अजूनकाही
८ नोव्हेंबर २०१६च्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्रीपासून चलनातून ५०० व १,००० रुपयांच्या नोटा बाद केल्या. आणि तेव्हापासूनच कामधाम, झोप, जेवण-खाण सोडून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, लघुउद्योजक, नोकरदार वर्ग यांना पुढचे तीनेक महिने बँका आणि एटीएमच्या रांगांमध्ये तिष्ठत उभं राहावं लागलं. त्यात काहींना आपला जीवही गमवावा लागला. मात्र त्याच वेळी ‘मोदी यांच्या कारकिर्दीतला एक ऐतिहासिक निर्णय’ म्हणून या घटनेवर अर्थतज्ज्ञांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत आणि पत्रकारांपासून शेतीतज्ज्ञांपर्यंत अनेकांनी विविध अंगांनी चर्चा केली.
परवा भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपल्या वार्षिक अहवालात नोटबंदीमुळे जवळपास ९० टक्के जुन्या नोटा परत आल्या असल्याचं नमूद केलं आणि परत नोटबंदीच्या फोलपणाची चर्चा सुरू झाली. भाजप सरकारनं तेव्हा नोटबंदीच्या निमित्तानं केलेले दावे आणि भाजपसमर्थक सध्या करत असलेले दावे, हे पाहून प्रसिद्ध उर्दू कवी राहत इंदौरी यांच्या एका कवितेची आठवण होते. तिची पहिली ओळ अशी आहे - ‘झुठोंने झुठोंसे कहा, की सच बोलो!’
नोटबंदी जाहीर केल्यानंतर पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली आणि सरकारमधील इतर मंत्री, खासदार यांनी केलेले दावे आणि नोटबंदीचे समर्थक अर्थतज्ज्ञ यांनी वर्तवलेली भाकितं कोणती होती, या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, लघुउद्योजक, नोकरदार वर्ग यांच्यावर नेमका काय परिणाम झाला, याचा ‘अक्षरनामा’नं सातत्यानं पाठपुरावा करून त्यावर वेगवेगळ्या लेखकांचे लेख छापले. त्यातील निवडक लेखांचं ‘नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक?’ या नावानं फेब्रुवारी महिन्यात पुस्तकही प्रकाशित केलं.
या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेतील काही लेखांची ही झलक. उर्वरित लेख प्रत्यक्ष पुस्तकात वाचता येतील.
.............................................................................................................................................
प्रस्तावना – अभय टिळक
http://www.aksharnama.com/client/article_detail/798
१. ‘कालच्या ‘सर्जिकल स्टाईक’नंतर झोप लागली का?’ - माधव लहाने
http://www.aksharnama.com/client/article_detail/135
२. पैशांसाठी आम्हां फिरविशी दाहीदिशा... - प्रकाश बुरटे
http://www.aksharnama.com/client/article_detail/188
३. कॅशलेस होण्यामुळे कर चोरी बंद होत नाही - रवीश कुमार, अनुवाद - टीम अक्षरनामा
४. डोंगर पोखरून उंदीर काढणार? - विनोद शिरसाठ
http://www.aksharnama.com/client/article_detail/201
५. भारत करा ‘कॅशलेस’! – महेश सरलष्कर
http://www.aksharnama.com/client/article_detail/204
६. माणसे काय, नोटांच्या रांगेतही मरतात! – राम जगताप
http://www.aksharnama.com/client/article_detail/168
७. खूप लोक ‘नोटा’कुटीला आले! – राम जगताप
http://www.aksharnama.com/client/article_detail/148
८. मोदी सरकारचा फसलेला साहसवाद - अभय टिळक
९. मोदींची अर्धीमुर्धी साफसफाई - महेश सरलष्कर
१०. नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थकारण ठप्प, तरी रहा गप्प! - आनंद शितोळे
http://www.aksharnama.com/client/article_detail/250
११. मोदींचा देशांतर्गत ‘सर्जिकल स्ट्राईक’, ८२ ठार! - कॉ. भीमराव बनसोड
http://www.aksharnama.com/client/article_detail/260
१२. काळा पैसा, अर्थहीन क्रांती आणि कॅशलेस सोसायटी - आनंद शितोळे
http://www.aksharnama.com/client/article_detail/259
१३. नोटबंदीची महाशोकांतिका – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अनुवाद - अजित वायकर
१४. चिखलठाण्याची रोकडरहित अर्थव्यवस्था - पी. साईनाथ, अनुवाद - अजित वायकर
१५. नोटबंदी @ ५० : शेतकऱ्याने जगावं की मरावं? की आहे तसंच खितपत पडावं? - प्रवीण मनोहर तोरडमल
http://www.aksharnama.com/client/article_detail/352
१६. मला असे प्रश्न पडले म्हणजे माझं देशावर प्रेम नाही का? - अमिता दरेकर
http://www.aksharnama.com/client/article_detail/326
१७. पैसा कुठे आणि कसा छापला जातो? – प्रकाश बुरटे
http://www.aksharnama.com/client/article_detail/313
१८. निश्चलनीकरणाचा निर्णय तुघलकी ठरू नये इतकंच! - डॉ. मंदार काळे, अॅड.राज कुलकर्णी
१९. संसदेत नोटकोंडी आणि सामान्यांचा ‘मनी’कल्लोळ - कलिम अजीम
.............................................................................................................................................
नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक? - संपादन : राम जगताप
पाने - ११६, मूल्य – १२५ रुपये.
ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/323
.............................................................................................................................................
‘नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक?’विषयी दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये वैभव वझे यांनी लिहिलेले परीक्षण वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा - कॅशलेशचे गांभीर्य - वैभव वझे, २१ मे २०१७
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment