‘दंशकाल’ - रहस्य, भीतीच्या पलीकडे जात समग्र मानवी आयुष्य कवेत घेणारी कादंबरी
‘दंशकाल’चं वाचन पुन्हा पुन्हा केलं तर त्यात रहस्याच्या, भीतीच्या पलीकडे जाऊन समग्र आयुष्य कवेत घेणाऱ्या बिंदूंची मांडणी दिसते. ‘दंशकाल’चं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करण्यामागे हेतू खरं तर हाच –की, गोष्ट सांगणारा कुणी गोष्टकार, गोष्ट न सांगताच काळाच्या उदरात गडप होऊन जाऊ नये आणि आपल्या सगळ्यांच्या गोष्टी सगळ्यांना स्पष्ट ऐकू येत राहाव्यात.......