पहिले उदाहरण : बंगळुरू येथील ३४ वर्षीय उच्चशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनिअर अतुल सुभाष याने बायकोने केलेला छळ, घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जाताना येणारा ताण, पैशाचे नुकसान, कायद्याचा जाच या कारणांमुळे आत्महत्या केली. ४० पानांची सुईसाईड नोट व मृत्यूपूर्वी दीड तासाचा व्हिडिओ यामधून अतुलने काय सोसले आहे, याची कल्पना येते. त्याची बायकोदेखील उच्चशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनिअर असून एका आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करते.
दुसरे उदाहरण : सूचना सेठ या एका आयटी कंपनीच्या सीईओने केलेला तिच्या मुलाचा निर्घृण खून असो, तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो.
रोजच्या आयुष्यात लागणारे भावना हाताळण्याचे कौशल्य न जमल्याने भारतातल्या अनेकांचे मानसिक आरोग्याचे प्रश्न वाढले आहेत. त्यांत मोबाईल, सोशल मीडिया व इंटरनेट यामुळे उतावीळ झालेला मेंदू हा या गोंधळात भर घालत आहे. इंजिनियर्स व डॉक्टर्स अशा लोकांना त्यांच्या विषयाचे ज्ञान जरी असले, तरी कठीण भावना कशा हाताळायचा, संवाद कसा साधायचा, नाती जोडून टिकवायची कशी हे फारसे कळत नाही. बदललेल्या या युगात नाती कशी टिकवायची, याचे प्रशिक्षण उपलब्ध नाही. सोशल मीडियावरून होणारे गैरसमज कसे हाताळायचे, हे आमच्यासारख्या मानसशास्त्राच्या अभ्यासकालादेखील अनेक वेळा जमत नाही. कोविडनंतर मानसिक आरोग्याच्या समस्यांची जी त्सुनामी आली आहे, त्यातून अनेकांची नाती व आयुष्ये उदध्वस्त होत आहेत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आपण जे काही काम करतो, त्याचा आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो. औद्योगिक क्रांतीनंतर स्त्री व पुरुष बरोबरीने कामाच्या ठिकाणी आले, पण कामासंबंधित जे काही नियम व कायदे होते, ते फक्त पुरुषांच्या दृष्टीने होते, स्त्रियासाठी वेगळे कायदे फार नंतर आलेत. उदा प्रसूती रजा. शिक्षण समान असले, तरी स्त्री व पुरुष यांची भावना हाताळायची पद्धत ही वेगवेगळी आहे.
बँक, शिक्षण यांसारख्या क्षेत्रांत प्राबल्य असलेल्या स्त्रिया २०००नंतर मोठ्या प्रमाणावर आयटी क्षेत्रात आल्या. आयटीची कामाची पद्धती व वातावरण हे पाश्चात्य धर्तीचे असल्याने तिथे काम करणाऱ्या भारतीयांच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनावर त्याचा दूरगामी परिणाम झाला. यासोबतच आलेल्या इंटरनेट व समाजमाध्यमांमुळे मानवी नात्यांचे आयाम बदलले आहेत. याचे परिणामस्वरूप म्हणजे स्त्री-पुरुष नात्यातील समस्या. स्त्री-पुरुष नात्यातील ममत्व जाऊन त्याची जागा आता द्वेष व हिंसेने घेतली आहे.
समुपदेशन घेण्यासाठी येणारे १०पैकी ८ पुरुष आहेत. कोणत्याही वयोगटातील महिलांचे प्रमाण नगण्य आहे. ज्या महिला/मुली येतात, त्यातील अर्ध्या सोडून जातात व अगदी मोजक्या स्वतःमध्ये योग्य बदल घडवून आणतात. हॉर्मोन्ससंबंधित समस्या, व्यसन, लठ्ठपणा याचे प्रमाण महिला वर्गात लक्षणीयरित्या वाढले आहे.
महाराष्ट्रसारख्या सुसंकृत राज्यात मुलींना शिकण्याची इच्छा नाही, असे एका अवहालातून समोर आले आहे. पुण्यासारख्या विद्येचे माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या शहरात मुलींच्या व्यसनांचे प्रमाण भीतीदायक आहे. स्त्री-पुरुष शरीरसंबंधाचे वय आता १२-१५पर्यंत खाली आले आहे. याचा परिणाम म्हणजे मुलींचा बदललेला मेंदू. लग्नाआधी, लग्नानंतर व घटस्फोटानंतरदेखील सर्व गरजा भागवायला वेगवेगळे पुरुष, असा एक पॅटर्न मुलींमध्ये बघायला मिळत आहे. कष्टाने शिक्षण पूर्ण करून, कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता नोकरी करून चांगल्या पदावर असणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
...........................................................................................................................................
ज्या पिढ्या सोशल मीडियावर मोठ्या झाल्या आहेत, त्या आधीच्या पिढ्यांसारखी प्रत्यक्ष नाती बनवण्यात आणि ती निभवण्यात असमर्थ ठरत आहेत. साधारण ३५ व त्याच्या आतील कोणत्याही क्षेत्रातले स्त्री-पुरुष बघितले की, आपल्याला कल्पना येते की, यांना मानवी नाती उमजलेलीच नाहीत. सोशल मीडियावर आपले द्विमतीय चित्र दिसते, आपल्याला वाटेल तेच विचार आपण सोशल मीडियावर टाकू शकतो, जेणेकरून आपली एक प्रतिमा जगासमोर उभी राहते, पण ही प्रतिमा म्हणजे आपण नाही. ज्या स्त्रियांना प्रत्यक्ष आयुष्यात कोणी विचारत नाही, आत्मविश्वासाची कमतरता असते, आर्थिक अडचणी, पालकांचा त्रास असतो, अशा मुली/स्त्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्यक्त होतात.
...........................................................................................................................................
दारुड्या नवरा असूनही मुलांना स्वकष्टाने मोठ्या करणाऱ्या स्त्रियांऐवजी बॉयफ्रेंडसोबत बोलताना अडथळा आला, म्हणून छतावरून लहान बाळाला रागात फेकून देणाऱ्या स्त्रिया इथपर्यंत मातृत्वाचा प्रवास आला आहे. पुरुषांच्या समस्या आता स्त्रियांमध्येदेखील प्राबल्याने आढळून लागल्या आहेत. त्यामुळे स्त्रिया ‘स्त्रीत्व’ हरवत आहेत.
स्त्रियांचे हे विचित्र टोकाचे वागणे कुठून येतेय? भावनिक व संयमी असणाऱ्या स्त्रिया भावनाहीन होऊन हिंसक का वागू लागल्या आहेत? स्वतःच्या शरीराचे किळसवाणे प्रदर्शन मांडणाऱ्या स्त्रियांची मानसिकता कशी असेल?
स्त्री व पुरुष यांच्या शारिरीक रचनेत जो फरक आहे, तो समजून घेणे गरजेचे आहे. स्त्रियांच्या हॉर्मोन्स बदलामुळे त्यांच्या स्वभावात चढउतार जास्त असून, घरात स्त्रियांना ज्या पद्धतीची शिकवण दिली जाते, त्यामुळे त्यांचे स्वमूल्य कमी असते. ‘पुरुषांना खुश ठेवायला आपला जन्म आहे’ अशी शिकवण मिळालेली स्त्री खूश कशी राहील? याच वृत्तीला खतपाणी देण्याने, आणि एक प्रकारे वर्षानुवर्षे दबलेल्या स्त्रीने एक प्रकारे पुरुष जातीवर सूड उगवायला सुरुवात केली आहे, असे म्हणता येईल.
२००७च्या आसपास फेसबुक आणि २०१०च्या आसपास इन्स्टाग्राम भारतात सुरू झाले. याचे वाढत्या वयात असणाऱ्या भारतीय मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर न पुसणारे परिणाम झाले आहेत. इंटरनेट, पॉर्न, गेमिंग व सोशल मीडिया यांमुळे या पिढीत लहान वयात शारिरीक संबंध, त्यातून घडणारे गुन्हे, गर्भपात, अशा गोष्टींचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सोशल मीडियाचे व्यसन कोकेनसारखं काम करते. त्यामुळे जे त्रास कोकेन वापरानंतर होतात, ते सोशल मीडियाच्या आगारी गेलेल्यांमध्येही दिसतात.
ज्या पिढ्या सोशल मीडियावर मोठ्या झाल्या आहेत, त्या आधीच्या पिढ्यांसारखी प्रत्यक्ष नाती बनवण्यात आणि ती निभवण्यात असमर्थ ठरत आहेत. साधारण ३५ व त्याच्या आतील कोणत्याही क्षेत्रातले स्त्री-पुरुष बघितले की, आपल्याला कल्पना येते की, यांना मानवी नाती उमजलेलीच नाहीत.
सोशल मीडियावर आपले द्विमतीय चित्र दिसते, आपल्याला वाटेल तेच विचार आपण सोशल मीडियावर टाकू शकतो, जेणेकरून आपली एक प्रतिमा जगासमोर उभी राहते, पण ही प्रतिमा म्हणजे आपण नाही. ज्या स्त्रियांना प्रत्यक्ष आयुष्यात कोणी विचारत नाही, आत्मविश्वासाची कमतरता असते, आर्थिक अडचणी, पालकांचा त्रास असतो, अशा मुली/स्त्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्यक्त होतात.
...........................................................................................................................................
स्त्रियांना पूर्ण दोष देऊन उपयोग नाही, कारण अनेक पुरुषांनादेखील पॉर्न, सिनेमा, ओटीटी मालिकांमधील दिसणारी स्त्री हवी आहे. पुरुषांच्या सेक्सच्या कल्पना पूर्ण करायला स्त्रीला अनेक वेळा शरीराचे हाल करून घ्यावे लागतात. बॉयफ्रेंड/नवऱ्याला curves आवडतात, म्हणून स्वतःचे वजन वाजवीपेक्षा जास्त वाढवणाऱ्या मुलींना/स्त्रियांना body dissatisfactionसारखे त्रास होतात. नवरा/प्रियकर पडद्यावर दिसणाऱ्या, सोशल मीडियाच्या स्क्रिनवर दिसणाऱ्या मुली/स्त्रीसोबत सतत तुलना करत असेल, तर ती स्त्री खुश राहील का? पॉर्नमध्ये दाखवणारे प्रकार पुरुषांना अपेक्षित असतात, जे सामान्य भारतीय स्त्रीसाठी अशक्यप्राय असतात. पण अनेक मुली मनाविरुद्ध या गोष्टी करतात आणि तो राग वेगळ्या प्रकारे नवऱ्यावर/प्रियकरावर निघतो.
...........................................................................................................................................
सतत रील्स/सेल्फी टाकणाऱ्या मुली/स्त्रिया या भावनिकदृष्ट्या खचलेल्या असतात, हे संशोधन आणि अनेकांच्या अनुभवांतून स्पष्ट झालेले आहे. पुरोगामी म्हणून नशा करत धिंगाणा करणे आणि इतरांना त्रास देणे, असा स्वातंत्र्याचा एक सोयीस्कर अर्थ स्त्रियांनी काढला आहे. ‘फेमिनिस्ट’ विचारसरणी स्त्रियांनी पुरुषांसारखे होण्यासाठी दारू, सिगरेट प्यावी, मुक्त राहावे असे मानत असली, तरी नशा हा एक मानसिक आजार आहे. आणि तो पुरुष/स्त्री अशा कोणीही करू नये, हे ‘फेमिनिस्ट’ विचारसरणीला सांगण्याची वेळ आली आहे.
पुणेच नाही तर नागपूर, बीड, औरंगाबाद यांसारख्या शहरांतही मुली सर्रास सर्वांच्या समोर धुम्रपान करताना दिसू लागल्या आहेत. घरी राहणाऱ्या किंवा घरापासून लांब राहणाऱ्या मुलींची व्यसनाधिनता, अनेक व्यक्तींशी असलेले शरीरसंबंध, त्यातून पुढे गुन्हे, असे चक्र अनेक तरुण मुलींच्या आयुष्यात सुरू आहे.
नशेच्या आहारी गेलेला मुलगा नवरा म्हणू नको, असे एकेकाळी म्हटले जायचे, आता ‘नशा करणारी मुलगी नको’ असे लग्नाळू मुले म्हणत आहेत. विविध कारणांनी रखडलेली लग्ने हा जरी मोठा प्रश्न असला, तरी लग्न झाल्यावर ते टिकेल की नाही, याची कुठलीही शाश्वती राहिलेली नाही. कारण घटस्फोटाच्या केसेस प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत.
स्त्रियांना पूर्ण दोष देऊन उपयोग नाही, कारण अनेक पुरुषांनादेखील पॉर्न, सिनेमा, ओटीटी मालिकांमधील दिसणारी स्त्री हवी आहे. पुरुषांच्या सेक्सच्या कल्पना पूर्ण करायला स्त्रीला अनेक वेळा शरीराचे हाल करून घ्यावे लागतात. बॉयफ्रेंड/नवऱ्याला curves आवडतात, म्हणून स्वतःचे वजन वाजवीपेक्षा जास्त वाढवणाऱ्या मुलींना/स्त्रियांना body dissatisfactionसारखे त्रास होतात. नवरा/प्रियकर पडद्यावर दिसणाऱ्या, सोशल मीडियाच्या स्क्रिनवर दिसणाऱ्या मुली/स्त्रीसोबत सतत तुलना करत असेल, तर ती स्त्री खुश राहील का? पॉर्नमध्ये दाखवणारे प्रकार पुरुषांना अपेक्षित असतात, जे सामान्य भारतीय स्त्रीसाठी अशक्यप्राय असतात. पण अनेक मुली मनाविरुद्ध या गोष्टी करतात आणि तो राग वेगळ्या प्रकारे नवऱ्यावर/प्रियकरावर निघतो.
लग्न म्हणजे जबाबदारी. ती पेलायला दोघांचेही मन व शरीर मजबूत हवे. सध्या PCOD, PCOS, थायरॉईड असे हॉर्मोन्सशी संबंधित आजार तरुण मुलींमध्ये सर्रास आढळतात. या मुली लग्न केल्यावर कशा वागणार? २१ ते ३० या वयोगटातील मुलींचे घटस्फोटाचे प्रमाण चिंताजनक आहे, गंमत म्हणजे या मुली दुसऱ्या लग्नासाठीदेखील तयार असतात. लग्न जमवणाऱ्या संस्था व व्यक्ती यांना याबद्दलचा डेटा विचारला, तर त्यातल्या मुलींच्या अटी ऐकून गरगरायला होतं.
...........................................................................................................................................
एक काळ असा होता की, भारतीय लग्नसंस्थेला हुंडा व हुंडाबळीने ग्रासले होते, आता मात्र घटस्फोटानंतरची पोटगी ही लग्नसंस्थेची समस्या आहे. भारतात लग्न अजूनही ठरवून व्यवहार म्हणून होतात. त्यात अर्थात फायदा-तोटा विचारात घेतला जातो. जात, धर्म, शिक्षण, वय, पगार अशा गोष्टींचा विचार करता करता भावनिक व शारिरीक अनुकूलता, लग्नापूर्व समुपदेशन वगैरे गोष्टींचा विचार आपल्याकडे अजिबात केला जात नाही. प्री-वेडिंग शूट, पोस्ट वेडिंग शूट, डेस्टिनेशन वेडिंग, अशा भपकेबाजीत पैसे उडवणारे भारतीय लोक दोन लोकांच्या मनाचा विचार करत नाही.
...........................................................................................................................................
लग्न एकाशी, मात्र लग्नानंतर प्रेमसंबंध दुसऱ्याशी ठेवायची अट असे कितीतरी विचित्र प्रकार बघायला मिळतात. अशा मुलींच्या आईवडिलांना याचे काही वाटत नाही, असेदेखील काही ठिकाणी आढळले. भावनिक स्थिरता नसलेल्या मुलींचे ऑफिसच्या कामातदेखील लक्ष नसते. मुळात भावनिकदृष्ट्या अस्थिर व्यक्ती कशातच यशस्वी होऊ शकत नाही.
पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नुयी, युनिलिव्हरच्या सीईओ लीना नायर, फ्लॅक्सिट्रोन्सच्या सीईओ रेवती अद्वैती या व अशा अनेक उच्चपदस्थ स्त्रिया त्यांचे संसार व मुलं सांभाळत या पदापर्यंत पोहोचल्या. त्यांनी हा खडतर प्रवास कसा पार केला असेल? नुसती बुद्धिमत्ता असून उपयोग नसतो; तर संयम, चिकाटी व मेहनत करूनच या व इतर स्त्रियांनी पुरुषांच्या क्षेत्रांत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
एक काळ असा होता की, भारतीय लग्नसंस्थेला हुंडा व हुंडाबळीने ग्रासले होते, आता मात्र घटस्फोटानंतरची पोटगी ही लग्नसंस्थेची समस्या आहे.
भारतात लग्न अजूनही ठरवून व्यवहार म्हणून होतात. त्यात अर्थात फायदा-तोटा विचारात घेतला जातो. जात, धर्म, शिक्षण, वय, पगार अशा गोष्टींचा विचार करता करता भावनिक व शारिरीक अनुकूलता, लग्नापूर्व समुपदेशन वगैरे गोष्टींचा विचार आपल्याकडे अजिबात केला जात नाही. प्री-वेडिंग शूट, पोस्ट वेडिंग शूट, डेस्टिनेशन वेडिंग, अशा भपकेबाजीत पैसे उडवणारे भारतीय लोक दोन लोकांच्या मनाचा विचार करत नाही. त्याच्या परिणामी आपली लग्नसंस्था कोसळत चाललेली आहे. प्रत्येक उच्चशिक्षित मुलीला व तिच्या आईवडिलांना फ्लॅट, कार असलेला मुलगा हवा असतो. काम करून संसाराला हातभार लावणाऱ्या मुलींचा जमाना आता संपल्यागत जमा आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
दुर्दैवाने आपल्या न्यायसंस्थेला अजूनही मानसिक आरोग्याविषयी संपूर्ण ज्ञान नाही. त्यामुळे अपेक्षित बदल होत नाहीत. घटस्फोटाच्या लाटेत न्यायसंस्थेतील काही बदमाश घटक त्यांचे हात धुवून घेत आहेत. हा लेख लिहीत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे की, आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल दोषी ठरवण्यासाठी केवळ छळ करणे पुरेसे नाही. कोणाचा जीव घेणे किंवा स्वतःचा जीव घेणे, या टोकाच्या गोष्टी असून या स्तरावर जायच्या अगोदर ती व्यक्ती ज्या अवस्थांमधून जाते, त्याच अवस्थेत जर त्या व्यक्तीला मदत मिळाली, तर बऱ्याच गोष्टी थांबवल्या जाऊ शकतात.
घटस्फोट प्रकरणांत मुलींकडून कायद्याचा गैरवापर केला जात असल्याच्या खूप घटना आहेत, अतुल सुभाषच्या केसमध्ये तर न्यायाधीशांनीच खटला मार्गी लावण्यासाठी ५ लाख मागितल्याचा उल्लेख आहे. आनंदी आयुष्यासाठी स्थिर जोडीदार, त्याचा सहवास ही सर्वांत जमेची बाजू समजली जाते. सध्याच्या काळात मानसिक आरोग्याचे प्रश्न वाढण्यामागे प्रत्येक प्रकारच्या नात्यातील भावनिक गुंतवणूक कमी होणे, हे एक प्रमुख कारण आहे. याला लग्न अपवाद नाही. कोरडी भावनाशून्य नाती एकटेपणा देतात. त्याच्या परिणामी व्यसन व पुढे शारिरीक आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. त्यामुळे आपण कोणत्या दिशेला चाललो आहोत, याचा भारतीयांनी, विशेषत: तरुण मुला-मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी तातडीने विचार करायला हवा. घटस्फोट ही सर्व दृष्टीने नुकसानकारक घटना असते. त्यामुळे मुलांचे जन्मभराचे नुकसान होते.
लग्न करताना केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा जोवर तरुण मुलं-मुली, त्यांचे पालक, समाज, शासनव्यवस्था आणि कायदाव्यवस्था विचार करणार नाही, तोवर भारतीय लग्नसंस्था अतुल सुभाषसारखे बळी घेतच राहील.
..................................................................................................................................................................
लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत मानसशास्त्रज्ञ आहेत.
vrushali31@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment