अजूनकाही
१.
“रतन टाटा हे इतिहासातले सगळ्यात भ्रष्ट टाटा” : सुब्रह्मण्यम स्वामी
स्वामी म्हणतायत म्हटल्यावर युनेस्को आणि नासाही दुजोरा देतीलच… स्वामींकडे येरवडा आणि ठाणे या दोन्ही ठिकाणची प्रमाणपत्रं आहेत.
२.
(वन रँक वन पेन्शनसाठी आंदोलन करणारे आणि विषप्राशन करून आत्महत्या केलेले माजी सैनिक) “रामकिशन ग्रेवाल हे तर काँग्रेसचे कार्यकर्ते होते” : जनरल व्ही. के. सिंह
...आणि एकदा काँग्रेसचे कार्यकर्ते होते म्हटल्यावर त्यांचा गोमूत्रफवारित पवित्र हिंदभूमीमध्ये राहण्याचा अधिकार असाही संपलाच होता. ते माजी सैनिक होते, याला काय किंमत? कसलं जय जवान नि कसलं काय? हो ना फुटकळ साहेब… म्हणजे इंग्रजीत ते आपलं जनरल हो!
३.
“लाइट सुरू होताच जसे मच्छर धावत येतात, तसे कॅमेरे सुरू होताच राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल धावत येतात” : हरयाणाचे मंत्री अनिल विज
चूकच आहे ते. साफ चूक. कॅमेरे ऑन झाले की आपण कोण आहोत, कुठे आहोत, काय करतो आहोत, कशासाठी आलो आहोत, इतर लोक कुठे पाहतायत, हे विसरून थबकून मंत्रमुग्ध झाल्यासारखं कॅमेऱ्याकडे पाहायचं असतं… हो की नाही हो विजकाका?
४.
“सोनिया गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाला आणखी एका वर्षाची वाढ”
अहो, वर्षावर्षाची धुगधुगी का देताय? राहुलबाबाच सक्रिय राहणार असतील आणि प्रियंकाताई सक्रिय होणार नसतील, तर तहहयात करून टाका… काँग्रेसजनांच्या नाजूक हृदयावर सतत ताण तरी किती आणत राहायचा!!
५.
“देशाची एकता सरदार पटेलांमुळेच कायम राहिली” : पंतप्रधान नरेंद्र मोदी
दत्तक पुत्र अनेक झाले, अनेक होतील; पण, दुसऱ्या पक्षाचा अख्खा नेताच दत्तक घेण्याचं हे पहिलंच उदाहरण असेल. अर्थात, त्यालाही नाईलाज आहे. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात शून्य योगदान असलेल्या संघटनेला त्या काळातले स्वत:चे नेते मिळता मिळता मारामारच असणार ना!
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment