‘कुठाँव’ : इतके दिवस व्यवस्थेनं ‘या’ विषयावरचा सोयीनं धरून ठेवलेला मौनाचा पडदा टराटरा फाडणारी कादंबरी!
‘कुठाँव’ म्हणजे ‘मर्म’. अर्पणपत्रिकेत, जी सितारासारख्या मुलींसाठी आहे, बिस्मिल्लाह या कादंबरीला ‘एक बदसुरत किताब’ म्हणतो. त्याच्यासाठीही हे सोपं नव्हतं. २०१३ साली जवळजवळ सलग, मधून मधून येणारं आजारपण वगळता, पुरी झालेली ही कादंबरी. पाच वर्षं अनेकांकडे अभिप्राय, पुनर्लेखनाचे, दुरुस्तीचे सल्ले घेत ती फिरत राहिली आणि अखेर २०१८च्या अखेरीस प्रकाशित झाली, तिची ही छोटीशी निर्मितीकथाही भाष्यच वाटू लागते, व्यवस्थेवरचं.......