मीराकुमार : हरणारी लढाई लढणाऱ्या न-राष्ट्रपती
पडघम - देशकारण
विश्वांभर धर्मा गायकवाड
  • मीराकुमार यांच्या विविध भावमुद्रा
  • Fri , 21 July 2017
  • पडघम देशकारण रामनाथ कोविंद Ram Nath Kovind मीरा कुमार Meira Kumar गोपाळकृष्ण गांधी Gopalkrishna Gandhi

देशाच्या १४व्या राष्ट्रपतीपदासाठी काल झालेल्या मतमोजणीत काँग्रेस पुरस्कृत १७ पक्षांच्या आघाडीच्या उमेदवार म्हणून देशाचे माजी उपपंतप्रधान, नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मजूरमंत्री, उत्तर भारतातील प्रमुख काँग्रेस दलित नेता बाबू जगजीवनराम यांच्या कन्या मीराकुमार यांचा अपेक्षेनुसारच पराभव झाला. भारतातील जातीआधारित स्तरीकृत समाजव्यवस्थेत दलित म्हणून गणल्या गेलेल्या, पण समृद्ध राजकीय वारसा असलेल्या मीराकुमार या देशाच्या कायदेमंडळात पाचव्यांदा प्रतिनिधित्व केलेल्या आणि लोकसभेच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती आहेत. शिवाय आता भारताच्या सर्वोच्च पदाची म्हणजेच राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक लढवलेल्या पहिल्या दलित महिला आहेत. केवळ राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढवली म्हणून त्या देशाला परिचित झाल्या नव्हत्या, तर देशाच्या पहिल्या महिला सभापती म्हणून पूर्वपरिचित आहेत.

त्या पेशाने वकील आहेत. तसेच त्यांनी आतापर्यंत पाच वेळेस लोकसभेत खासदार म्हणून काम केलेले आहे.

मीराकुमार यांचा जन्म बिहारमधील अराह जिल्ह्यातील चांदवा या गावी बाबू जगजीवनराम या दलित राजकीय नेत्याच्या कुटुंबात ३१ मार्च १९४५ झाला. त्यांचे प्रारंभिक शिक्षण विल्यम गर्ल्स स्कुल डेहराडून येथे झाले. पुढील माध्यमिक शिक्षण महाराणी गायत्रीदेवी गर्ल्स स्कुल, जयपूर येथे झाले. त्यांनी उच्चशिक्षण एम.एम. इंद्रप्रस्थ कॉलेज, दिल्ली आणि एलएलबी हे मरिडा हाऊस, दिल्ली येथून पूर्ण केले. मीराकुमार यांना मानद डॉक्टरेट ही पदवी बनसली विद्यापीठाने बहाल केलेली आहे. पुढे मीराकुमार यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९७३ला परराष्ट्र सेवेत अधिकारी म्हणून केली. त्यांनी स्पेन, इंग्लंड व मॉरिशस येथे भारताच्या राजदूत म्हणूनही काम केलेले आहे.

मीराकुमार यांनी आपल्याला मिळालेल्या समृद्ध राजकीय वारशाचा म्हणजेच वडिलांच्या काँग्रेसनिष्ठ सेवेचा फायदा म्हणून १९८५ला भारतीय राजकारणात प्रवेश केला. त्या वर्षी त्या उत्तर प्रदेशातील बीजनेर येथून लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आणि निवडून आल्या. पुढे अकराव्या (१९९६) व बाराव्या लोकसभा (१९९८) निवडणुकीसाठी त्या करोल बाग, दिल्ली येथून त्या लोकसभेवर निवडून गेल्या. पुढे त्यांनी चौदाव्या (२००४) व पंधराव्या (२००९) लोकसभेसाठी यासाठी आपल्या वडिलांचा पारंपरिक मतदारसंघ संसाराम बिहार येथून निवडणूक लढवली. त्यात त्या जिंकून लोकसभेवर गेल्या होत्या.

मीराकुमार यांचे वडील बाबू जगजीवनराम हे १९५२पासून ते मृत्यूपर्यंत म्हणजे १९८६पर्यंत लोकसभेवर निवडून येत होते. त्यांनी सर्वांत जास्त काळ लोकसभेवर प्रतिनिधित्व केलेले आहे. मीराकुमार या सध्या ७३ वर्षांच्या असून त्यांचे पती मंजूल कुमार हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील आहेत. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत.

मीराकुमार यांनी २००४-२००९ या काळात पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृ्त्वाखालील मंत्रिमंडळात सामाजिक न्यायमंत्री म्हणून काम केले असून, तसेच काही काळासाठी त्या जलसंधारण मंत्री म्हणूनही काम पाहत होत्या. पुढे पंधराव्या लोकसभेसाठी निवडून आल्यानंतर २००९-२०१४ या काळासाठी त्यांची लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती म्हणून निवड झाली. हा महिलांसाठी बहुमान होता. विशेष म्हणजे सध्या भाजप सरकारमध्येही लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन आहेत.

मीराकुमार या स्वभावत: मृदुभाषी, सुसंस्कृत व शांत स्वभावाच्या आहेत. त्या व त्यांचे वडील बाबू जगजीवनराम हे सुरुवातीपासूनच काँग्रेस निष्ठावंत आहेत. जनता सरकारचा अपवाद वगळता ते काँग्रेसचे निष्ठावंत राहिलेले आहेत. मीराकुमारही त्यांच्या वडिलांप्रमाणेच काँग्रेसनिष्ठ आहेत. उत्तर भारतातील दलित राजकारणात रामविलास पासवान, मायावती यांना शह देण्यासाठी काँग्रेसचा एकमेव दलित चेहरा म्हणून त्यांना मुद्दामहून मोठे केलेले आहे. कारण काँग्रेसचा इतिहास पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शह देण्यासाठी उत्तर भारतीय दलित नेता म्हणून बाबू जगजीवनराम यांना मोठे केलेले होते, हा इतिहास सर्वज्ञात आहेच.

१४व्या राष्ट्रपतीपदासाठी जेव्हा भाजपने रामनाथ कोविंद या उत्तर प्रदेशातील व बिहारच्या राज्यपाल असलेल्या संघनिष्ठ दलित नेत्याची उमेदवार म्हणून निवड जाहीर केली, तेव्हा काँग्रेस पुरस्कृत आघाडीसमोर अनेक दलित नेत्यांची नावे चर्चेला आली होती. त्यात मीराकुमार, सुशीलकुमार शिंदे, भालचंद्र मुणगेकर आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश होता. म. गांधी यांचे पणतू गोपाळकृष्ण गांधी यांचेही नाव चर्चेत होते. पण जेव्हा राष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवार दलित व्यक्तीमधूनच निवडायचा ठरला तेव्हा गोपाळकृष्ण गांधी यांचे नाव मागे पडून मीराकुमार यांच्या नावाला संमती दिली गेली.

मुळात मीराकुमार या महिला व दलित समर्थक आहेत. त्या जातीने दलित असल्या तरी त्यांनी दलितांसाठी किंवा दलितांच्या प्रश्नांसाठी फार मोठे आंदोलन कधी केलेले नाही. केवळ काँग्रेसनिष्ठ दलित महिला राजकारणी एवढीच त्यांची ओळख आहे. स्वतंत्र दलितांसाठी त्यांच्याकडून अपेक्षित काम झालेले नाही, तसेच त्या संपूर्ण भारताच्या काँग्रेसनिष्ठ दलित नेत्या म्हणूनही परिचित नाहीत. जसे मायावती, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, रामविलास पासवान इ.

एक व्यक्तिमत्त्व म्हणून त्या निश्चित चांगल्या स्वभावाच्या आहेत. पण भाजप सरकारच्या व्यूहात्मक राजकारणाच्या सापळ्यात काँग्रेस अडकली आणि त्यात मीराकुमार यांचा बळी गेला. शिवाय भाजपकडे मोठे संख्यात्मक बहुमत असल्याने मीराकुमार यांचा पराभव अटळ होता. देशाचे सर्वोच्च पद असलेले राष्ट्रपतीपद भूषवण्याची त्यांची इच्छा असेल किंवा नसेलही. आपली राष्ट्रपतीपदासाठी निवड जाहीर होईलही याचीही बहुधा त्यांनी कधी कल्पना केलेली नसेल. पण ते घडून आले. आता त्या तहहयात न-राष्ट्रपती म्हणून राहण्याचीच शक्यता आहे.

लेखक शिवाजी महाविद्यालय, उदगीर (जि. लातूर) इथं राज्यशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

vishwambar10@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......