मला हे तुला कधीपासून विचारायचं होतं. तुझ्या कामोन्मादाविषयी तू मला सांगू शकतेस का? आपल्या अंगोपांगाचं भान तुला कधी आलं? कुठल्या वयात? ज्या मुलासोबत तू कॅरम खेळायचीस त्याला तू स्वत:ला स्पर्श करू दिलास? ज्या तऱ्हेनं तू त्याचा उल्लेख करायचीस, त्यामुळे मी नेहमी विचारात पडत असे. मी मुंबईमधल्या चाळीबाहेर त्या मुलांसोबत, स्कर्टमध्ये, वेणी घालून बसलेल्या आणि सोंगटीनं अचूक निशाणा साधणाऱ्या तुझी कल्पना करून पाहिली होती.
तू स्वत:ला स्पर्श करून पाहतेस?
पाण्यासोबत खेळायला तुला मजा येते? इथून दूर, समुद्रालगत असलेल्या त्या शहरातल्या ऑफिसमधल्या टॉयलेटमध्ये मला कळलं की, पाण्याची एक अशी नळीसुद्धा असते, जिच्यातून पाण्याचा असा फवारा निघतो की, त्याने नेमका निशाणा साधल्यावर माझं सर्वांग आनंदून जातं. तुला आठवत असेल की, आपण ज्या ज्या घरांत राहिलो, त्यात भिंतीतले नळ आणि प्लॅस्टिकचे मग असायचे. त्यामुळेच मला ऑफिसमधल्या त्या वेगळ्या पाईपनं मोहित केलं होतं. मी तो वापरून पाहिला आणि त्याच्या फवाऱ्यानं मी आश्चर्यचकित झाले. आपण किती सहन करू शकतो, त्यानुसार मी पाण्याच्या दाब कमी-जास्त करण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. थोडंफार लक्षात येऊ लागलं होतं की, मला काहीतरी होतंय. पण ते काय होतं, ते समजलं नाही. मी थोडीशी आश्चर्यचकित झाले. त्या दुपारी, माझी सलवार माझ्या पायाजवळ पडून राहिली आणि मी त्या स्टीलच्या लांब पाईपशी खेळत बसले. मी पुन्हा प्रयत्न केला. एक खास दाब, एका विशिष्ट जागी देण्याचा. माझ्या ओटीपोटीतल्या मांसपेशी थोड्या आक्रसल्या गेल्याचं जाणवलं. कळत-नकळत मी पुन्हा तो फवारा मारून पाहिला आणि काहीतरी वेगळा पण माहीत असलेला अनुभव आतून अनुभवला. आणि मग हे ज्या दिशेनं चाललं होतं, तिथं जाऊन पोहचलं. ऑफिसमधल्या अनेक दुपारी मी त्या टॉयलेटमध्ये घालवल्या. जेव्हा एखादी मुलगी आपली बॅग घेऊन टॉयलेटमध्ये जाते, तेव्हा तिला कुणीही ‘लवकर बाहेर ये’ असं म्हणत नाही. माझ्या मनात विचार आला, हे किती छान आहे!
..................................................................................................................................................................
ऑनलाईन आत्मचरित्र लेखन कार्यशाळा
नोंदणीसाठी पुढे दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म भरा -
https://forms.gle/HaYhWs7Wy8Dvwbfo6
अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९८८१९०१८२१
..................................................................................................................................................................
पण शेवटपर्यंत आपण त्याविषयी एकमेकींशी बोललो नाही. मला आठवतं की, माझ्या काखेत केस यायला लागले तेव्हा कुणीतरी माझी चेष्टा केली होती, तेव्हा तू माझ्याशी बोलली होतीस. म्हणालीस, ‘तू लवकरच फूल बनणार आहे. खूप मुलं या फुलाला स्पर्श करू इच्छितील. त्यामुळे तुला काळजी घ्यायला हवी.’ मला कळलं नाही की, ‘तू मला एकदम सल्ले का द्यायला लागलीस’. पण जर कदाचित आपण त्या माझ्या शरीरात लपलेल्या छोट्या कळीविषयी आणि माझ्या बोटांनी तिला स्पर्श करण्याविषयी बोलतो असतो तर…
तेव्हा कदाचित मी तुला हे सांगू शकले असते - मी कधी कधी या विचारानं हैराण व्हायचे की, माझी बोटांना ‘कार्पल टनल सिंड्रोम’ (carpel tunnel syndrome) होईल आणि त्यामुळे मला टायपिंगबियपिंग करता येणार नाही. मी नेहमी हस्तमैथून करते. स्वत:ला स्पर्श करून आनंद मिळवते. अनेक वेळा यासाठी की, मी कंटाळलेली असते आणि करण्यासारखं इतर काही नसतं. खासकरून सुट्टीच्या दिवशी. जे काही असेल ते मी खाते, पडून राहते, सलवारीची नाडी सोडते आणि सुरू होते. आणि मग दुपारभर झोपते. त्यामुळे मला आनंद मिळतो.
मला आठवतं दुपारी ऑफिसमधून आल्यावर तू कशी झोपायचीस ते. तुला सकाळी पाचची लोकल पकडावी लागायची. बाबा आणि मी खूप उशिरा उठायचो. तुझ्या ट्युबलाईट ऑन-ऑफ करण्यामुळे आणि बेडरूममधल्या एकुलत्या एक आरशासमोर उभं राहून पदर नीट करण्यामुळे आमची स्वप्नं भंग व्हायची. त्यामुळे तक्रार करायचो. पण तू तयार करून ठेवलेले पोळी-भाजीचे डब्बे घ्यायचो. आम्ही खूप वाईट होतो. माफ कर. पण हेही मानलं पाहिजे की, बाबा संडास साफ करायचे आणि कपडेही धुवायचे. आणि मी लवकर जेवण बनवायला शिकले. कारण बाबा एका पदार्थाच्या पलीकडे कधी काही बनवू शकले नाहीत. आम्ही तसे फार वाईटही नव्हतो, नाही का?
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
मी आता ज्याच्यावर प्रेम करते, तो दुपारी झोपत नाही. हातात पुस्तक घेऊन तो एखाद्या प्राण्यासारखा इकडे-तिकडे फिरत राहतो. माझ्या दुपारच्या झोपेवरून आम्ही कधी कधी भांडतो. तो नेहमी बेडरूममध्ये काहीतरी खुडबुड करत राहतो आणि माझी झोपमोड होते. मग तो हसून म्हणतो, ‘उठायची वेळ झालीय’. कधी कधी मी झोपेतच त्याला बिलगते आणि माझ्याजवळ ओढते. कधी कधी मी चिडचिडही करते. मग आमचं भांडण होतं.
आमचं पहिलं ‘झोपण्यावरचं भांडण’ (लैंगिकसंबंधांवरून होणाऱ्या भांडणाला दुसरं काय म्हणतात?) माझ्या हस्तमैथुनावरूनच झालं होतं. आम्ही एकमेकांना बाहुपाशात घेऊन चुंबनं घेत होतो. हळूहळू आम्ही एकमेकांचे सगळे कपडे उतरवले. माझे कपडे त्याने खूप काळजीपूर्वक उतरवले, जणू काही तो त्याच्या आवडीच्या एखाद्या चॉकलेटचं रॅपर काढतोय. थोड्या वेळानंतर तो कंडोम शोधायला दुसऱ्या खोलीत गेला. थोड्याशा सरकलेल्या एका पडद्यातून चंद्राचा हलकासा प्रकाश खोलीत पसरला होता. मी हातानं माझ्या जांघा कुरवाळू लागले. शरीराच्या स्पर्शाचा आनंद घेऊ लागले. आणि माझी बोटं नकळतपणे आतमध्ये गेली. आणि मग मनात इतर कुठला विचार यायच्या आधी, मी उन्मादाची सीमा ओलांडली.
मी जेव्हा डोळे उघडले, तेव्हा तो मला पाहत होता. तो काहीसा नाराज झाला होता. म्हणाला, ‘माझ्यासाठी थांबलीही नाहीस’. मी त्याला म्हणाले, ‘नाही, नाही, माझ्याजवळ ये’. पण तो खूपच उदास झाला होता. खोलीतून बाहेर निघून गेला. आम्ही त्या दिवसांत त्याला काय आवडतं, मला काय आवडतं, असं हळूहळू एकमेकांना जाणून घेत होतो…
माझ्या लक्षात आलं की, लैंगिकसंबंधांनंतर लगेच हस्तमैथुन केल्यानं जबरदस्त आनंद मिळतो. एकतर शरीराची उब तुम्हाला लपेटून असते, माझ्या स्तनांवर त्याचे ओठ असतात आणि शेवटी ती गरम बोटं माझ्या आत…
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
नुकतंच मला विचारण्यात आलं होतं की, एखाद्या नव्या व्यक्तीला भेटल्यावर कशापासून आनंद मिळतो, तेव्हा मी वरचा किस्सा सांगितला होता. मी हे शब्दांत सांगू शकत नाही… जणू काही उत्तेजना शब्दांच्या माध्यमातून स्क्रीनवर दाखवायची आहे.
आई, आपली शरीरं किती एकसारखी आहेत! म्हणजे, आपल्याला ज्या गोष्टींपासून आनंद मिळतो, त्याही एकसारख्याच आहेत?
तुलाही महिलांचं आकर्षण वाटतं?
आम्ही दोघी बिछान्यावर झोपलो होतो. टेबलवर ठेवलेल्या लॅपटॉपवर सिनेमा पाहत होतो. आम्ही थोडीशी घेतली होती आणि खोलीतले दिवे बंद होते. लॅपटॉपच्या प्रकाशाच्या किरणांमुळे तिचा चेहरा गडद निळा दिसत होता. आम्ही दोघी कुठल्या गोष्टीवर हसलो, ते आठवत नाही, पण ती मला चिकटून झोपली. तिने चेहरा वळवला आणि माझी चुंबनं घेतली. उकाड्याच्या त्या रात्रीनं तिच्या साबणासारख्या सुगंधाला अजूनच घमघमाटी केलं होतं. मला तो सुगंध आणि तिचे लांब लांब पाय आठवतात.
मी नेहमी महिलांची स्वप्नं पाहते. हे मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं, तेव्हा ती म्हणाली, ‘हे सांगता येणार नाही की, महिलांविषयी विचार करण्यामागचं कारण काय आहे. आपल्या संस्कृतीमध्ये महिलांना एखाद्या वस्तूसारखं समजलं जातं आणि तुम्हीही त्यांच्याकडे अभिलाषेच्या नजरेनं पाहू लागता म्हणून? की तू त्यांच्याकडे आकर्षित होतेस, हे यामागचं कारण आहे.’ सर्वसाधारपणे समाजात लोकांना सेक्सविषयी मिळणारं प्रोत्साहन महिलांच्या शरीरामुळेच मिळतं, हो ना? मी तिच्या बोलण्यामुळे गोंधळात पडले.
..................................................................................................................................................................
हेही पहा\वाचा
साचलेपणाचा बर्फ फोडायला तर हवाच! - प्रतिमा जोशी
जगण्याचे वियाग्रीकरण : जगाची नवी ओळख - श्रीनिवास हेमाडे
‘लस्ट स्टोरीज’ : फक्त ‘वासना’ नव्हे, तर नातं, प्रेम, लैंगिकता यांच्या बहुपेडी कथा - अक्षय शेलार
भारतीय पुरुषाची विकृत मानसिकता - शिव विश्वनाथन
बदतमीज़ दिल, माने ना, माने ना! - डॉ. कुंदा प्रमिला निळकंठ
..................................................................................................................................................................
एकदा परदेशात प्रवास करताना मला समोरच्या सीटमागच्या कप्प्यात एक मासिक दिसलं. ते पुरुषांच्या नग्न छायाचित्रांनी भरलेलं होतं. त्या ट्रेनमध्ये फारशी गर्दी नव्हती. मी त्या मासिकाची पानं उलटली. मी खूप खूश झाले होते. छायाचित्रांपेक्षा तो कागद मला जास्त जाळत होता. ते सगळे नग्न पुरुष पाठमोरे होते. छायाचित्रं लालसर आणि कृष्णधवल रंगांत होती. त्यांची पाठ किंवा चेहरे कॅमेऱ्याकडे वळलेले होते. मी हळूवार पानं उलटली, माझी बोटं एखाद्या पुरुषाच्या पाठीवरून सरकत असताना तो थोडासा खाली वाकायचा, आपल्या जांघा आवळून घेत… त्याच्या पार्श्वभागाचा गोलाकार... मी ते मासिक त्या ट्रेनमध्येच ठेवून दिलं.
नाईटी घालून, सोफ्यावर बसून... आपण ‘कामसूत्र’ पाहिल्याचं तुला आठवतं का? त्या रात्री ते केबल टीव्हीवर दाखवलं गेलं होतं. बाबा त्यांच्या सवयीमुळे झोपले होते. जेव्हा तो प्रसंग आला, तेव्हा तू हसलीस आणि मला डोळे बंद करायला सांगितलेस. मीही हसले आणि म्हणाले, ‘मला माहीत आहे काय असतं ते. मी याआधीही पाहिलंय हे.’ आश्चर्य वाटून तू हसलीस, आणि मग आपण दोघीही हसलो.
ज्या चाळीत तू वाढलीस, तिथं सोफा नव्हता. एकत्र कुटुंब होतं. तेव्हा सगळे सोबत झोपायचे असं तू मला सांगितलं होतंस. बाबा, भाऊ, आया आणि मुलं. एक काका आणि भाचीसुद्धा. तू लैंगिकसंबंधांविषयी कधी सांगितलं नाहीस, मीही विचारलं नाही. पण तुझ्या आवाजावरून मला कळलं होतं.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
मी अल्लड होते, तेव्हाची गोष्ट. एके दिवशी मी तुला येऊन सांगितलं की, एका काकांनी रिक्षात माझ्यासोबत काय केलं. तेव्हा तुला खूप राग आला होता. तू मला सांगितलंस की, ‘ते तुला पुन्हा कधी स्पर्श करणार नाहीत. घाबरायचं काही कारण नाही.’ आपण जेव्हा घरच्यांसह त्यांना भेट असू, तेव्हा तू माझं संरक्षण करायचीस. हळूहळू काळ उलटला आणि माझी त्या रिक्षातली आठवण अस्पष्ट होत गेली. पण मला माहीत आहे, तू ती गोष्ट कधीही विसरली नाहीस. कारण एकदा घरातल्या एका कार्यक्रमात त्या काकांनी सांगितलेल्या एका विनोदावर मी थोडी त्यांच्याजवळ जाऊन हसले, तेव्हा तू अचानक तिथं आलीस आणि मला कुठल्या तरी कामाच्या बहाण्यानं बाहेर घेऊन गेलीस. आणि म्हणालीस, ‘सावध रहा’.
तुला मात्र तसं सांगायला कोणी नव्हतं. तू तुझ्या आईला कधी जाणून घेऊन शकली नाहीस. ती तू खूप लहान असतानाच गेली. तुला कवेत घेणारं कोणी नव्हतं.
त्यामुळेच जेव्हा मी तुला मिठी मारते, ते आवडत नाही का तुला?
तुझे हात ताणले जातात आणि शरीरापासून लांब होतात. आणि तुझा चेहरा असा होतो की, जणू काही तू खूपच आंबट दही खाल्लं आहेस. मी हट्ट करून तुला मिठी मारते. कधी कधी तुझा एक हात मला थोपटतो, शब्दांशिवाय मला शांत करतो. किती वर्षांपासून मी तुला मिठी मारते, पाप्या घेते, तेव्हा तू ‘बास झालं, जा’ असं म्हणून वेगळंच हसायचीस. मला वाटतं, ते तू अलीकडेच बंद केलं आहेस.
तू स्वत:हून मला कधी कवेत घेशील?
मूळ हिंदी लेखाचा मराठी अनुवाद – टीम अक्षरनामा
..................................................................................................................................................................
हा मूळ हिंदी लेख http://agentsofishq.com या हिंदी-इंग्रजी पोर्टलवर १२ मे २०२१ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेख पाहण्यासाठी क्लिक करा –
..................................................................................................................................................................
लेखिका इनी ही ३८ वर्षांची तरुणी आहे. तिला अनोळखी लोकांना भेटायला आवडतं. आणि ती ‘The Moving finger writhes’ म्हणजे ‘हलणाऱ्या बोटं तरसतात’सारख्या कविता लिहिते.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment