आपण पेरुगन आहोत. आपण एका व्यवस्थेचे व्यवस्थित बळी आहोत...
बरं झालं आपण पेरुगन मुरुगन झालो ते. वेळीच ज्याने निर्णय घेतला त्यानेच जगावर राज्य केलं. पेरुगन मुरुगन म्हणजे काय मस्त गोष्ट आहे. लोकशाहीत विचारांची लढाई विचारांनी लढली गेली पाहिजे असं काही नाही. बंदुकीची एक गोळी पण मस्त श्रीराम लागू होते. असे बरेच आवाज, घटनाक्रम पेरुगनच्या भवती फेर धरायला लागले. मणक्यातून वेदनेची एक सूक्ष्म कळ धावू लागलेली आहे .......