अजूनकाही
‘कॅप्टन दीप’, ‘गोलंदाज’, ‘धुरंधर’, ‘शिलेदार’, ‘गरूड’, ‘शब्दवेधी’, ‘रातराणी’ ही व्यक्तिरेखांची नावं उच्चारताच मराठी वाचकांच्या एका पिढीला ज्यांची आठवण होते, ते हजाराहून अधिक रहस्यमय कादंबऱ्या लिहिणारे विक्रमवीर लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ नाईक सध्या गोव्यात विपन्नावस्थेशी आणि आजारांशी झुंज देत आहेत.
७९ वर्षांचे नाईक गेली बारा वर्षं ब्रेन स्ट्रोकच्या आजारानं ग्रस्त आहेत. आता त्यांच्या छातीत इन्फेक्शन झाल्यानं त्यांच्यावर गोव्यातील मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मूळ गोव्याचे असलेल्या नाईक यांना काही पत्रकारांच्या पुढाकारानं गोवा सरकारकडून निवासासाठी भाड्यानं फ्लॅट मिळाला आहे आणि गोवा सरकारची दरमहा तीन हजार रुपयांची पेन्शनही त्यांना मिळते. मात्र, त्यांच्या आणि पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी आणि औषधोपचारांसाठी अन्य कोणतंही उत्पन्नाचं साधन त्यांच्याकडे नाही. त्यांच्या निवडक पुस्तकांचे नव्यानं संच काढून त्यातून त्यांना काही घसघशीत आर्थिक तरतूद करून देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हा प्रकल्प वास्तवात यायला काही काळ जाईल. सध्याची निकड त्यातून भागणार नाही. त्यांचा मुलगा लातूरमध्ये एमएस्सीचं शिक्षण घेत आहे आणि तो कॉलेजखर्चही अर्धवेळ नोकरी करून भागवतो. नाईक यांना आर्थिक मदतीची गरज आहे. ती करण्याची क्षमता आणि इच्छा असलेल्यांनी कृपया पुढील बँक खात्यात रक्कम जमा करावी, ही विनंती.
स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा - पणजी
गुरुनाथ नाईक
खाते क्र. : 31180667793
आयएफएससी : SBIN0005554
.............................................................................................................................................
रहस्यकथांच्या या शहेनशहाला किंवा बादशहाला जाणून घ्या. ‘इन गोवा न्यूज’ या वृत्तवाहिनीने २२ डिसेंबर २०१२ रोजी प्रसिद्ध रहस्याकथाकार गुरुनाथ नाईक यांची मुलाखत तीन भागांत घेतली. ती पुढील लिंकवर पाहता, ऐकता येईल.
गुुरुनाथ नाईक यांची मुलाखत - भाग एक
गुुरुनाथ नाईक यांची मुलाखत - भाग दोन
गुुरुनाथ नाईक यांची मुलाखत - भाग तीन
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment