अजूनकाही
या पुस्तकात देहदान, नेत्रदान, अवयवदान, त्वचादान, मृत्यूपत्र, वैद्यकीय इच्छापत्र, वैद्यकीय विमा या विषयांवरील पत्रके, लेख, माहिती, फोन नंबर, आवेदनपत्रे यांविषयीची माहिती दिली आहे. ही सर्व माहिती संपादकांनी वेगवेगळ्या मराठी वर्तमानपत्रांमधून संकलित केली आहे.
‘दान’ या संकल्पनेचे भारतीय संस्कृतीत बरेच माहात्म्य सांगितले गेले आहे. मात्र देहदानाविषयी अजूनही तितकीशी जागृती सुशिक्षित समाजातही झालेली नाही. किंबहुना त्याविषयी अनेकांना फारशी माहितीही नसते. बहुतेकांनी ती जाणून घेतलेली नसते. काहींना देहदान करायचे असते, पण त्याविषयीची माहिती त्यांना नसते. आणि ती कुणाकडे मिळेल, याचीही अनेकदा त्यांना गंधवार्ता नसते.
अशा देहदानशुरांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकेल.
नेत्रदान, रक्तदान, या संकल्पना आता तितक्या नावीन्यपूर्ण राहिलेल्या नाहीत, पण देहदान, अवयवदान, त्वचादान या संकल्पना मात्र अजून फारशा रुळलेल्या नाहीत. त्याविषयीची माहिती या पुस्तकातून मिळते.
उदा. अवयवदान वा त्वचादान कसे करावे, त्यासाठीच्या अर्जांचे नमुने, संबंधित ठिकाणांचे पत्ते अशी माहिती दिली आहे. स्टेट बँकेतील निवृत्त अधिकारी असलेल्या जोशींनी ही उपयुक्त पुस्तिका संकलित केली आहे.
गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. विशेष म्हणजे या पुस्तकाच्या विक्रीतून जमा झालेले पैसे ‘देहदान मंडळ, पुणे’ वा नेत्रदान\त्वचादान\अवयवदान यांचा प्रसार करणाऱ्या संस्थेस दिले जाणार आहेत.
तेव्हा देहदानाच्या या ‘कारवाँ’मध्ये सहभागी व्हायला हरकत नाही, नाही का?
देह दानाचे मंदिर : संकलक-संपादक-प्रकाशक - श्रीकृष्ण जोशी
पाने – १२८, मूल्य – १०० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3996
.............................................................................................................................................
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment