‘सल्तनत-ए-खुदादाद’ : धर्मवेड्या, जमातवादी प्रचारास ठोस आव्हान देणारा ग्रंथ
सरफराज अहमद यांच्या पुस्तकानं विकृतीच्या ढिगाऱ्यातून खरा टिपू शोधून काढण्याचं महत्त्वाचं काम केलं आहे. अत्यंत नेटक्या, नेमक्या व ठोस संदर्भाच्या आधारानं टिपूचं व्यक्तित्व, कार्य, राज्यकारभार, धोरणं, दृष्टिकोन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग व महत्त्व जाणणं, यांसह आपल्या राज्याच्या विस्ताराबरोबरच सुस्थीर शासन, शांततापूर्ण प्रजाजीवन याबाबत तो कसा दक्ष व व्यापक क्षमतांचा धनी होता याचे अनेक पदर उलगडले आहेत.......