वाचन जागर महोत्सव : पुस्तकांकडून पुस्तकांकडे
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
टीम अक्षरनामा
  • वाचन जागर महोत्सव - ५ ते १५ ऑगस्ट, पुणे
  • Sun , 13 August 2017
  • ग्रंथनामा Booksnama वाचणारा लिहितो वाचन जागर महोत्सव Vachan Jagar Mahotsav वाचन-संस्कृती Reading Culture वाचक-समाज Reading Class

‘पुणे तिथे काय उणे’ असे म्हटले जाते ते सार्थ अभिमानानेच. इतर अनेक गोष्टींप्रमाणे पुणे शहर मराठी पुस्तक प्रकाशनाबाबतही आघाडीवर आहे. केवळ एवढेच नव्हे तर पुणे ही ‘मराठी प्रकाशन व्यवसायाची राजधानी’ आहे, असे सार्थ अभिमानाने म्हणता येईल. त्यामुळे पुस्तकांबाबतच्या जवळपास सर्व अभिनव कल्पनांचा उगमही पुण्यातच होतो, असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरू नये. पुण्यातील प्रकाशक, त्यांची पुस्तके, त्यांचे विषय, त्या पुस्तकांच्या जाहिराती, त्याविषयीच्या सवलत योजना, याविषयी रसिक वाचकांना नव्याने सांगण्याची गरज नाही.

अशा या पुण्यनगरीत मराठीमध्ये पहिल्यांदाच आठ प्रकाशक, पुस्तकविक्रेते आणि काही लेखक यांनी एकत्र येऊन ‘वाचन जागर महोत्सव’ ही अभिनव संकल्पना राबवण्याचे ठरवले. ५ ऑगस्टपासून पुण्यातील आठ ग्रंथदालनांमध्ये हा महोत्सव सुरू आहे. त्याला रसिक वाचकांचा उत्तम प्रतिसादही मिळतो आहे. रोज वेगवेगळ्या लेखकांशी संवाद, गप्पा यांमुळे या महोत्सवातली गंमत दिवसेंदिवस वाढते आहे. शिवाय राजहंस, मॅजेस्टिक, रोहन, मनोविकास, डायमंड, समकालीन, साधना आणि ज्योत्स्ना या आठ प्रकाशनांची विविध पुस्तके तब्बल २५ टक्के सवलतीत विकत घेता येतात. याशिवाय भाग्यवान वाचक योजना ही आकर्षक स्पर्धाही ठेवलेली आहे.

वाचक रसिकांसाठी या महोत्सवात तीन प्रमुख आकर्षणे आहेत -

हा वाचन महोत्सव पुण्यात कुठे कुठे सुरू आहे, त्याचा हा तपशील. या महोत्सवाचे उदघाटन ज्या मान्यवरांच्या हस्ते झाले, त्याची माहिती. या ठिकाणी रोज संध्याकाळी तुम्हाला नव्या लेखकाला भेटण्याची संधी मिळते आहे -

तुम्हाला अधिक याशिवाय तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, तुम्हाला हवी असलेली पुस्तके तुमच्या जवळच्या ठिकाणी उपलब्ध आहेत ना, याची खात्री करून घ्यायची असेल तर तुम्ही पुढील ठिकाणे आणि दूरध्वनी क्रमांक यांच्यावर संपर्क साधू शकता -

हा महोत्सव १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

हल्ली ‘वाचन-संस्कृती’ (Reading Culture) बरंच काही काळजीयुक्त स्वरात बोललं जातं. या वाचन-संस्कृतीचं भवितव्य समाजाच्या धारणेवर अवलंबून असतं. जो समाज आपल्या भौतिक-सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नयनासाठी ज्ञानाचा मार्ग अनुसरतो, त्या समाजातील वाचन-संस्कृतीचं भवितव्य उज्ज्वल राहतं. जो समाज भौतिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी ज्ञानाशिवायचे मार्ग अवलंबतो, त्या समाजातील वाचन-संस्कृती ही अस्तंगत होऊ लागते. आणि अशी वाचन-संस्कृती अस्तंगत होऊ घातलेला समाज ज्ञाननिर्मिती, तिचा आदर करेनासा होता. परिणामी त्याची भौतिक प्रगती होत राहते, पण तो सांस्कृतिक-बौद्धिकदृष्ट्या कुपोषित होऊ लागतो.

‘वाचन-संस्कृती’ म्हणजे काय?

‘जो समाज सांस्कृतिक सक्षमता आणि आर्थिक यशासाठी पुस्तक-वाचनाची क्षमता आणि सराव ही अनिवार्य गरज मानतो, तो ‘वाचन-संस्कृती’ असलेला समाज म्हणून ओळखला जातो,’ अशी एक व्याख्या प्रा. वेंडी ग्रिसवोल्ड यांनी केली आहे. त्या पुढे असेही म्हणतात की-‘वाचन-संस्कृती प्रस्थापित होण्यासाठी ढोबळ पण थेट सबंध असतो तो नोकरीतील प्रतिष्ठा आणि त्यासाठी आवश्यक असलेले वाचन यांचा.’

इथं हे लक्षात घ्यायला हवं की, केवळ बुद्धिजीवी वर्गाच्या नोकरीतील प्रतिष्ठा आणि त्यासाठी त्यांना करावं लागणारं वाचन, ग्रिसवोल्ड यांना अभिप्रेत नाही. एकंदर समाजातील सर्व घटकांमधील व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील नोकरीसाठी अत्यावश्यक असणारं वाचन अभिप्रेत आहे.

“सुसंस्कृत, सुशिक्षित समाजात साहित्य, संगीत, ललितकला आणि वैचारिक व वैज्ञानिक शास्त्रे याविषयी विचार करून, इतरांना विचार करायला लावणारी संस्कृती म्हणजे ‘वाचन-संस्कृती’ होय” अशीही एक व्याख्या प्राध्यापक-समीक्षक राजशेखर शिंदे करतात. ते म्हणतात की- “वाचन व्यक्तिगत पातळीवरून गटपातळीवर, गटपातळीवरून समाजपातळीवर, समाजपातळीवरून सांस्कृतिक परंपरेत सामील होत असेल तर त्याला ‘वाचन-संस्कृती’ म्हणता येईल.” संस्कृती ही समान रीतीरिवाजांच्या समूहात घडत असते. ती घडते तेव्हा मानवी समूहाचं उत्थान झालेलं असतं. वाचन-संस्कृतीमुळे समाजमनाचं उन्नयन होतं.

‘वाचन जागर महोत्सव’ हा उन्नयनाचाच एक भाग आहे.

त्यामुळे त्वरा करा, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही या महोत्सवाला हजेरी लावू शकता. तेथील कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकता. आणि तुम्हाला आवडलेली पुस्तकेही भरपूर सवलतीमध्ये विकत घेऊ शकता.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......