“जात-धर्म न पाहता त्यातील जुनाट रूढी-परंपरा, धर्मांधता यांवर निरपेक्षपणे टीका करणं हेच पुरोगामीत्वाचं लक्षण आहे”
‘पुरोगामी’ म्हणून सगळ्यांना एकाच मापानं मोजून त्यांच्यावर टीका करणं किंवा त्यांच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही. ‘पुरोगामी’ या शब्दाचा अर्थ इतका हेटाळणीच्या स्वरूपात वापरणं योग्य नाही. जात आणि धर्म न पाहता त्यातील जुनाट रूढी-परंपरा, धर्मांधता यांवर निरपेक्षपणे टीका करणं हेच पुरोगामीत्वाचं लक्षण आहे. मी नाही का पुरोगामी? मी नाही का हमीदला आणि त्याच्या चळवळीला आयुष्यभर पाठिंबा दिला? .......