कोणी त्यांना ‘भाऊ’ म्हणत, कोणी ‘कॉम्रेड पाटील’ तर कोणी फक्त ‘कॉम्रेड’. आमच्या पूर्ण कुटुंबात त्यांना ‘आप्पा’ संबोधले जाई
ग्रंथनामा - झलक
सुजाता शिंदे
  • पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Wed , 12 April 2017
  • ग्रंथनामा Granthnama झलक कॉ. शरद् पाटील हर्मिस प्रकाशन सुजाता शिंदे

प्रसिद्ध प्राच्यविद्या संशोधक, ‘माफुआ’कार कॉम्रेड शरद् पाटील यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीच्या ‘क्रांतिकारी सत्यशोधक - कॉम्रेड शरद पाटील’ या लेखसंग्रहाचे आज पुण्यात प्रकाशन होत आहे. या संग्रहात पाटील यांची कन्या, प्रा. सुजाता शिंदे यांच्या लेखाचाही समावेश आहे. वडिलांविषयीच्या हृद्य आठवणी सांगणारा हा त्यांचा लेख...

..................................................................................................................

कोणी त्यांना ‘भाऊ’ म्हणत, कोणी ‘कॉम्रेड पाटील’ तर कोणी फक्त ‘कॉम्रेड’. आमच्या पूर्ण कुटुंबात त्यांना ‘आप्पा’ संबोधले जाई. तसा आप्पांचा सहवास आम्हाला फार कमी लाभला व त्यातल्या त्यात मला तर फारच कमी. १९६१ ते ६५ या कालावधीत आप्पा बरेच दिवस राजकीय कैदी म्हणून तुरुंगात होते. त्यानंतर सतत आदिवासी भागात दौरे, घरी असतील तेव्हा एकतर त्यांच्या वाचन-लिखाणात गर्क किंवा आलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात व्यस्त. तरीदेखील, जो काही सहवास लाभला त्यातील काही आठवणी अजूनही ताज्याच आहेत व राहतील.

स्वच्छता, शिस्त, नीटनेटकेपणा रावर आप्पांचा खूप भर असे. सकाळी अंघोळीअगोदर ते फटकणीने त्यांच्या शेल्फवरची सर्व पुस्तके साफ करत असत. त्यांची पुस्तके, फाइल्स व नोट्स इत्यादी व्यवस्थित ठेवलेले असे. लिखाण करताना संदर्भासाठी एखादे पुस्तक किंवा फाईल हवी असेल तर ते खुर्चीवरून उठून अचूकपणे त्याच पुस्तक वा फाईलजवळ जात. त्यांना कधी शोधाशोध करताना मी बघितले नाही. जणू काही फाईलिंग सिस्टीमच त्यांनी त्यांच्या मेंदूत फीड करून ठेवली होती.

आप्पा कलेचे खूप चाहते होते. नूतन-अमिताभचा ‘सौदागर’, ऋषिकेश मुखर्जींचा ‘नमक हराम’ व बलराज साहनींचा ‘दो बिघा जमीन’ यांसारखे चित्रपट ते पाहत व आम्हालादेखील आवर्जून पाहायला सांगत असत.

के0 एल0 सहगल हे आप्पांचे आवडते गायक व एस0 डी0 बर्मन हे आवडते संगीतदिग्दर्शक होते. माझा लहान भाऊ सर्मद याने, तो आठवीत असताना खेळाडूंच्या बनियनवर स्क्रिनप्रिटिंग केले व त्यातून मिळालेल्रा पैशाने एक रेडिओ आणला. रेडिओवर एस0 डी0 बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले गाणे लागले की, आप्पा लिखाण करताना उठून येऊन ते गाणे ऐकत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

आप्पांचे वेळेचे नियोजनही जबरदस्त होते. त्यांना नेहमी काचेच्या ग्लासात चहा लागत असे. चहा पितानादेखील त्यांचे लिखाण चालत असे. कदाचित चहा पिण्यातदेखील वेळ जाऊ नये म्हणून ही सवय. त्यांना मांसाहारी जेवण जास्त आवडे. शाकाहारी जेवणाबाबत ते गमतीने म्हणत, ‘वाघ, सिंह गवत खात नाही.’ घरात टीव्ही आल्यानंतर ते विशेषत: टेनिसची मॅच बघत असत.

आप्पांचा शरीराच्या सुदृढतेवरदेखील खूप भर होता. घरी असत तेव्हा ते निरमितपणे व्यायाम करत. वयाच्या सत्तरीपर्यंत त्यांनी व्यायाम केला.

आप्पांचे जिवलग मित्र आप्पांवर अपार प्रेम करत. धुळ्याचे विश्वनाथ विभांडिक ऊर्फ स्मार्ट टेलर, दीनानाथ पंचभाई, डॉ0 रा0 भ0 चौधरी, सुरतचे जरंतभाई देसाई, मुंबईचे शाहीर गव्हाणकर, मालपूरचे डॉ0 नामदेव पाटील हे त्यातले काही उल्लेखनीय मित्र.

आमच्या, विशेषत: माझ्या शिक्षणाबाबत आप्पा अतिशय जागरूक होते. मी दहावीत असेपर्यंत आम्ही साक्रीला राहत असू. कारण आमची आई सौ0 सुशीला पाटील तेथे प्राथमिक शिक्षिका होती. त्या वेळी स्कॉलरशिपची परीक्षा फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी होत असे. तेव्हा आप्पा स्वत: मला परीक्षेसाठी धुळ्यास घेऊन गेले होते. पूर्वी इंग्रजी हा विषय पाचवीपासून होता. माझ्या पाचवी ते सातवी या कालावधीत आप्पा जेव्हा जेव्हा घरी असत तेव्हा माझ्याकडून इंग्रजीच्या क्रमिक पुस्तकातील धडे वाचून घेत असत. कठीण स्पेलिंग पाटीवर लिहून, पाठ करण्यास सांगून नंतर पाठांतर घेत असत. जोपर्यंत स्पेलिंग पाठ होत नाही तोपर्यंत मला जेवायला मिळत नसे. त्या वयात मला ती मोठी शिक्षा वाटे.

नचिकेत (माझ्यापेक्षा लहान, सर्मदपेक्षा मोठा) व सर्मदसाठी मात्र आप्पा विशेष वेळ देऊ शकले नाहीत. तरीदेखील ते त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत व प्रोत्साहन देत. आम्ही साक्रीला असेपर्यंत आप्पांना वेळ मिळे, त्या वेळी ते आम्हाला गणेशोत्सवाच्या कालावधीत गणपती पाहण्यास धुळ्याला नेत असत. एक कलात्मकता या दृष्टीने ते या महोत्सवाकडे पाहत. सर्मदलाही कलेची आवड होतीच. त्यातून स्फूर्ती घेऊन त्याने आठवीत असताना गणपती तयार केले. तो गणपती तयार करत असताना आप्पा त्याला काही सूचना करत. गणपती विकून आलेल्या पैशाने सर्मदने स्क्रिनप्रिटिंगचे सामान आणले व खेळाडूंच्या बनियन्सवर स्क्रिनप्रिटिंग केले. त्या वेळीही आप्पांनी त्याला प्रोत्साहन दिले. आप्पांचे प्रोत्साहन व आईची आर्थिक मदत यामुळे सर्मद मुंबईच्या सर जे0 जे0 स्कूल ऑफ आर्टस्ला गेला व आज एक नामवंत शिल्पकार झालाय.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

दहावीत उत्कृष्ट गुण मिळाल्यावर नचिकेतने पॉलिटेक्निक कॉलेजला जाण्याचे ठरवले. त्याच्या इतर मित्रांप्रमाणे त्यानेही सिव्हिल घ्यायचे ठरवले व त्याचा निर्णय त्याने आप्पांना सांगितला. त्यांनी नचिकेतला समजावले, ‘या क्षेत्रात भ्रष्टाचार जास्त आहे. त्यापेक्षा तुला दुसरा विषय घेता आला तर बघ.’ नचिकेतला ते पटल्याने त्याने मेकॅनिकल घेऊन डिप्लोमा केला. नाशिकच्या एका टूल्स कंपनीत नोकरीस असताना डिफेक्टील्ह टूल्स पास करण्याची सक्ती केल्यावर त्याने तत्काळ ती नोकरी सोडली. दुसरी नोकरी करतानाच एम0ई0 केले. आज तो एका मोठ्या संस्थेत प्राध्यापक म्हणून काम करतोय.

मीदेखील चांगल्रा गुणांनी अकरावी उत्तीर्ण झाल्यावर आर्टस्ला गेले. आप्पांनी कोणत्याच बाबतीत त्यांची मते आमच्यावर लादली नाहीत, ना शिक्षणाच्या शाखा निवडताना, ना विवाहाबाबतीत.

आप्पा इतर सामान्य लोकांपेक्षा खूप वेगळे आहेत हे मला माझ्या लहानपणीच काही प्रसंगामुळे जाणवले. आम्ही साक्रीस असताना त्या मतदार संघातून काँग्रेसच्या एक महिला कार्यकर्त्या आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या विजयाची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. प्रत्येक घरासमोर स्त्रिया त्यांचे औक्षण करीत होत्या. मिरवणूक आमच्या घरासमोर थांबली. आमदार गाडीतून उतरल्या व जिना चढून वर आल्या. विशेष म्हणजे त्या मिरवणुकीचा जल्लोष व आवाजाचा कोणताही अडथळा आप्पांच्या कामात आलेला दिसत नव्हता. आप्पांचे लिखाण चालूच होते. आमदार आप्पांसमोर रेऊन उभ्या राहिल्या व म्हणाल्या, “भाऊ, मला आशीर्वाद द्या.”

“मी काँग्रेसच्या आमदाराला शुभेच्छा देत नाही.” हे एकच वाक्य बोलून आप्पांनी पुन्हा त्यांच्या कामास सुरुवात केली.

कळवण तालुक्रातील ‘भऊर’ हे आमच्या मामांचे गाव. एकदा मामांच्या व आजोबांच्या आग्रहाखातर आप्पा आमच्याबरोबर काही दिवसांसाठी भऊरला आले. मामांचे घर भले मोठे होते. पाहुण्यांच्या खोलीत आप्पांची व्यवस्था केली गेली. अर्थातच, आप्पांनी त्यांचे वाचन-लिखाणाचे साहित्य बरोबर घेतलेले होते. जुजबी गप्पा झाल्यावर आप्पांनी लिखाणासाठी घरातली एक पत्र्याची पेटी मागवली, आप्पा गादीवर बसले व पेटीवर पुस्तक-वही ठेवून लिखाणास सुरुवात केली. त्यांचा चहा त्यांना त्यांच्या खोलीतच नेऊन दिला जाई. जेवणासाठी आप्पा फक्त बैठकीत येत व जेवणानंतर पुन्हा त्यांच्या कामात गर्क होत. आमच्या आईचे काका श्री0 नागूजी गणपतराव पवार हे कळवण तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचे कार्रकर्ते होते. ते संध्याकाळी आप्पांशी चर्चा करण्यास येत. रात्रीच्या जेवणानंतरही कंदिलाच्या उजेडात आप्पांचे वाचन व लेखन सुरूच असायचे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

बसने प्रवास करत असतानाही संपूर्ण प्रवासभर त्यांचे वाचन सुरू असारचे. आप्पा वाचन-लिखाण व आदिवासी भागातील कार्यक्रमांत इतके गर्क असायचे की, ते एखाद-दोन अपवाद वगळता कोणा नातेवाइकांच्या मरण किंवा लग्नप्रसंगी आमच्याबरोबर आलेले मला आठवत नाही. नाती सांभाळणे ही जबाबदारी आमच्या आईने पार पाडली.

कौटुंबिक जीवनात आप्पा त्यांचे विचार स्पष्टपणे मांडून मोकळे व्हायचे. यामुळे कधीकधी नातेसंबंधात गैरसमज होत. मी एम0ए0साठी धुळ्यास होते. मी आई होणार हे कळल्यानंतर आप्पांनी माझे मातृत्व कसे माझ्या शिक्षणाच्या आड येऊ शकते, याबद्दल माझ्या सासूबाईंना पत्र लिहिले. अर्थात मातृत्व व शिक्षण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी, हा निर्णय सर्वस्वी माझा होता. आप्पांच्या पत्रामुळे माझ्या सासरच्या कुटुंबात थोडे गैरसमज झाले. परंतु आप्पांचा त्या पत्रामागचा हेतू त्यांना माहीत असल्याने वातावरण लगेच निवळले.

प्रसिद्धीपासून आप्पा नेहमी दूर असत. वर्तमानपत्रे व मासिके यात लेख देताना आप्पा कधीही फोटो देत नसत. त्यांच्या उतारवयात त्यांच्या कार्यकर्त्यांनी तो दिला असावा. त्यांचे म्हणणे असारचे, “माझा फोटो कशाला पाहिजे? माझे विचार वाचा.”

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

२०-२१ वर्षांपूर्वीची घटना. प्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार उर्फ युसुफसाहेब यांनी आप्पांना चर्चेचे व जेवणाचे आमंत्रण दिले. मधू शेट्ये आप्पांना दिलीपकुमार यांच्या घरी घेऊन गेले. चर्चेदरम्यान आप्पांनी दिलीपकुमार यांना त्यांनी विचारलेल्या स्थळी शंबूकाचा पुतळा बसवण्यास सुचवले. दिलीपकुमारांना ते पटले नसावे. आप्पांनी त्या प्रसंगाबद्दल नंतर कधीच उल्लेख केला नाही. दिलीपकुमारांसारख्या दिग्गज अभिनेत्याची भेट हे आप्पांच्या लेखी महत्त्वाची नव्हती. दिलीपकुमारांनी जर शंबूकाचा पुतळा बसवला असता तर ती आप्पांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब ठरली असती.

कधीकधी लोक एखाद्या ठिकाणाचे वा व्यक्तीचे नाव आप्पांनी सुचवावे असा आग्रह धरत. त्या वेळी आप्पा त्यांना रोग्य वाटेल ते नाव सुचवत. तीस वर्षांपूर्वी असंतोष ज्या कॉलनीत आहे ते कॉलनीवासी आप्पांकडे आले व त्यांनी आप्पांना कॉलनीस नाव सुचवायला सांगितले. आप्पांनी त्यांना ‘बाद्री कॉलनी’ हे नाव सुचवले. त्या लोकांना बहुधा ते नाव रुचले नाही. त्यांनी चार लोक ठेवतात त्याप्रमाणे ‘शिवाजीनगर’ हे नाव दिले व ८-१० वर्षांपूर्वी तर त्या कॉलनीस ‘श्रीराम कॉलनी’ हे नाव दिले.

आप्पा एखाद्या समस्येवरचा उपाय अशा पद्धतीने सांगत की, तो आम्हाला चटकन पटत असे. मी एफवाय बीएला असतानाची घटना आहे. एक मराठीचे प्राध्यापक वर्गात आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत. विद्यार्थिनींनी थोडा विरोध केला, पण त्यांच्यात बदल झाला नाही. म्हणून काही विद्यार्थिनी त्यांना कॉलेजमधून काढून टाकावे यासाठी उपोषणास बसल्या. मीदेखील पाठिंबा म्हणून त्यांच्या बरोबर उपोषणास बसले. घरी आल्यानंतर घडलेला प्रसंग आप्पांना सांगितला. त्या वेळी आप्पांनी समजावले की, ‘तुम्ही प्राचार्यांना लेखी निवेदन देऊन त्या संबंधित प्राध्यापकांस त्यांच्या शिकवण्यात सुधारणा करण्यास सांगा. पण, कोणालाही कामावरून काढून टाकणे ही मागणी अयोग्य आहे.’ अर्थातच, आप्पांचे म्हणणे मला पटले व मी नंतर त्या उपोषणास पाठिंबा दिला नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

आमच्या आजी (आप्पांच्या आई) आप्पांच्या जीवनातील एक प्रसंग आम्हाला अनेक वेळा सांगत. अर्थात, तो प्रसंग माझ्या जन्माअगोदरचा. उकाई धरण बांधले जात असताना विस्थापित होणाऱ्या लेाकांसाठी आप्पांनी आमरण उपोषण केले होते. अखेर, एकोणीस दिवसांनंतर आचार्य अत्रे यांच्या हस्ते ते उपोषण सुटले. आचार्य अत्रे यांच्या ‘कऱ्हेचे पाणी’ या आत्मचरित्रात त्याचा उल्लेख आहे. उपोषण सुटल्यावर आप्पांनी भाषणास सुरुवात केली. ते बोलत असताना त्यांचे वडील गेल्याची तार त्यांना मिळाली. आजीदेखील त्या दिवशी तेथे आप्पांना भेटण्यास गेलेल्या होत्या. आप्पांनी तार वाचून खिशात ठेवली व भाषण सुरूच ठेवले. संपूर्ण कार्यक्रम आटोपल्यावर आप्पा आजीस घेऊन त्यांच्या मूळ गावी कापडणे येथे गेले. तेथे पोहोचल्यावर आजींना आजोबांच्या मृत्यूची बातमी कळली.

फक्त आप्पांबद्दल लिहिणे म्हणजे आप्पांना अपूर्ण ठेवणे होय. कारण आप्पांना पूर्णत्व प्राप्त होते ते आमच्या आईचे आप्पांच्या आयुष्यात असण्याने. तिने त्यांच्यासाठी दिलेल्या योगदानाने. ज्या काळात आप्पांच्या वैचारिक लिखाणाचा व समाजकार्याचा पाया रचला गेला व विकास झाला त्या काळात व त्यानंतरही आप्पांना स्वातंत्र्यसैनिकाचे पेन्शन मिळेपर्यंत संपूर्ण आर्थिक मदत आईनेच केली.

आप्पा जेलमध्ये असताना आई आप्पांना भेटायला जाई. पण कितीतरी दिवस अगोदर आप्पांसाठी न्यायच्या पुस्तकांची व पैशाची तजवीज तिला करावी लागे. त्यांना भेटायला जातानाही अनेक अडचणी तिला पार कराव्या लागत. आप्पा येरवडा जेलमध्ये असताना आई त्यांना भेटण्यास गेली. सोबत एक वर्षाचा नचिकेत व पुस्तकांचे मोठे खोके. नचिकेत व पुस्तकांचे खोके हे दोन्ही सोबत धरता येत नव्हते. दोन्हींना आळीपाळीने रस्त्याच्या कडेला ठेवत आईला जेलपर्यंतचे अंतर पार करावे लागले.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आप्पा संस्कृतच्या अध्ययनासाठी काही वर्ष बडोद्यास वास्तव्याला होते. त्या वेळी आई तिचा पूर्ण पगार आप्पांना मनीऑर्डरने पाठवून देई व ट्यूशन करून घर चालवत असे. दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ट्यूशन्स बंद असल्यामुळे आई आम्हा बहीण-भावंडांना घेऊन मामाच्या गावी राहत असे.

आईने सतत नि:स्वार्थीपणे आप्पांना मदत केली. आप्पांजवळ पैसे आल्यानंतरदेखील तिने ते आपल्याला घरखर्चासाठी मिळावे, ही अपेक्षा केली नाही. आप्पांचे मित्र जयंतभाई देसाई यांनी त्यांच्या मृत्रुपत्रात आप्पांना ५० हजार रुपरे द्यावे असे नमूद केले होते. त्याप्रमाणे जयंतभाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी आप्पांना ५० हजार रुपये पाठवले. आप्पांनी आईला सांगितले की, ते पैसे त्यांना धुळ्यास ‘असंतोष’मागे पार्टी ऑफिस बांधण्यासाठी खर्च करावयाचे आहेत. आईने त्यांना विरोध केला नाही किंवा तो घरखर्चासाठी मदत म्हणून मला द्या, अशी अपेक्षाही केली नाही. याउलट त्या पार्टी ऑफिसच्या बांधकामावर आप्पांसोबत आईदेखील पाणी मारण्याचे काम करत असे.

आमच्या आईनेच, खऱ्या अर्थाने आई व वडील या दोन्ही भूमिका पार पाडून आमचे संगोपन केले. तिला पूर्णपणे जाणीव होती की, समाजकार्य व प्रबोधनात्मक लिखाण करण्यात व्यस्त असलेल्या आप्पांना कुटुंबासाठी वेळ देणे शक्य नाही.

क्रांतिकारी सत्यशोधक : कॉम्रेड शरद् पाटील - संपा. रमेश चव्हाण,

हर्मिस प्रकाशन, पुणे,

पाने - २५२, मूल्य – २७५ रुपये.

.............................................................................................................................................

हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/4798/Krantikari-Satyashodhak-Comrade-Sharad-Patil

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......