तिला पाहताच वाटतं, जणू एखादी ख्रिश्चन वधू नटून-थटून हॉलवर निघायच्या तयारीत आहे!
कॅमेरा हातात घेतला नि निदान सोसायटीत तरी फेरी मारावी म्हणत बाहेर पडले. आणि अहो आश्चर्यम! अचानक चक्क एक सुंदरी नजरेला पडली. चारेक इंचांचा मांसल दांडा, वर काळसर तपकिरी टोपी, जाळीदार झगा! थोडं चार पावलं पुढे गेले तर तिथंही बाकी सगळी तशीच सुंदर, पण झगा तेवढा थोडा अपरा आणि वरची टोपीही पांढरी शुभ्र. नखशिखान्त गोरीपान मश्रूमबाई नजरेला पडली! मात्र यांचं खरं सौंदर्य म्हणजे त्यांचा आकर्षक जाळीदार स्वच्छ पांढराशुभ्र झगा.......