अजूनकाही
१. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) परिसरात पिस्तुल आणि काडतुसं सापडली.
हिंदी सिनेमांमध्ये खूप वेळा पाहिलेली गोष्ट आहे ही… आता जेएनयूमध्ये लवकरच रॉकेट लाँचर, मिग २१ विमानं आणि दोन-चार अण्वस्त्रधारी पाणबुड्याही सापडतील!
...
२. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय व्हावा म्हणून मुंबईत होमहवन.
ट्रम्पच्या मुलाने तिकडे आरती केली, इकडे होमहवन! लवकरच व्हाइट हाऊसमध्ये सत्यनारायणाची पूजा होण्याचा योग दिसतोय. अब की बार, ट्रम्प सरकार!
...
३. केंद्र सरकारच्या ‘अतुल्य भारत’ या प्रचारमोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर खुद्द नरेंद्र मोदी; त्यांच्या विदेशवाऱ्यांच्या ध्वनिचित्रफिती वापरणार...
नेमकी गडबड काय आहे? ही अतुल्य भारताची जाहिरात मोहीम आहे ना? मग तो सोडून पंतप्रधान वारंवार परदेशांत जातात, असं चित्रण का दाखवणार आहेत जाहिरातींमध्ये? त्यांनी देशांतर्गत पर्यटन काय कमी केलंय का?
...
४. राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षपद स्वीकारावं, काँग्रेस कार्यकारिणीची गळ
ते मागे कोण बरं म्हणतंय की, रोज रोज मरने से एक ही बार आत्महत्या अच्छी!!
...
५. एनडीटीव्हीवर एक दिवसाची नाही, कायमची बंदी हवी; झी टीव्हीवर यूपीएने बंदी घातली होती, तेव्हा कुठे होते बंदीविरोधक विचारवंत? : झीसम्राट सुभाषचंद्र
खासदारकी बोलू लागली. यूपीएच्या काळात घडलेल्या त्या प्रकरणाची पाठराखण कशी झाली असती झीचंद्रसाहेब? त्यात खुद्द आपण आणि आपले वरिष्ठ संपादक यांच्यावर उद्योगसमूहाकडून १०० कोटी रुपयांची लाच मागितल्याचे आरोप होते. तुरुंगवाऱ्याही घडल्या होत्या. तुमचाही चॅनेल टीव्हीवरच दिसतो आणि त्यांचाही टीव्हीवरच दिसतो, यापलीकडे काही साम्य आहे का तुमच्यात?
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment