ऑर्वेलच्या अंतरंगाचा वेध घेताना त्याचं व्यक्तित्व आणि साहित्य यांचा संगम साधण्याचा हा प्रयत्न आहे. हे पुस्तक वाचकांना ऑर्वेलशी जोडणारा पूल ठरावं...
कलावंताचा प्रवास कष्टप्रद असतो, याची त्याला जाणीव नव्हती का? निश्चितच होती! पण ‘करून जावे असेही काही...’ हा त्याचा ध्यास होता. म्हणूनच तो त्या खडतर वाटेवर चालत राहिला. त्या प्रवासाचं खणखणीत मोल चुकवण्याची त्यानं तयारी ठेवली होती. एकट्यानं चालताना त्याला यातना झाल्या, पण तो खचला नाही. मार्गापासून ढळण्याचा विचारही त्याला कधी शिवला नाही. त्यासाठी स्वावलंबीपणे जगला. अनेक बाबतीत तो गांधीजींसारखा होता.......