'फिल्मी पत्रकारिता' पूर्णपणे धंदेवाईक झालीय
१०. माध्यम स्वातंत्र्यावरील आक्रमणाइतकाच माध्यमांचा सवंगपणा हाही गंभीर प्रश्न आहे!
११. अशा वाचकांचं आणि अशा पत्रकारांचं काय करायचं?
ऑनलाइन\सोशल मीडिया
१२. सोशल मीडियाचं घडवणारं आणि बिघडवणारं राजकारण
१३. खरी माहिती, प्रचार विरहित बातम्या आणि निःपक्ष विश्लेषण
१४. Altnews : फेक न्यूज विरोधातील पत्रकारिता
१५. संपादकीय - तळवलकर : एक मूल्यमापन
१७. ‘मटा’, ‘मौज’, ‘माणूस’ आणि तळवलकर (पूर्वार्ध)
‘मटा’, ‘मौज’, ‘माणूस’ आणि तळवलकर (उत्तरार्ध)
संकीर्ण
२०. ‘आऊटडेटेड होण्याची भावना त्रास देते’ : दीपक शिर्के
२१. चेरिंग क्रॉस रोड : लंडनच्या कला-संस्कृती विश्वाचं लखलखीत वैभव
२३. ज्वालामुखींच्या सहवासात अर्थात हवाई बेटांची सफर
२४. ‘अक्षरनामा’चा दिवाळी अंक संपला…
.............................................................................................................................................
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
sushil kekan
Fri , 10 November 2017
"अक्षरनामा" टीम चे अभिनंदन..!! दिवाळी अंकाबद्दल विशेष अभिनंदन..!!! "सोशल माध्यमाच्या युगातली साक्षरता निर्माण करण्यात आणि ती जपण्यात अक्षरनामाचं मोलाचं योगदान राहील आणि माध्यमांच्या इतिहासात अक्षरनामा वरील प्रत्येक ’हुर्फ’ ची योग्य दखल घेतली जाईल." या शुभेच्छांसह वर्धापन दिनाच्या (आगाऊ) शुभेच्छा..!!! - सुशील केकान. औरंगाबाद.