अजूनकाही
१. पुतिन - गिरीश कुबेर
मूल्य – ३०० रुपये, सवलतीत - २४० रुपये
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3482
सोविएत संघराज्याचं विघटन झाल्यानंतर रशियात निर्माण झाली निर्नायकी. रशियाला साम्यवादाच्या जोखडापासून जास्तीत जास्त दूर नेण्याच्या नादात बोरिस येल्त्सिन यांनी अनेक प्रयोग केले. ते बहुतांशी फसले; तथापि व्लादिमिर पुतिन यांना सत्तेच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयोग मात्र अपवाद ठरला. पुतिन निघाले महाबेरकी आणि तितकेच क्रूरही. यथावकाश येल्त्सिनना बाजूला सारून पुतिननी सारी सत्तासूत्रं आपल्या हातात घेतली. विरोधकांचा काटा काढताना त्यांना कसलाही विधीनिषेध बाळगला नाही. रशियाला पुन्हा एकदा महासत्ता बनवण्याचा ध्यास घेऊन देशविदेशात त्यांनी जी पावलं उचलली, ती खूप वादग्रस्त ठरली. राष्ट्रवादाचा मुलामा दिलेली त्यांची व्यक्तिकेंद्रित हुकूमशाही प्रदीर्घ काल टिकली तरी कशी, हा भल्याभल्या राजकीय निरीक्षकांची सत्त्वपरीक्षा पाहणारा एक महत्त्वाचा प्रश्न. त्या कुटप्रश्नाची एका व्यासंगी आणि गोष्टीवेल्हाळ पत्रकारानं करून दाखवलेली ही उकल... आंतरराष्ट्रीय राजकीय इतिहासाचा वेध घेता घेता एका जगावेगळ्या व्यक्तिमत्त्वाची त्याच्या असंख्य भल्याबुऱ्या कंगोऱ्यांसह करून दिलेली ही ओळख...
या पुस्तकाचे परीक्षण वाचण्यासाठी क्लिक करा -
http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/968
.............................................................................................................................................
२. द मराठाज् (१६००-१८१८) - डॉ. स्टुअर्ट गॉर्डन, अनु. र. कृ. कुलकर्णी
मुल्य - २९५ रुपये, सवलतीत - २३६ रुपये
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/320
डॉ. स्टुअर्ट गॉर्डन यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन मधून सन १९७१मध्ये पीएच.डी. मिळवली. कैक वर्षे भारतात राहून त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला आणि त्यातूनच ‘द मराठाज्’ हा ग्रंथ निर्माण झाला आहे. स्वातंत्र्यानंतर मराठा राज्यव्यवस्थेशी निगडित कागदपत्रांचा प्रचंड साठा संशोधकांसाठी उपलब्ध झाला. सरदार घराण्यांकडील कागदपत्रेही उपलब्ध झाली. डॉ. स्टुअर्ट गॉर्डन यांनी चिकित्सक वृत्तीने या साधनांचा अभ्यास केला असून मराठेशाहीचे प्रमुख आधारस्तंभ असलेल्या विविध देशमुख घराण्यांच्या अनुषंगाने या इतिहासाची मांडणी केली आहे. मराठे मुळात कोण होते, त्यांनी प्रतिष्ठा कशी मिळवली, त्यांची निष्ठा कशी बदलत होती आणि कायदेशीर हक्कांविषयी ते किती सजग होते अशा विविध प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. हत्यारबंद टोळ्यांपासून सुसज्ज कवायती लष्करापर्यंत मराठ्यांच्या सैन्यात झालेला बदल, मराठ्यांनी विकसित केलेली महसूल व्यवस्था आणि त्यांनी नोंदलेल्या माहितीच्या भांडाराचा इंग्रजांना झालेला उपयोग अशा महत्त्वाच्या गोष्टींचीही विस्तृत चर्चा या पुस्तकात वाचायला मिळेल. मराठा कालखंडातील सामाजिक परिवर्तनाकडेही लक्ष वेधण्यात डॉ. गॉर्डन यशस्वी झाले आहेत. इतिहासाचे अभ्यासक आणि सामान्य वाचक अशा सर्वांना भावेल अशी खात्री वाटते.
या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा संपादित अंश वाचण्यासाठी क्लिक करा-
http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/945
.............................................................................................................................................
३. गांधींनंतरचा भारत : रामचंद्र गुहा, अनुवाद- शारदा साठे
मूल्य – ७०० रुपये, सवलतीत – ६३० रुपये
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3683
‘इंडिया आफ्टर गांधी’ हे रामचंद्र गुहांचं इंग्रजी पुस्तक २००७ साली प्रकाशित झालं. जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राचा इतिहास सांगणाऱ्या या पुस्तकाची नुकतीच दहावी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘गांधींनंतरचा भारत’ या नावानं प्रकाशित झाला असून त्याची दुसरी आवृत्ती सध्या बाजारात उपलब्ध आहे.
या पुस्तकाचे परीक्षण वाचण्यासाठी क्लिक करा -
http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/994
.............................................................................................................................................
४. आय अॅम अ ट्रोल - स्वाती चतुर्वेदी, मराठी अनुवाद - मुग्धा कर्णिक
मूल्य – २०० रुपये, सवलतीत - १८८ रुपये
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3506
इंटरनेट ट्रोल्स म्हणून वावरणाऱ्या या व्यक्ती नेटवरील वातावरण कलुषित करत असतात. ते वादावादी सुरू करतात, विचित्र हिंसक शेरेबाजी करून, चित्रे टाकून लोकांना भडकवतात. ऑनलाइन जगातले गुंडच ते! भारताच्या बाबतीत, असले ऑनलाइन ट्रोल्स बहुतेक वेळा उजव्या विचारसरणीचे आणि अतिराष्ट्रवादी असतात. सरकार, भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मते असलेले राष्ट्र यांना आव्हान देणाऱ्या कुणावरही ते हल्ले करतात...
या पुस्तकाची प्रस्तावना वाचण्यासाठी क्लिक करा-
http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/947
.............................................................................................................................................
५. मागोवा - नरहर कुरुंदकर
मूल्य – ३५० रुपये, सवलतीत – २६३ रुपये
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/2361
ज्यांना पुरेशा गांभीर्याने ‘विचारवंत’ हे विशेषण लावता येईल असे महाराष्ट्रातील लेखक म्हणजे नरहर कुरुंदकर. आजच्या परिस्थितीतही कुरुंदकर हे समकालीन ठरतात. कुरुंदकरांच्या महत्त्वाच्या इतिहास विषयक लेखांचे संकलन इथे संकलित केले आहे.
कुरुंदकरांच्या विचारविश्वाचा आढावा घेणारा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा –
http://www.aksharnama.com/client/article_detail/1007
.............................................................................................................................................
६. संपूर्ण पंचतंत्र - रा. चिं. ढेरे, ह. अ. भावे
मूल्य – २०० रुपये, सवलतीत – १८० रुपये
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3340
पंचतंत्र या प्राचीन भारतीय लोककथांच्या संग्रहाचे हे प्रामाणिक भाषांतर आहे. ह. अ. भावे यांनी भाषांतरित केलेल्या या पुस्तकाला थोर संशोधक रा. चिं. ढेरे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे.
.............................................................................................................................................
७. अंगारवाटा : शोध शरद जोशींचा - भानू काळे
मूल्य - ५०० रुपये, सवलतीत - ४०० रुपये
हे पुस्तक ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3480
काळे यांच्या या पुस्तकाचे महत्त्व यासाठी मोठे आहे की, त्यांनी शरद जोशी यांच्या संघर्षपूर्ण आयुष्याची वस्तुनिष्ठ मांडणी करण्याचा अतिशय संतुलित प्रयत्न केला आहे. शेतकरी संघटनेच्या बऱ्याच मोहिमांशी त्यांचा या ना त्या कारणाने अप्रत्यक्षरीत्या संबंध आला असल्याचे जोशींच्या आयुष्यातील पानापानावर चितारलेले बरेच प्रसंग वाचताना जाणवते....
या पुस्तकाचे परीक्षण वाचण्यासाठी क्लिक करा-
http://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/819
.............................................................................................................................................
८. निवडक नरहर कुरुंदकर (व्यक्तिवेध) - नरहर कुरुंदकर
मूल्य - ३००, सवलतीत - २२५ रुपये
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/2358
ज्यांना पुरेशा गांभीर्याने ‘विचारवंत’ हे विशेषण लावता येईल असे महाराष्ट्रातील लेखक म्हणजे नरहर कुरुंदकर. आजच्या परिस्थितीतही कुरुंदकर हे समकालीन ठरतात. कुरुंदकरांनी केलेल्या महत्त्वाच्या व्यक्तिपर लेखनाचे या पुस्तकात संकलन केले आहे.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment