मी जे केलं ती काही बहादुरी नाही, पत्रकारिता आहे!
पडघम - माध्यमनामा
रोहिणी सिंह
  • रोहिणी सिंह यांच्या बातमीविषयीच्या व्हिडिओ स्टोरीतील एक दृश्य
  • Thu , 12 October 2017
  • पडघम माध्यमनामा रोहिणी सिंह जय शहा द वायर

मी माझं काम केलं, कुठली बहादुरी केलेली नाही. हीच पत्रकारिता आहे. सरकारच्या कामाविषयी प्रश्न उपस्थित करणं, हेच तर पत्रकारांचं काम असतं. हेच पत्रकारितेचं मूळ कर्तव्य आम्हाला शिकवलं जातं. मला वा ‘द वायर’ला किंवा कुणालाही असं वाटत नाही की, आम्ही कुठलं बहादुरीचं काम करत आहोत. आम्ही फक्त एका बातमीवर काम करत होतो, ज्याला पत्रकारिता म्हणतात!

मी या बातमीसाठी खूप मेहनत घेतली आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (आरओसी)वरून कागदपत्रं डाऊनलोड करून त्यांचा अभ्यास केला. हां, हे नाही सांगणार की बातमीचा स्रोत काय आहे आणि बातमी कुठून मिळाली. पण आरओसीच्या कागदपत्रांतून ती बाहेर काढणं, वाचणं, समजून घेणं आणि अभ्यास करणं हे सर्व मी संपादकांच्या मदतीनं पूर्ण केलं.

ही बातमी फक्त यासाठी महत्त्वाची आहे की, आम्ही एका महत्त्वाच्या व्यक्तीविषयी काम करत आहोत. आम्ही कुठला आरोप केलेला नाही. ही सारी कागदपत्रं आरओसीची आहेत. आम्ही फक्त तथ्य समोर ठेवलं आहे. ज्या काळात आम्ही जगत आहोत आणि पाहत आहोत की, पत्रकारिता कशा प्रकारे होत आहे, त्या काळासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे.

सरकारला प्रश्न विचारणं गरजेचं असतं. पण आम्हाला वाटलं नव्हतं की, इतका मोठा परिणाम होईल. आपल्याला सरकारच्या धोरणांची चिकित्सा केली पाहिजे, ती धोरणं कशी लागू केली जात आहेत हे पाहिलं पाहिजे. जे वायदे सरकारने केले आहेत, ते पूर्ण केले जात आहेत की नाहीत. या सर्वांवर नजर ठेवणं ही पत्रकारिता आहे.

मी फक्त भाजप सरकारविषयी बोलत नाही. हे मी यूपीएच्या कार्यकाळातही केलं होतं. राहता राहिली दबावाची गोष्ट, तर या प्रकारच्या बातम्या करताना नेहमीच दबाव असतो. लोक तुम्हाला फोन करूनही सांगतात की, ही बातमी करू नका.

या बातमीसाठी मला हेही सांगितलं गेली होतं की, ‘सावध रहा’. मला माहीत नाही की, ‘सावध रहा’चा त्या लोकांचा काय अर्थ होता. लोक तुम्हाला सांगतात, ही बातमी करण्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. वाईट परिणाम होऊ शकतात.

मलाही या गोष्टीची माहिती आहे. मी ट्विटर यासाठी सोडलं की, याआधीही माझ्याविरुद्ध चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं ट्विटर सोडणं हा सर्वांत चांगला निर्णय होता. कारण ज्या लोकांना सत्य माहीत नाही तेही बोलणार आणि ज्यांना ट्रोलिंग, दुष्प्रचार करायचा आहे, तो तेही करणार.

ही बातमी करण्यासाठी जेवढा दबाव होता, तेवढा कधीच पाहिला नाही. उदा. मी रॉबर्ट वड्रावर बातमी केली होती, तेव्हा या प्रकारचा दबाव नव्हता. ती बातमी मी फारच सहजपणे केली आणि केल्यानंतरही आताच्या सारख्या प्रतिक्रिया अनुभवायला मिळाल्या नाहीत.

याआधी मी आनंदीबेन पटेल यांच्या मुलीची बातमी केली होती, तेव्हाही इतका दबाव नव्हता. पण ही बातमी केल्यानंतर ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्यामुळे मी प्रोत्साहित झाले आहे.

.............................................................................................................................................

नवनवीन पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

मी शक्यतो सोशल मीडियावर काही लिहीत नाही. फेसबुक आणि ट्विटरवर माझी खाती आहेत, पण मला हे लिहावं लागलं, कारण ज्या प्रकारची चर्चा होत आहे आणि एक महिला पत्रकार म्हणून मला वाटतं महिलांना नेहमीच लक्ष्य केलं जातं.

 ‘मी फक्त माझं काम करत आहे’ असं सांगणारी एक सशक्त महिला कुणालाच आवडत नाही. ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया महिला पत्रकारांना सहन कराव्या लागतात, त्या कधीच पुरुष पत्रकारांना सहन कराव्या लागत नाहीत. त्यामुळे मला उत्तरादाखल जे बोलायचं होतं, ते मी फेसबुकवर बोलले आहे.

रॉबर्ट वड्रांची बातमी केली होती, तेव्हा सोशल मीडिया इतका सक्रिय झालेला नव्हता आणि सरकारकडूनही इतका दबाव नव्हता की, मंत्री एक बेवसाईट आणि पत्रकाराला लक्ष्य करत आहेत. मानहानीचीही कुठली केस झालेली नव्हती आणि नंतर काम करण्यातही कुठला त्रास झाला नाही. मी सहजपणे टुजी आणि कॉमनवेल्थच्या बातम्या केल्या.

त्या वेळी भाजपच्या अनेक मंत्र्यांचे फोन आले होते की, कुणी पत्रकार करत नाही, तुम्ही खूप बहादुरीचं काम केलं आहे. मला खूप धन्यवादही दिले होते. मी हे सांगत नाही की, कुणी माझं कौतुक करावं. मी फक्त माझं काम करत आहे.

मला फक्त पत्रकारितेला स्वातंत्र्य असावं असं वाटतं.

हिंदीवरून अनुवाद - टीम अक्षरनामा

.............................................................................................................................................

मूळ हिंदी लेखासाठी पहा -

http://thewirehindi.com/21168/rohini-singh-journalism-jay-amit-shah-bjp-robert-vadra-narendra-modi-congress-press-freedom/

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......