अजूनकाही
१. लढा टाकलेल्या स्त्रियांचा - अॅड. निशा शिवूरकर
मूल्य - ३०० रुपये, सवलतीत - २५५ रुपये
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4039
नवर्यानं सोडलेल्या बायकांचा प्रश्न आपल्या समाजात खूप जुना आहे. अगदी पुराणकाळापासून सीता, अहिल्या यांसारख्या परित्यक्तांची उदाहरणं आपल्या परिचयाची आहेत. आजही आपल्या समाजात परित्यक्तांसाठी ‘टाकलेली’, ‘सोडलेली’, ‘बैठीली’ असे अत्यंत अपमानकारक शब्द सहजपणे वापरले जातात. घटस्फोट न देता-घेता इच्छेविरुद्ध हाकललेली विवाहित स्त्री म्हणजे ‘परित्यक्ता’. ‘ज्याची-त्याची वैयक्तिक किंवा कौटुंबिक बाब’ असं म्हणून टाळला जाणारा हा प्रश्न वास्तविक एक गंभीर सामाजिक समस्या आहे. अलीकडील काळात हा प्रश्न ऐरणीवर आणला तो समता आंदोलनानं. या आंदोलनाच्या माध्यमातून स्त्रियांच्या समस्यांसाठी दिलेल्या लढ्यांचा विविधांगी आढावा या पुस्तकात घेतला आहे. त्याशिवाय परित्यक्तांच्या बोलक्या कहाण्या, परित्यक्ता होण्यामागची कारणं, स्त्री-पुरुष समानतेसाठी आवश्यक असे पोषक विचार आणि रचनात्मक व संघर्षात्मक कार्यामधून टिपलेल्या नोंदी या सर्वांचा लेखाजोखा या पुस्तकात वाचायला मिळेल. पुस्तकाच्या लेखिका अॅड. निशा शिवूरकर या हाडाच्या कार्यकर्त्या असून त्यांनी या प्रश्नावर गेली अनेक वर्षं अनेक स्तरांवर झपाटल्यागत काम केलं आहे. या प्रश्नाची धग जवळून पाहिल्यामुळे त्यांच्या लिखाणात व्यापक असा सहानुभाव आहे. माणूस म्हणून आपल्या जाणिवा रुंदावणारं हे पुस्तक शिवूरकरांनी ओघवत्या आणि थेट शैलीमध्ये लिहिलं आहे. सामाजिक भान देणारा एक अभ्यासपूर्ण दस्तऐवज... अर्थात लढा ‘टाकलेल्या’ स्त्रियांचा.
.............................................................................................................................................
२. डॉक्टर म्हणून जगवताना- डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर
मूल्य - १५० रुपये, सवलतीत - १३५ रुपये
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4046
‘‘निदान चुकणे हा प्रत्येक डॉक्टरच्या खोलीतील एक मोठा अदृश्य हत्ती आहे. तो हाताला तर लागतो, पण दिसत मात्र नाही. असे असूनही निर्णय तर घ्यावेच लागतात. ते लांबणीवर टाकता येत नाहीत. निदानाबाबतची अनिश्चिती फार त्रासदायक असते. कदाचित ती टाळण्यासाठीच आम्ही डॉक्टर लोक त्या अनिश्चितीच्या जागी एखादे भ्रामक का होईना, परंतु निश्चित असे निदान गृहीत धरतो. मग उपचार करताना त्यालाच चिकटून बसतो. वैद्यकीय उपचारांच्या अपयशाचा गाभा हाच असावा.'' - ही आहे एका अनुभवी बालरोगतज्ज्ञाची प्रांजळ कबुली. तीस वर्षांच्या वैद्यकीय कारकिर्दीत डॉक्टर सुलभा ब्रह्मनाळकर यांना डॉक्टरची कर्तव्ये आणि मनुष्यस्वभावीतील गुंतागुंत यांविषयी अनेक पेच पडले; पण याच व्यवसायाने त्यांची उकलसुद्धा केली. लेखिकेला पडलेले प्रश्न आणि तिने शोधलेली उत्तरे म्हणजे तिचे हे आत्मकथन – ‘डॉक्टर म्हणून जगवताना’.
.............................................................................................................................................
३. आयुर्वेद सर्वांसाठी (३ पुस्तकांचा संच) - वैद्य खडीवाले
मूल्य - ५०० रुपये, सवलतीत - ४०० रुपये
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4030
नामवंत आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले यांनी लिहिलेल्या १. घरगुती आयुर्वेदिक उपचार २. आयुर्वेदिक वनौषधी आणि ३. संपूर्ण आरोग्यवर्धिनी अशा तीन अत्यंत उपयुक्त पुस्तकांचा हा संच आहे. वैद्य खडीवाले हे गेले ५० वर्षे आयुर्वेदावर आधारित आरोग्य सेवा करत आहेत. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने त्यांची ‘राष्ट्रीय गुरू’ म्हणून निवड केली आहे.
.............................................................................................................................................
४. परमवीरगाथा - रचना बिश्त-रावत, अनुवाद भगवान दातार
मूल्य – २०० रुपये, सवलतीत - १७० रुपये
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4040
परमवीर चक्र या सर्वोच्च लष्करी सन्मानाने गौरवण्यात आलेल्या २१ शूरवीरांच्या पराक्रमाची ही आहे परमवीर-गाथा! कधी २०,००० फूट उंचीवर दुर्गम भागात लढलेलं प्रत्यक्ष युद्ध असो, तर कधी शून्यापेक्षा कमी तापमानात शत्रूच्या कारवाईला दिलेलं सडेतोड उत्तर असो, कधी कुशल डावपेच आखून प्राण पणाला लावून जिंकलेली बाजी असो... या २१ वीरांनी भारताची सुरक्षा हेच जीवनाचं ध्येय मानलं. आई-वडील, पत्नी, मुलं, भावंडं या नात्यांपेक्षाही देशनिष्ठा त्यांनी महत्त्वाची मानली. ज्या युद्धांत अथवा चकमकीत दाखवलेल्या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्रानं सन्मानित केलं गेलं त्या लढतींचं पुस्तकात केलेलं जिवंत चित्रण वाचून प्रत्यक्ष लढाईच आपल्या डोळ्यांसमोर उभी राहील. या वीरांचे सहकारी, अधिकारी, कुटुंबीय यांच्याशी थेट संवाद साधून परमवीरचक्र मानकर्यांचं नेमकं योगदान काय आहे, हे सांगणार्या या कथा लष्कराच्या कार्यपद्धतीचीसुद्धा ओळख करून देतात. कुशल लष्करी डावपेच आणि अपरिमित शौर्य यांची ही आहे... परमवीर-गाथा!
.............................................................................................................................................
५. अदृश्य माणूस - एच. जी. वेल्स, अनुवाद प्रणव सखदेव
मूल्य - १७५ रुपये, सवलतीत - १४० रुपये
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4037
ती बोलत असतानाच एक अत्यंत अद्भुत गोष्ट घडली. पलंग आणि खुर्चीवरचे कपडे आपोआप गोळा झाले आणि त्या कपड्यांचा गठ्ठा हवेतून उडत जात जिन्यावरून अचानक खाली गेला. जणू कुणीतरी कपड्यांचा ढीग हातात धरून तो खाली फेकला असावा. खुर्चीच्या पाठीला अडकवलेली पाहुण्याची हॅट पुढच्याच क्षणी हवेत गोलगोल फिरायला लागली आणि मि. हॉलच्या दिशेनं अचानक चाल करून आली... खोलीतलं फर्निचर हवेत उडत विजयी नृत्य करत असल्यासारखे आवाज काही क्षण येत राहिले. मग सगळं काही शांत झालं.
एका इंग्लिश खेडेगावातल्या पथिकाश्रमात ऐन हिवाळ्यात एक विचित्र दिसणारा अनोळखी इसम येतो. पथिकाश्रमाच्या मालकिणीला आणि गावकर्यांआना हा इसम विक्षिप्त, गूढ वाटत असतो, पण जेव्हा त्याचं खरं रूप समोर येतं, तेव्हा सगळे जण हादरून जातात. कारण तो माणूस अदृश्य असतो!
प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक एच.जी. वेल्स यांच्या प्रतिभेतून अवरतेली, पिढ्यान् पिढ्या वाचली गेलेली आणि मानवी मनातल्या दुष्ट प्रवृत्तीला अधोरेखित करणारी ही कादंबरी एकाच वेळी खिळवून ठेवते आणि अंतर्मुखही करते.
.............................................................................................................................................
६. शौर्यगाथा- मेजर जनरल शुभी सूद, अनुवाद भगवान दातार
मूल्य – २०० रुपये, सवलतीत - १७० रुपये
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4038
या कथा आहेत वीर जवानांच्या...या कथा आहेत त्यांच्या धाडसाच्या, निश्चयाच्या, जिद्दीच्या आणि वचनपूर्तीच्या! सैनिक प्राणपणानं लढत असतो, तो देशाचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी! या पुस्तकातल्या कथा ‘सैनिक’ नावाचं रसायन कोणत्या मुशीतून घडतं, याची झलक तर आपल्याला देतातच, पण त्याचबरोबर निश्चय आणि कटिबद्धता यांची प्रेरक कहाणीसुद्धा सांगतात. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सत्तेच्या बाजूनं लढलेली युद्धं असोत किंवा स्वातंत्र्योत्तर काळात पाकिस्तान-चीनबरोबर आमनेसामने लढलेली युद्धं असोत... त्याचप्रमाणे प्रचंड उंचीवर लढलेलं कारगील युद्ध असो किंवा शांतता काळातले संघर्ष असोत... प्रत्येक लढाईत, प्रत्येक प्रसंगी वीरजवान जीवावर उदार होऊन लढल्यामुळेच भारताची सुरक्षा अबाधित राहिली. या सर्व युद्धांत दाखवलेल्या असामान्य शौर्यासाठी अनेक लष्करी अधिकारी व जवानांना आजवर विविध सन्मानानं गौरवण्यात आले आहे. त्यापैकी काही वीरांच्या शौर्याची, त्यांच्या नेमक्या कर्तृत्वाची ओळख या पुस्तकात तपशीलांसह व रोचकपणे करून दिली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर, या आहेत असीम धैर्य आणि पराकोटीचं शौर्य दाखवणार्या वीरांच्या शौर्यगाथा!
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment