पुरुष म्हणून मी कोणत्या स्थानावरून बोलतो? ही व्यवस्था ओळखूनही त्यातील माझी गुंतवणूक मी कशी तोडू शकेन?
समाजाच्या प्रत्येक पिढीत विशिष्ट ‘पुरुषत्व’ आणि ‘स्त्रीत्व’ या संकल्पना तयार केल्या जातात. उदाहरणार्थ, भारतीय संस्कृतीत त्याग करणारी आई, सेवाभावी पत्नी, कर्तव्यदक्ष बहीण आणि कुटुंबाचा आधार पुरुष ही उदाहरणं आहेत. या संकल्पना मुलांच्या मानसात खोलवर रुजतात. मी जेव्हा स्त्रियांच्या श्रमाकडे पाहतो, तेव्हा त्या श्रमांचा कधी विचार करत नाही, कारण हे सर्व पूर्वनियोजित भूमिकांप्रमाणे चाललेलं आहे...