अजूनकाही
टोकाची दृश्यं एकाच वेळी, एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाली, तर त्याचा काय परिणाम होईल? म्हणजे ‘ऑल क्वाएट ऑन वेस्टर्न फ्रंट’मध्ये एकीकडे दिसणारा एखाद्याला भोसकल्यावर त्यालाच आटोकाट वाचवण्याचा प्रयत्न करणारा सैनिक आणि दुसरीकडे दिसणारा युद्धबंदी जाहीर झाल्यावर कागदोपत्री युद्ध संपायला वेळ असल्यामुळे युद्ध सुरू ठेवायला लावणारा एका बटालियनचा प्रमुख. हे नक्की कशाचे द्योतक आहे? ही कुठली मूल्यव्यवस्था आहे? ...
मात्र ते जे प्रश्न उपस्थित करत आहेत, ते टाळून भारताने २०४७मध्ये उच्च उत्पन्न गटात प्रवेश करण्याचे स्वप्न पूर्ण कसे होईल? रोजगार, अर्थव्यवस्था, शिक्षण यांमध्ये उत्पन्न झालेल्या या संकटाला लेखकद्वय ‘ट्रिपल ई क्रायसिस’ असे संबोधतात. प्रस्तुत पुस्तकाचा प्रमुख उद्देश भारतीय स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील, तेव्हा देशाची गणना उच्च मनुष्यबळ विकसित असलेल्या देशांमध्ये व्हावी हा आहे....
नुकत्याच झालेल्या जंतरमंतरवरच्या निदर्शनांच्या चर्चेत सगळ्यात जास्त चर्चेत आली ती जेन-झीची दुधारी भाषा. तिने ऐरणीवर आणलेले भाषाविषयक प्रश्न इतके भेदक आणि लक्षवेधी होते की, एरवी भाषेला महत्त्व न देणाऱ्या, भाषेविषयी बोलायला नाखूष असलेल्या लोकांनाही भाषेविषयी बोलायची वेळ आली. भाषा ही जणू काही आपली खाजगी स्थावरजंगम मालमत्ता आहे ...
भारतातही परीक्षा सुरक्षेसाठी अनेक नियम आहेत, मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी होते का? २०२४मधील नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या आरोपांनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. विद्यार्थी रस्त्यावर उतरले, आंदोलन झाले; परंतु दोषींवर नेमकी आणि तातडीची जबाबदारी निश्चित झाल्याचे चित्र अनेकदा दिसत नाही. प्रश्न असा आहे की, या वेळी तरी जबाबदारी निश्चित होईल का? की पुन्हा एकदा ‘येरे माझ्या मागल्या’सारखेच घडेल?...
कॉकरोच जनता पार्टी, अन्य संघटना आणि तरुणाईच्या साधारण दीड महिने चाललेल्या, अनेक रोमांचक टप्प्यांनी भरलेल्या, आंदोलनानंतर शिक्षणमंत्र्यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. मोजता येणार नाहीत, अशा आठ गोष्टी या आंदोलनातून प्रतीत होतात. त्या चिरकाल टिकणाऱ्या असतील वा नसतील. अशा सामाजिक घटना काही कुणी एके ठिकाणी बसून नियोजित केलेल्या नसतात, परंतु आंदोलनाच्या या काहीशा ‘अदृश्य’ अशा गुणधर्मांची दखल मात्र घ्यावयासच हवी...
त्याकडे नको का लक्ष केंद्रित करायला? का अश्लीलतेवरच आपण थांबणार आहोत? आणि आपण थांबू म्हटल्याने ‘जेन-झी’ आपल्याला थांबू देणार आहे का? त्यांना स्वच्छ स्पर्धेचे वातावरण द्यायला नको का, त्यांना नोकऱ्या प्राप्त करण्याचे न्याय्य वातावरण निर्माण करून द्यायला नको का? राग, रागामधून विद्रोह आणि विद्रोही मनःस्थितीमुळे विचलित झालेल्या लिम्बिक सिस्टिममधून उसळून आलेली अश्लीलता, अशी ही सगळी साखळी आहे...
प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो...
एका बाजूने स्त्रीचा ‘जननी’ म्हणून सन्मान केला जातो, तर दुसरीकडे तिच्यावर अमानुष अत्याचार होत असतात. या संदर्भात सर्वच समाज कमीअधिक प्रमाणात दोषी असल्याचे दिसते. असं असलं तरी जवळपास सर्व समाजांत स्त्रीच्या अदभुत जननक्षमतेबद्दल भीतीयुक्त आदर दिसून येतो. खुद्द स्त्रीलासुद्धा मातृत्वाची ओढ असते. मात्र एकविसाव्या शतकातील तरुण स्त्रिया या समजांना आणि श्रद्धांना आव्हान देत आहेत...
एरिक फ्रॉम या मानसशात्रज्ञाने लग्नसंस्थेची मानसिक गरज सर्वांत सुंदर पद्धतीने सांगितलेली आहे. या जगात माणूस तसा एकटा असतो. या एकटेपणाच्या भावनेने त्याला अत्यंत असुरक्षित बनवलेले असते. नुसत्या प्रेमाने ही भावना जात नाही. निष्ठा आणि प्रेम या दोन गोष्टी हातात हात घालून माणसाच्या आयुष्यात आल्या, तरच माणसाच्या मनात सुरक्षिततेची आणि रुजलेपणाची सुंदर भावना तयार होते...
हे आंदोलन शिक्षण व नोकरीत आरक्षण हवे की नको, कुणास हवे व कुणास नको, किती हवे व किती नको, या मुद्द्यांवरसुद्धा नाही. शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आवश्यक आहे, या मुद्द्यावर हे आंदोलन उभे राहिले आहे. नेमके बदल काय हवेत, याची कुणाला कल्पना नसेल, पण आपली सध्याची शिक्षण व्यवस्था सडलेली आहे, किडलेली आहे, कुचकामी आहे आणि म्हणून ती बदलायची आहे, ही सार्वत्रिक भावना आहे...
मूळ अमेरिकन नाटकात कैझाद कोतवाल यांनी यथोचित बदल करत ही घटना १९४०च्या दशकातल्या बंगाल प्रांतात आणली आहे. मात्र एक छोटासा फरक आहे. अमेरिकेत ‘ईडन क्रिक’ नावाचं गाव आहे, तर कोतवाल यांच्या नाटकात हे काल्पनिक ठिकाण आहे. आणखी एक पण जास्त महत्त्वाचा फरक म्हणजे मूळ अमेरिकन नाटकातल्या पाचही स्त्रिया साध्या कुटुंबातल्या आहेत. या नाटकात या स्त्रिया हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन अशा बहुधर्मीय आहेत...
‘सबका साथ, सबका विकास’ ही घोषणा कानाला कितीही गोड वाटत असली, तरी ती प्रत्यक्षात उतरवणं शक्य नाही. लक्षात घ्या, अर्थव्यवस्था सगळ्या दिशांना एकाच वेळी धावू शकत नाही. तसं धावत सुटलो आणि समजा अगदी नजीकच्या भविष्यात भारत ‘पाच ट्रिलियन डॉलर’च्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचलाच, तरी तो हत्तीरोग झालेल्या रोग्यासारखा दिसेल — एका पायावर किळस येण्याइतकी सूज वाढलेली, आणि दुसऱ्या पायाच्या काटकुळ्या! ...
नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!...
अलीकडच्या काळात राजकारण आणि प्रशासनातील नेते-अधिकारी बोलणं आणि वागण्यातही खूपच बेताल आणि उर्मट झाले आहेत. ‘हुच्च’ नेत्यांची फौजच आता राजकारणात आहे. राजकारणात आडदांडपणा आणि ‘राडा संस्कृती’ आणली ती शिवसेनेनं आणि त्याची लागण सर्वपक्षीय झालेली आहे. प्रयोगशाळेतल्या शेपटी तोडलेल्या उंदरासारखी अवस्था बहुसंख्य संपादकाची झालेली आहे. ...
या प्रकरणातील सर्वांत कळीची बाब म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने अद्याप या वादाच्या गुणवत्तेवर कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. न्यायालयाने केवळ निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. याचा अर्थ निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या वैध असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे, असा काढता येणार नाही...
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.