दीनदुबळ्या-पीडित बहुजन समाजाला बरोबर घेऊन लढा उभारणारा आणि कोणत्याही संचयात न अडकणारा, असा कॉम्रेडसारखा माणूस आताच्या काळात तरी दुर्मीळच!
कॉम्रेड विलास सोनवणे कर्ते विचारवंत आहेत, चार भिंतींमध्ये बसून विचार पाडणाऱ्यांमधले ते नव्हेत. चळवळीच्या, आंदोलनाच्या निमित्तानं त्यांचा तरुणांशी, खेड्यापाड्यांशी, बहुजन समाजाशी, शासनव्यवस्थेशी नित्य संबंध असतो. प्रत्यक्षात ग्राऊंड रिअलिटी काय आहे, तिथं काय काय नि कसं कसं घडतं, काय केलं म्हणजे काय होईल याच्याशी ते चांगलेच परिचित आहेत. जी कोणी मांडत नाही व दाखवत नाही, ती स्पेस सोनवणे दाखवतात.......