अजूनकाही
१. एनडीटीव्ही इंडियाबरोबर आणखी दोन वाहिन्यांवर एकेक दिवसाची बंदी
अहाहा, केवढा हा निष्पक्षपातीपणा! पण जो बूँद से गयी, वो हौद से नहीं आती आणि एका बंदीने दुसरी बंदी समर्थनीय ठरत नाही. दुसरी एखादी ट्रिक शोधा राव!
......................................
२. काका सुनील तटकरे यांच्यावर नाराज पुतणे संदीप तटकरे यांचा शिवसेनेत प्रवेश
हिंदी फिल्मी डायलॉगच मारायचा, तर ‘जो सगे भतीजे के नहीं हो सके वो किसी और के भतीजे के क्या होंगे?’ अहो संदीपभौ, तुमचा पत्ता चुकला काय? नाराज पुतण्या पक्ष तर वेगळाच आहे.
......................................
३. दिल्लीला प्रदूषणाचा भयंकर विळखा, शाळांना तीन दिवसांची सुटी, कारखान्यांवरही पाच दिवसांची उत्पादनबंदी
त्यापेक्षा राजधानीतल्या सर्वपक्षीय राजकारण्यांना सक्तीने आपापल्या गावी पाठवून दिलं, तर वैचारिक, भावनिक, बौद्धिक आणि ध्वनिप्रदूषणात प्रचंड घट होईल आणि प्रदूषित पर्यावरणातही दिल्लीकरांचं जगणं अधिक सुसह्य होईल, नाही का?
...................................
४. उत्तर प्रदेशाच्या मतदारांनो, सपा आणि बसपला खूप संधी दिलीत, आता भाजपला द्या. भाजपमध्ये गुंड नाहीत : अमित शाह
किमान हे भाषण करायला तरी वेगळ्या कुणाला पाठवायचं होतं राव. आता सगळे फ्यॅ करून हसत असतील पोट धरधरून वेडपटासारखे!
......................................
५. डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा एरिक याची फ्लोरिडामध्ये मंदिराला भेट, आरतीत सहभाग, भारतीयांची मतं वडलांकडे वळवण्याची धडपड
इतकी काही धडपड करायची गरज नाही एरिकभाऊ, आमच्या अनिवासी बांधवांनाही तोंडाळ, आक्रस्ताळे, द्वेष पसरवणारे नेते फार्फार आवडतात. तुम्ही फक्त रवीशला ‘रबिश’, सेक्युलरला ‘फेक्युलर’, लिबरलला ‘लिबटार्ड’, पुरोगामीला ‘फुरोगामी’, विचारवंतला ‘विचारजंत’ म्हणायला शिका. आमच्या मतांचा पाऊस पडेल तुमच्या पिताश्रींवर.
.........................
६. दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी भारत-चीन यांच्यात देवाणघेवाण करण्याचा राष्ट्रीय सल्लागार सुरक्षा बैठकीत निर्णय
पाकिस्तानबरोबर लष्करी सराव आणि भारताबरोबर नुसतेच ठराव? बहुत नाइन्साफी है...
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment