ओप्रा विन्फ्री : असं काय आहे या बाईमध्ये? असं काय भोगलंय तिने की, तिच्या शोमध्ये येणाऱ्या सगळ्यांना ती आपल्या बोलण्याने मोकळं करू शकते?
जे घडलं ते सगळं भयानक तर खरंच, पण ओप्राबाबत तेवढंच म्हणता येत नाही. हे सगळं भोगून ती आज तिथं पोहोचली, तिने जे करून दाखवलं किंवा ती आजही जे करतेय ते क्वचितच कोणाला जमत असेल. तिने आपल्या अनुभवाचं कधी भाडवलं केलं नाही, पण म्हणून ते लपवूनही ठेवलं नाही. आपल्या कार्यक्रमात येणाऱ्यांनी मोकळेपणानं बोलावं अशी अपेक्षा तिने केली, तेव्हा आपला अनुभव जाहीरपणे शेअर करण्याची ताकदही तिने दाखवली.......