अजूनकाही
१. जोरजोरात म्हणा, भारत माता की जय.
२. मध्य-मध्ये एखाद्या लेखकाला वा बुद्धिजीवीला मारहाण करत रहा.
३. तुमच्या दृष्टीनं एखाद्या पुस्तकात वा कलाकृतीमध्ये काही राष्ट्रविरोधी असेल तर तत्काळ त्याचा विरोध करा, ते जाळून टाका किंवा त्याची मोडतोड करा.
४. कुणी म्हणत असेल देश आपल्या नागरिकांवर अन्याय करत आहे, तर त्याला ‘नक्षलवादी’ ठरवा.
५. कुणी जर कामगार किंवा शेतकऱ्यांविषयी बोलत असेल तर त्याला ‘विकासविरोधी’ ठरवा.
६. आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला की, योग्यतेचा मुद्दा काढा. दलित, अल्पसंख्याक आणि मागासलेले यांना मध्ये-मध्ये त्यांची लायकी सांगा.
७. सकाळी पार्कमध्ये जाऊन जोरजोरात हसा, योगा करा, बाबा रामदेव यांची मॅगी खा, त्यांनी सांगितल्यानुसारच श्वास घ्या आणि सोडा.
८. पाकिस्तानला पुन्हा पुन्हा शिव्या द्या.
९. क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचा झेंडा घेऊन फिरा, गालावर तिरंगा छापवून घ्या.
१०. लोकशाहीला दोष देताना म्हणा की, सारी गडबड मतांच्या राजकारणामुळे होत आहे.
११. नेहरूंना शिव्या द्या आणि म्हणा की, पटेल हा देश चांगला चालवू शकले असते.
१२. गांधींना महात्मा माना, पण गोडसेला त्यांच्यापेक्षा मोठा महात्मा माना, त्याच्या मूर्त्या लावा, त्याच्या फाशीचा दिवस ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करा.
१३. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या अधिकारावर विश्वास ठेवा, पण भक्तीचा अधिकार त्यापेक्षा जास्त मोठा माना.
१४. गायीला रस्त्यावर भटकू द्या, पॉलिथीन पिशव्या खाऊ द्या, पण गोहत्या आणि गायींचा व्यवसाय करणाऱ्यांवर पहारा ठेवा, गरजेनुसार त्यांची धुलाईही करा.
१५. महिलांचा सन्मान करा, त्यांना उत्तेजक कपडे घालू देऊ नका, त्यांना घरातच ठेवा, त्यांना पतिव्रता आणि धर्मपरायण होण्याचं शिक्षण द्या.
१६. गीता, वेद, महाभारत, रामायण वाचा अगर वाचू नका, पण रीतिरिवाज आणि परंपरांचा हवाला देताना सत्यनारायण कथा, अनेक प्रकारची व्रतं-उपवास करत, करवत रहा.
१७. देशाला एखाद्या हुकूमशहाची किंवा सैनिकी सरकारची गरज असल्याचं सांगा.
१८. वर्तमानपत्र वाचू नका, पुस्तक वाचू नका, संविधान वाचू नका, एक निनावी ट्विटर अकाउंट सुरू करा आणि जो देश व समाज बदलण्याचा विचार करत असेल, त्याला धमकवा.
१९. विचारही करा आणि वादही करा, पण जो तुमचं मानणार नाही किंवा ऐकणार नाहीत त्याचं थोबाड फोडा.
२०. फक्त देशासाठी जगा, देशाचा विचार करा आणि देशासाठी एखाद्याचा जीव घ्यायलाही तयार रहा.
(http://khabar.ndtv.com या ऑनलाइन संकेतस्थळावरील ‘बात पते की’ या ब्लॉगवर १५ फेब्रुवारी २०१५ रोजी लिहिलेल्या लेखाचा मराठी अनुवाद.)
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment